पाऊस येतो आपल्या मर्जीने !
पाऊस जातो आपल्या मर्जीने !!
लोकं मात्र भिजतात आपल्याच हलगर्जीने ..
मी कवी नाहीये. पण तो बरसायला सुरुवात झाली की आपसूक शब्दांचेही ढग मनी दाटून येतात. अन त्याच्यासंगे रिते होतात.
लोकं पण ना, कमाल करतात,
चार थेंब नाही पडले, तर छत्री खोलतात ..
जेव्हा आभाळ कोरडे पडते, तेव्हा "धावा" करतात ..
जेव्हा बरसू लागते, यांच्या "विकेट" पडतात !
- कवी ऋन्मेऽऽष
असू द्या असू द्या ...
तर माझ्यासारखे पावसाळी कवी मायबोलीवर कैक असतील. आपल्या सर्वांसाठी म्हणून हा धागा. कविता वाचायला आवडणार्यांसाठी नाही, तर कविता (न लाजता) रचायला आवडणार्यांसाठी. कोणीच नाही लिहिले तर माझी मी भर घालत राहीलच. तरीही कोणी नावाजलेल्या कवींच्या फसलेल्या पावसाळी कविता त्यांना शेपरेट धागा काढून प्रकाशित कराव्याश्या वाटत नसतील तर त्या कृपया इथे येऊ द्या. जर असा एखादा धागा मायबोलीवर आधीच असेल तर कृपया त्याच्या लिंका शोधायचा त्रास घेण्यापेक्षा काही ताज्या ताज्या पावसाळी चारोळ्या रचून ईथे भर घाला. पावसाळा उलटून दोन महिने झाल्यावर हा धागा काढला म्हणून,
दिलगीर आहे,
ऋन्मेऽऽष
ऋन्मेषची कविता पुढे कंटिन्यू
ऋन्मेषची कविता पुढे कंटिन्यू करते
-----
भिजवून टाकायला चार थेंब पुरतात
एक तनावर
एक मनावर
दोन तरीही उरतात ...
एक शिशिरावर
एक ग्रीष्मावर
पुढच्या पावसापर्यंतची बेगमी करतात
डिविनिता .. धन्यवाद .. आवडेल
डिविनिता .. धन्यवाद .. आवडेल त्यालाच चांगले बोलल्याबद्दल
आश्विनी .. वाह वा पर्रफेक्ट ! अर्थ आणलात, नाहीतर ते दोन थेंब वाहूनच जायचे होते.
)
(आणि माझ्या ओळी कंटिन्यू कराव्याश्या वाटल्या म्हणून जरा माझीही पाठ थोपटतो
पहिलं पहिलं प्रेम सांवर रे
पहिलं पहिलं प्रेम
सांवर रे मना
पहिल्या पावसाचंही सेम
तू कोसळ रे घना..
....
...
आज मुंबईत पैल्यावैल्या पावसाने हजेरी लावल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ जुना धागा उचकवटून वर आणत आहे.
म्हटलं तर सुख आहे म्हटलं तर
म्हटलं तर सुख आहे
म्हटलं तर दुख आहे
आयुष्य आणि पाऊस
दोघं अगदी एकरूप आहेत
ऋन्मेऽऽष मस्त कविता करतोस तू
ऋन्मेऽऽष
मस्त कविता करतोस तू
ऋन्मेश दोन्ही चारोळ्या मस्त.
ऋन्मेश दोन्ही चारोळ्या मस्त.
ती बालन विद्या साजरी, पावसात
ती बालन विद्या साजरी, पावसात भिजत ओलेती
ओवाळून टाकू कंगना, छप्पन तिच्यावरती
ऋन्मेऽऽष , दोन्ही चारोळ्या
ऋन्मेऽऽष , दोन्ही चारोळ्या मस्त! आवडल्या !
श्रावण... आला रे आला पुन्हा
श्रावण...
आला रे आला
पुन्हा श्रावण आला
घेऊन आठवणींचा झुला
हिंदकळती आठवणी
पाणथळल्या वळचणी
इंद्रधनूचा घेऊन झुला
आला रे आला
पुन्हा श्रावण आला
बहरली माती
हिरवीगार शेती
मृदगंध आसमंती दाटला
आला रे आला
पुन्हा श्रावण आला
ऊनपावसात लागे
कोल्हाकोल्हिचे लगीन
ढगांचा बॅड वाजला
आला रे आला
पुन्हा श्रावण आला
केतकीच्या बनात
मयूर पिसारा फुलला
सर्वत्र केकारव घुमला
आला रे आला
पुन्हा श्रावण आला
राजेंद्र देवी
हाहा धन्यवाद लोक्स, ते तर
हाहा धन्यवाद लोक्स, ते तर धागा वर काढायला काहीतरी खरडले, पण धागा चालू न होता तो वार फुकट गेला म्हणून आणखी एक बनवले.. आवडले तर बरंय पण, व्हॉटसपवर फिरवतो
येरे येरे पावसा तुला देतो
येरे येरे पावसा
तुला देतो पैसा
पैसा झाला खरा
पाऊस गेला घरा .
मी कविता लिहीतो आहे
मी कविता लिहीतो आहे
तरीही थापा मारतो आहे
ऋ चा खोटेपणा बघण्या
धागा वर काढतो आहे
व्वा राजेंद्रजी सुंदर रचना!
पावसाच्या धारा
पावसाच्या धारा
बरसुनी गेल्या
शेकडोंचा संसार
उघड्यावर मांडुन गेल्या
पुर आला होता
आता ओसरला आहे
आसवांचा पुर
नेत्रांत अजुनही आहे
वाहुन गेली गुरेढोरे
नाहीशी झाली घरे
अन्
जागी झाली
माणसांतली माणुसकी सळसळले हात शेकडो एकजात फक्त
माणुस होऊनी
(Dipti Bhagat)
वादळांचा गडगडाट होता विज
वादळांचा गडगडाट होता विज चमकते।
पडणारच म्हणता कुठेतरी माशी शिंकते।।
धोधो पडणारा अंगणात शिंपडाव करतो।
मन ओले चिंब होता तन राहते भिजायचे।।
चारोळी खास तुझ्यासाठी
श्रावण आला गं सखे
श्रावण आला गं सखे
----------------------------
श्रावण आला गं सखे
माहेराची सय आली
हाती जरी किती कामं
त्या साऱ्याला लय आली
परसात एक आड
अंगणात किती झाडं
त्या झोक्यांची याद आली
प्रेमळ गं भाऊराया
वहिनी करिते माया
भेटायची इच्छा झाली
देवासमान गं पिता
देवासमान गं माता
पानं गळायला आली
आताच जायला हवं
त्यांना पहायला हवं
चिंता इथे भय घाली
------------------------
बिपीन
थेंबा थेंबातुन तो, मनामध्ये
थेंबा थेंबातुन तो, मनामध्ये उतरत जातो. बरसनार्या सरीमध्ये, काही नविन भेटत जातं.
पावसाने केलेल्या, खड्ड्या
पावसाने केलेल्या, खड्ड्या खड्ड्यामुळे. मला तिच्या चेहर्यावरील, तो नाजुक खड्डा आठवला.
हौशी कवींसाठी धागा वर काढतेय.
हौशी कवींसाठी धागा वर काढतेय..
Pages