सांगायलाच हव!

Submitted by हर्ट on 17 August, 2014 - 11:12

हव हव हव
फेसबुकावर हे सांगायलाचं हव!

कुठल्या एअर-पोर्टवर उभे आहोत
कुठल्या टर्मिनलवर आहोत
कुठली फ्लाईट घेत आहोत
हे जगाला सांगायलाच हव!

कुठल्या रेस्तराँंटमधे
कुठली डिश चाखत आहोत
पदार्थानिशी हे सांगायलच हव
कोण-कोण सोबतीला आहे हे
टॅग करायलाच हव!

===
आणखी जर काही सुचत असेल तर सांगा. खूप वैताग येतो जेंव्हा लोक फेसबुकावर इतका शो ऑफ करतात तेंव्हा चीड येते ...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपला आपला चॉइस, मी पण हे लोकेशन्स टाकत असतो, पण त्यावर टिपणी पण असते, उदा. " द सँड्विचेस अ‍ॅट टर्मिनल वन डी ऑफ दिल्ली आर बेस्ट वे टु कमिट सुसाईड" इत्यादी!!!, कुठेतरी आपण जिथे आपटलो तिथे आपल्या मित्रमंडळी पैकी कोणी हापटी खाऊ नये किंवा आवर्जुन जावे, हे सांगायचा उद्देश्य समजा!!!, एखादे रेस्त्रां आवडले तर चार मित्रांस फोन करुन "जाऊन ये एकदा" सांगण्यापेक्षा सरळ "चेक इन " मारायचे!!! ज्याला इंट्रेस्ट आहे तो फेबु किंवा फोन इत्यादी वर विचारतोच!!! म्हणजे मी हा असा उपयोग करतो ह्या सोईचा

हां आता कोणी हगल्या मुतल्या हे वापरत असेल तर ते अति तिथे माती ह्या हिशेबाने चुकच!!! त्या अनुषंघाने आपला मुद्दा १००% मान्य Happy

आयला बी, "कुणी जाल का, सांगाल का" या अनिलांच्या कविते सारखा विस्तार तुला करता आला असता... असो. Happy

सोन्याबापुंशी सहमत. तुला अशा प्रकारच्या नाॅइजचा त्रास होत असेल तर अशा लोकांचे फिड्स तु ब्लाॅक करु शकतोस.

फेबु याचसाठी बनवलं आहे आणि आवडत नसेल तर आपलं (माझं)वय झालं असं मी समजतो .पूर्वी 'unsubsribe'चे बटण होते त्याने अमुक एकाचे अपडेटस थांबवता यायचे त्याला न कळता पण तुमचे त्याला दिसतात.पुन्हा सुरूही करता यायचे ,'ब्लॉक'मात्र फारच तुसडे बटण आहे .त्याला सूचना मिळते तुम्हाला हा मित्र टाळतो आहे .

मला तर बाबा आवडते मी जो आनंद किंवा त्रास भोगतेय तो माझ्या मित्र मैत्रिणींना सांगायला आणि त्यांनी शेअर केलेले पाहायला. या निमित्ताने मी त्यांच्या संपर्कात तरी राहते. काही काही मित्र मैत्रिणी इतके लांब गेलेत आणि त्यांची आयुष्ये इतकी वेगळी झालीत की आज त्यांच्याशी बोलायला गेले तर मी बरी, तु बरी ही विचारपुस झाल्यानंतर पुढे काय बोलणार हा प्रश्न पडतो. पण त्यांच्या शेअर केलेल्या गोष्टींवरुन त्यांच्या आयुष्यात काय घडतेय ते कळते आणि बरे वाटते. अप्रत्यक्ष विचारपुस केल्यासारखी वाटते. मी फेबुवर आजही टिकुन आहे याचे हे एक मोठे कारण आहे.

ज्यांना वेळ आहे ते कमेंट करतात, ज्यांना वेळ नाही ते लाइक करतात. मला न आवडणारे कोणी शेअर केले तर त्याला मी इग्नोर करते. त्याचा राग, चिड, वैताग इ.इ. करत बसायला कोणाला वेळ आहे? स्क्रोल करुन खाली गेले की लक्षातही राहात नाही कोणी काय शेअर केले ते.

खूप वैताग येतो जेंव्हा लोक फेसबुकावर इतका शो ऑफ करतात तेंव्हा चीड येते ...

बी, ज्या गोष्टींशी आपला अजिबात संबंध नाही त्या गोष्टी पाहुन वैताग, चिड वगैरे कशाला आणायची? सरळ स्क्रोल करत खाली जायचे. रच्याकने, हव मधल्या व वर टिंब दे. हवं असं हवं ते.

बरय की ओ गाडगीळ ते. जे काय आहे ते तोन्डावर बोललेले/ समजलेले उत्तम. पूर्वी मोबाईल्चे फॅड होते, आता फेबुचे.

आमच्या नात्यातल्या एकाने नोकरी मिळाल्यावर आणी लग्न ठरल्यावर प्रत्येक क्षणाचे अपडॅट दिलेत. आता हा बाबाजी बॉसकडुन पकडला नाही गेला हेच काय ते नवल. नाहीतर काम करताना चॅटिन्ग करणे आणी अपडेट्स टाकणे हा छन्द बनला होता.

आता लग्न झाल्यावर जरा शान्त दिसतोय.

तसं नाहीये .वर स्क्रोलचा उपाय दिला आहे तो बरोबर आहे .

समजा समारंभाच्या जागी बाजूला एखादा गट थट्टाविनोद करत असेल तर आपण ऐकले नाहीसे करतो तसे आहे .आपण एकाच समारंभात आहोत पण लक्ष देत नाही .unsubsribe अथवा scroll थोडेसे असे आहे .

'ब्लॉक ' म्हणजे एकत्र जायचे पण चक्क तोंडावर सांगायचे आवडत नाही .परंतू असे संस्थळावर करायचे नसते .

सहलीला गेल्यावर बरोबर एखादे 'सांपल '/टार्गेट असले की मजा येते( इतरांना )आणि त्याला यातून सुटायचे असते .दशकापूर्वी ही वृत्ती बदलली आणि तरुणवर्गाला सांपल होण्यात आनंद वाटू लागला .याचवेळी फेसबुक सुरू झाले आणि त्यावर माझी कशी फजिती झाली वगैरे पोस्ट बिनदिक्कत टाकल्या जाऊ लागल्या .मी कुठे गेलो .काय खाल्ले ,नवीन कपड्यात कशी दिसते वगैरे गौरवपूर्ण पोस्ट असतातच पण बस गाडी कशी चुकली ,बंद पडली वगैरे सांगून नक्कीच लाईक मिळतात .

छांदिष्ट लोकांसाठी रोजच कुंभमेळा आहे फेसबुक .गंगा मैली वगैरे काही नाही .मारा डुबकी .पाहू नका आणि तुम्हालाही पाहत नाही कोणी .

खरंय छळ असतो,
विमानप्रवास, महागडे हॉटेल आणि रिसॉर्ट, नवीन प्रदर्शित सिनेमा ... या गोष्टींचे कौतुक फार आढळते.

पण खरे म्हणाल तर होते काय, तर फेसबूकावर सारेच खास मित्र नसतात, तर इतके मित्र असतात की त्या प्रत्येकाच्या छोट्यामोठ्या गोष्टींचे ना आपल्याला कौतुक ना खंत ! म्हणून मग चीड येते बस्स !

उपाय काय -
१) सोपा उपाय - इग्नोर मारणे, पटकन स्क्रॉल करणे.
२) मिडीयम उपाय - जशास तसे, आपणही हा छंद बाळगणे.
३) कठीण उपाय - मोजकेच मित्र ठेवणे.
४) अघोरी उपाय - फेसबूक अकाऊंट डिलीटणे.