साजरी माझी जयंती ते कराया लागले

Submitted by इस्रो on 18 August, 2014 - 10:15

साजरी माझी जयंती ते कराया लागले
वाटते, आता तयांना मी कळाया लागले

आम जनता, चांगले दिन कर्जमाफी योजना
तीच ती दळणे पुन्हा बघ ते दळाया लागले

"झाड लावा, झाड जगवा" ऐकले नाही कुणी
पावसासाठी नवसही मग कराया लागले

पोलिसांना सापडेना चोर साधा वा खुनी
हात अपुला ज्योतिषाला दाखवाया लागले

डोंगराखाली गडप तो गाव झाला, अन म्ह्णे
फौजदारी डोंगरावर ते कराया लागले

वाटले होते जयांना कोण कुठली काल मी
आज आठवणीत माझ्या ते रडाया लागले

-नाहिद नालबंद
[चलभाषः ९९२१ १०४ ६३०]

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेवटच्या शेरातील खयाल गझलेला एकदम साजेसा आहे पण तो वृत्तात नाही हे खटकले.

>>>वाटते, आता तयांना मी कळाया लागले<<< ही ओळ आवडली.

श्रीयू -धन्यवाद

बेफिकीरजी धन्यवाद. शेवटच्या शेराबद्दल जे म्हणताय ते नाही लक्षात आले. प्लीज सांगाल का?
त्याप्रमाणे बदल करेन.

मस्त! आवडले.

झाड लावा, झाड जगवा" ऐकले नाही कुणी
पावसासाठी नवसही मग कराया लागले>>>>हे मह्त्वाचे.