सांग सांग भोलानाथ, रिप्लाय मिळेल काय

Submitted by दयाघना on 24 August, 2014 - 01:12

( एक नर्म सूचना : कविता आपल्या जबाबदारीवर वाचावी. आवडल्यास अनुल्लेख करावा. नावडल्यास स्वतःवर ओढवून घेऊ नये. कवी जबाबदार नाही )

सांग सांग भोलानाथ, रिप्लाय मिळेल काय
फडामधे उसाच्या पाती कापेल काय

भोलानाथ छापून आला मोदींवर पेपर
बोटात माझ्या कळ येऊन भरेल का रे वावर

भोलानाथ दुपारी आदम झोपेल काय ?
ड्युआय बनून विपूमधे नाचून येऊ काय ?

भोलानाथ लेखाला रिप्लाय मिळत नाय
बाफ वर आला तर भाट म्हणतील काय

भोलानाथ त्यांनी शेण धा वर्षे खाल्लं
आम्ही सुरू केलं, त्यांच्या पोटात का रे दुखलं

इग्नोर इग्नोर तीनदा सांगून तलाक झाला नाय
ऋतू बघून साडी नेसून जहाज बुडेल काय

भोलानाथ मैत्रिणीला हगून आलास काय ?
स्टँडावर रात्रीचा थांबून आलास काय ?

मुद्दे संपून गुद्दे सुरू पाटी लागली काय
हहगलो स्मायल्यांनी टेंगूळ झाकेल काय

नेता माझा किल्य्यारून बोलतो हाय
आगी आधी लावून आता बंब फिरवु काय

भोलानाथ दार लावून कपडे बदलू काय ?
भिंती सा-या काचेच्या, दोष माझा नाय

भोलानाथ खटासि खट झाला काय ?
उद्धटाच्या दुकानाचा बाजार उठला काय ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुद्दे संपून गुद्दे सुरू पाटी लागली काय
हहगलो स्मायल्यांनी टेंगूळ झाकेल काय

नेता माझा किल्य्यारून बोलतो हाय
आगी आधी लावून आता बंब फिरवु काय

भोलानाथ दार लावून कपडे बदलू काय ?
भिंती सा-या काचेच्या, माझा दोष नाय>>>>>:हाहा: जबरी आहे.

भोलानाथ मैत्रिणीला हगून आलास काय ? Lol

कवितेला क्रमशः ठेवा म्हणजे येत्या काळात वाढवू शकाल Rofl

जोक्स अपार्ट, आवडली Happy

आवडली बॉ.... अर्थात योग्य जागी हलचल माजेलच... स्क्रीनशॉट घ्यावा काय. उद्या दिसेल ना दिसेल Happy