पावसाळी कविता (एक धागा हौशी कवींसाठी)

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 August, 2014 - 14:35

पाऊस येतो आपल्या मर्जीने !
पाऊस जातो आपल्या मर्जीने !!
लोकं मात्र भिजतात आपल्याच हलगर्जीने ..

मी कवी नाहीये. पण तो बरसायला सुरुवात झाली की आपसूक शब्दांचेही ढग मनी दाटून येतात. अन त्याच्यासंगे रिते होतात.

लोकं पण ना, कमाल करतात,
चार थेंब नाही पडले, तर छत्री खोलतात ..

जेव्हा आभाळ कोरडे पडते, तेव्हा "धावा" करतात ..
जेव्हा बरसू लागते, यांच्या "विकेट" पडतात !

- कवी ऋन्मेऽऽष

असू द्या असू द्या ...
तर माझ्यासारखे पावसाळी कवी मायबोलीवर कैक असतील. आपल्या सर्वांसाठी म्हणून हा धागा. कविता वाचायला आवडणार्‍यांसाठी नाही, तर कविता (न लाजता) रचायला आवडणार्‍यांसाठी. कोणीच नाही लिहिले तर माझी मी भर घालत राहीलच. तरीही कोणी नावाजलेल्या कवींच्या फसलेल्या पावसाळी कविता त्यांना शेपरेट धागा काढून प्रकाशित कराव्याश्या वाटत नसतील तर त्या कृपया इथे येऊ द्या. जर असा एखादा धागा मायबोलीवर आधीच असेल तर कृपया त्याच्या लिंका शोधायचा त्रास घेण्यापेक्षा काही ताज्या ताज्या पावसाळी चारोळ्या रचून ईथे भर घाला. पावसाळा उलटून दोन महिने झाल्यावर हा धागा काढला म्हणून,
दिलगीर आहे,
ऋन्मेऽऽष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे काय? पाऊस पडुन, धरणे भरुनही कवितान्चा एवढा दुष्काळ? धसका घेतला काय प्रो. न्च्या कवितान्चा?

लिहा रे निदान पावसाळी वाता वरणावर चारोळ्या, तिनोळ्या, एकोळ्या लिहा.

पाऊस पडला बेधुन्द, झाले रान कुन्द कुन्द

रावी मस्त.:हाहा:

पाऊस पडला धो धो धो
कवितान्चा वारा सो सो सो

पाऊस पडला झपाटुन
कविता आल्या सपाटुन.:फिदी:

वाह वा माबोकर.. थेंब थेंब रिमझिमला सुरुवात तर झाली ..
आली रे आली, छत्री खरेदीची वेळ आली Wink

लेकीने नवव्या वर्षी केलेली कविता

पावसाचा सूर, ऐकू येतो कानात.
असं वाटतं, भिजाव पावसात.
आई म्हणते नको, ताप येइल तुला,
उद्या आहे परिक्षा, विसरू नको बाळा.

१३ जून २०१४रोजी मी अशीच एक पावसावर कविता केलेली....माझ्या जालनिशीवरही टाकलेय मी.
*******.
पाऊस सुरु होऊन काही तास उलटले तरी अजूनही एकही पावसावरची कविता कशी आली नाही ह्याचे आश्चर्य वाटतंय...मग म्हटले आपणच करून टाकूया एखादी कविता...हं तर, वाचा...

पाऊस म्हणाला, येऊ का रे
मी म्हणालो, बिनधास्त ये रे

तो म्हणाला, भिजशील तू
आणि आजारीही पडशील तू

मी म्हणालो, हरकत नाही,
आपण पहिल्यांदा भेटण्याची
गंमत काही औरच असते, नाही!

नताशा छान आहे की कविता, लेकीला सान्ग.

प्रमोद दादा ( काका नको दादा म्हणलेले आवडेल मला) बिनधास्त कविता! एकदम बोले तो मनापासुन स्वागत केलेय पावसाचे.

तुम्ही नताशा,
जर कविता खरेच लेकीची नवव्या वर्षीची असेल ((जे मी पहिल्यांदा नववीत असतानाची वाचले)) तर तिला या रिशीचा __/\__

अश्या चांगल्या कविता आल्या तर मला माझ्या पांचट कविता टाकायची लाज वाटावी
पर कोई बात नही ऋन्मेष, लगे रेह ..

आता थोडा करुण रस ..
जिंदगी गुजारी मैने एक लाश की तरह
झिंदगी गुजार दी मैने एक लाश की तरह
और एक दिन बारीश हो गयी ....

अरमान दिलमे कुछ खिल उठे
पर सहारे बेह गये ..

सरीवर सरी आल्या
फुलला मोरपिसारा
दु:खाची पाने उडवून गेला
सुखाचा वादळी वारा
अश्रुंचे अस्तित्व पुसून गेल्या
त्या कोसळणाऱ्या जलधारा

इथे बरसतोय
तिथेही बरसत असेल
कदाचित तिथे
तुलाही भिजवत असेल
पागोळी बनून
गालांवर विसावत असेल
सुकलेल्या ओठांवर
ओल रुजवत असेल

अन्विता, अश्विनी मस्त कविता. अशा छोटुकल्या कविता पटकन मनात रुजतात.:स्मित:
ऋन्मेष हिन्दी पण चालेल, पण आपल्या मायबोलीतुन जास्त आवडेल.:स्मित:

आभाळ भरुन येताच कविता गळायला लागतात
Gf भेटताच अवचित कविता सुचायला लागतात

कसला सेंटी लिहितो भाव वधारायला लागतात
कविबिवी कसली भंकस कॉमेंट्सही वाढतात

ट्विटर, FB भरुन कविता वहायला लागतात
कवितेचा महापूर बघून लोक पळायला लागतात... Happy

सावळ्याशी मिळताजुळता रन्ग तुझा
बरसलास कृपांमृत ओन्जळीत माझ्या
धन्य झाले मी धरणी पावोनी तव कृपा
सुखावलेस मम तन-मन तु कृष्णवर्णी मेघा

विनीता कविता छान आहे, पण नजरेसमोर हातात कागदी पन्खा घेतलेली देखणी तरुणी आली.:फिदी:( मस्त रवीनासारखी साडीत वगैरे)

सिमन्तीनी, आलिया भट?:हाहा: नको, रवीना, शिल्पाच बर्‍या.:फिदी:

तिच्यापेक्षा लहरी कधी पाऊसही नव्हता
पावसावर मी कधी रुसलोच नाही
तिचा पदर कोरडाच राहिला
भिजलेला मी तिला कधी दिसलोच नाही.

Pages