जे जगतो ते लिहिणारा

Submitted by विजय दिनकर पाटील on 14 August, 2014 - 03:00

परदु:खाचे स्तोम केवढे बरकतदायक आहे
जे जगतो ते लिहिणारा हा कोण कफल्लक आहे

दोघेही विश्वासाच्या दरडी कोसळत्या ठेवू
संबंधांचा घाट बंद होणे आवश्यक आहे

दृश्य जवळचे डोळ्यांच्या कक्षेत मावते कोठे
जरा दूर जा त्रयस्थ हो मग म्हण आकर्षक आहे

नसेल त्याच्याकडून झाले निराकरण दु:खाचे
धीर दिलेला सावरताना निश्चित पूरक आहे

तुझ्या मालकीच्या वस्तूंच्या गच्च कपाटामध्ये
दिलास कप्पा तूर्त एक हेही आश्वासक आहे
-----------------------
विजय दिनकर पाटील

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गझल आवडली.

दोघेही विश्वासाच्या दरडी कोसळत्या ठेवू
संबंधांचा घाट बंद होणे आवश्यक आहे

परदु:खाचे स्तोम केवढे बरकतदायक आहे
जे जगतो ते लिहिणारा हा कोण कफल्लक आहे

हे दोन्ही विशेष वाटले.
बहोत बढिया.

मस्त

परदु:खाचे स्तोम केवढे बरकतदायक आहे
जे जगतो ते लिहिणारा हा कोण कफल्लक आहे

तुझ्या मालकीच्या वस्तूंच्या गच्च कपाटामध्ये
दिलास कप्पा तूर्त एक हेही आश्वासक आहे<<<

मस्त शेर, मस्त गझल

आवडली. फक्त धीर...पूरक हे जरा कमी आवडले. सावरताना दिलेल्या धीराला पूरक म्हणणे कितपत संयुक्तिक याचा विचार करतो आहे.

परदु:खाचे स्तोम केवढे बरकतदायक आहे
जे जगतो ते लिहिणारा हा कोण कफल्लक आहे

वा ! वा !

आकर्षकही असाच सुरेख !

वाह !!

सुंदर गझल.

दृश्य जवळचे डोळ्यांच्या कक्षेत मावते कोठे
जरा दूर जा त्रयस्थ हो मग म्हण आकर्षक आहे
.. हा शेर तर खासच.