राजधानीतून...

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

Nov 8, 2006

A visit to Ward 57 of Walter Reed Army Medical Center, Washington, DC

मी आणि "जो", माझा एक कलिग सालाबादप्रमाणे कंपनीतर्फे होणार्‍या या हॉस्पिटल भेटीसाठी गेलो. हे आर्मी मेडिकल सेन्टर आहे म्हणजे साहजीकच इथं युद्धात जखमी झालेल्या सैनिकांना उपचारासाठी आणतात. सध्या आहेत त्यातले काही अफगाणिस्तानातून, बहुतांशी इराकमधून आलेले.

ज्या रुग्णांनी ' visitors चालतील' असं सांगितलं आहे त्यांनाच भेटता येतं. तसे आमच्या लिस्ट मध्ये ९ जण होते. त्यांना भेटणे, त्यांच्याशी बोलणे, काही छोट्या मोठ्या भेटी देणे, एकूण काय तर त्यांना थोडा विरंगुळा म्हणून आणि आपला पाठिंबा दाखवणे एवढाच भेटीचा उद्देश.फोटो घ्यायला अर्थातच परवानगी नाही. भेटवस्तूंवरही बंधनं आहेत. food items चालत नाहीत. त्यांना साधारण कोणत्या गोष्टी लागतात किंवा हव्या आहेत अशा वस्तूंची एक लिस्ट मिळाली होती. त्यातल्या काही गोष्टी आम्ही घेतल्या होत्या.

"जो" स्वतः एक सैनिकच. नुकताच इराकहून परत आलेला. त्याने वाटेत कारमध्ये त्यांच्याशी काय बोलावे किंवा काय बोलू नये याचेच धडे दिले. "कसं झालं, काय झालं" असं सहसा विचारु नये कारण एखादे वेळेस हल्ल्यत त्यांचे बाकी सगळे सहकारी मृत्यू पावले असतील, बाकी काही कटू आठवणी असू शकतील म्हणून. सहसा भविश्याबद्दल बोलावं. ते स्वतःहून बोलले तर ऐकून घ्यावं. हे सगळं समजून खरं तर मी "जो" ला जास्त बोलू द्यावं असंच ठरवलं. तो त्यांच्यातलाच एक असल्यामुळं त्यांची मनःस्थिती जास्त चांगली समजू शकत होता.

आम्ही पोचलो तो लंच टाईम होता. सार्जंट " Robert " अमचा escort होता. त्याने आम्हाला ward मध्ये नेले. आमच्या लिस्ट मधल्या ९ पैकी काही लन्च घेत होते, surgery मध्ये होते तर काही अगदी थकल्यामुळे भेटायला उत्सुक नव्हते. पहिला भेटला Al, विशीतला तरुण होता कॅलिफोर्नियाचा. double-amputee . गुडघ्यापासून खालचे दोन्ही पाय गेलेले. २ आठवड्यापूर्वीच हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. जवळ त्याची आई आणि बहीण होत्या. खूप थकलेला वाटला..मनाने. सुरवातीला फारसा बोलायला उत्सुक दिसला नाही. काही माहिती त्याच्या आईनेच दिली. मग "जो" ने त्याला जरा बोलते केले. पूर्ण recovery नंतर त्याला आपल्या आधीच्या आवडीच्या कामात पुन्हा मन रमवायचे होते.. teaching मध्ये.
त्याच्या आईशी आणि बहिणीशी थोड्या गप्पा मारल्या. नातेवाईकांसाठी असलेल्या सेंटरच्या apartment मध्ये त्या रहात होत्या.

मग भेटला "Mike" , टेक्सासचा. हा पण विशीतलाच. आम्ही रुम मध्ये शिरताच त्याने स्वतःहूनच बोलायला सुरवात केली. त्याला इराकमधून परत यायला ३६ दिवसच उरले होते. तो आणि त्याचे सहकारी परती नंतरचे प्लॅन्स ही आखत होते. तो सांगत होता .. " we were ambushed ". त्यांच्या Humvee वर हल्ला झाला होता. एक महत्वाचं असं destructive शस्त्र याच्याकडे होतं म्हणून "मीच त्या लोकांच target होतो" अशी त्याची खात्री होती. एका सहकार्‍यामुळं तो वाचला आणि नशीबाने वैद्यकीय सेवा जवळच उपलब्ध होती तिथे ड्रायव्हर ने गाडी नेली. एका Stingray IED त्याच्या पायात घुसले. त्याच्या हाताजवळ येऊन पडलेले ग्रेनेड त्याने उचलून परत फेकण्यापूर्वी फुटल्याने हातही जबर जखमी झाला. याच्या सगळ्या अंगभर जखमा होत्या. याच्याही सोबतीला त्याची आई होती. आमच्याशी बोलत असतानाच त्याला त्याच्या बायकोचा फोन आला, ती काहीतरी आणायला बाहेर गेली होती. आम्ही जावं म्हणून उठलो, तर त्यानं थांबवलं आणि फोन झाल्यावर पुन्हा गप्पा मारल्या. याला खूप बोलायचं होतं. बरा झाल्यावर पुन्हा आर्मीत परत जाण्याची त्याची इच्छा होती. आम्ही निघताना त्याने आमचे आभार मानले - "knowing people care really helps. "
खरं तर आम्हालाच त्याच्याशी बोलून बरं वाटलं.

नंतर इतर काही जणांना भेटून, सर्वांसाठी आणलेल्या गोष्टी त्याना देवून आम्ही परत निघालो..

****

याच सुमारास midterm elections होऊन सगळीकडे निकालचे वारे वहात होते. सिनेटचा कंट्रोल ठरवणारा व्हर्जिनियाचा निकाल थोडा उशीरने लागला. या आणि अजून काही करणासाठीही ही एक महत्वाची निवडणूक ठरली.

व्हर्जिनियाचे सिनेटर (आता माजी) जॉर्ज़ ऍलन यांनी त्यांच्या campaign मध्ये एका भारतीय वंशाच्या मुलाला उद्देशून macaca (a monkey) असा शब्द वापरला आणि त्यावरुन झालेले वादळ तुम्हाला माहितच असेल. Washington Post ने ही स्टोरी लावून धरली. त्या आधी बर्‍याच
points नी पोल्स मधे पुढे असणारे, आणि व्हर्जिनियाची निवडणूक सहज जिंकून पुढे President ची निवडणूक लढवण्याची महत्वाकांक्षा असणारे ऍलन चक्क पराभूत झाले. बाकी काही असो, पण immigrants ना (ते ही भारतीय वंशाच्या) कसेही वागवलेले खपवून घेतले जात नाही आणि त्याचे असे जबर परिणाम होऊ शकतात हे दिसून आले हे महत्वाचे आहे.

****

बरेच दिवस गाजत असलेला 'भारत अमेरिका अण्वस्त्र करार' सिनेट मधे पास झाला. त्याला १२ सिनेटर्स नी विरोधी मतदान केले. हे सगळे democrats आहेत. ही त्यांची नावे Happy -

Akaka (D-HI),
Bingaman (D-NM),
Robert Byrd (D-WV),
Conrad (D-ND),
Dayton (D-MN),
Dorgan (D-ND),
Feingold (D-WI),
Harkin (D-IA),
Johnson (D-SD),
Patrick Leahy (D-VT),
Barbara Boxer (D-CA),
Ted Kennedy (D-MA)

सध्या इतकेच.

(हे काही सदर वगैरे नाही. सहज आपलं लिहावं वाटलं म्हणून इथे घडलेल्या काही गोष्टींबद्दल लिहिलं तश्या त्या घडूनही बरेच दिवस झाले आहेत. Happy )

प्रकार: 

छान आहे, लोकसत्ता मधील "लाल किल्ला" या सदराची आठवण झाली.
असच वेळोवेळी अपडेट करत जावा Happy

एक फु.स. - इकडे दिल्लीत कुणी राहात असेल तर असाच धागा सुरू झाला तर उत्तम!