या पावसात माझी काया अजून विरुदे

Submitted by जयदीप. on 13 August, 2014 - 10:51

भरती पुसून गेली सारेच ठाव माझे
वाळूमधे कशाला लिहिलेस नाव माझे

या पावसात माझी काया अजून विरुदे
केव्हातरी जगाला दिसतील घाव माझे

स्वप्नासवे निघाली स्वप्ने कुणाकुणाची
ओसाड होत गेले टुमदार गाव माझे

मी विस्कटून जाणे होते ठरून गेले
तिकडे सुरूंग होते, जिकडे पडाव माझे

वार्यात जोर नाही विझवायचा मला पण
फुंकर चलाख जाते मोडून डाव माझे

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा मस्तच
इस खुशी मे एक शेर अपुन का ऐसा बन गयेला है ....

कोणीतरी तळा रे लवकर वडे तळा रे
बुरसून चाललेले आहेत पाव माझे

Lol
गम्मत कर रहेला है अपुन ..जास्ती दिल पे नै लेनेका जोशीभाउ ..क्या बोलतय !

बाकी जिकडे तिकडे की जागा बदल के देख सकते है ऐसा लग रहेला है

स्वप्नासवे निघाली स्वप्ने कुणाकुणाची
ओसाड होत गेले टुमदार गाव माझे

छान.
गझलपटू नएकु, एक गझलची प्रायवेट ट्युशन सुरू करावीत अशी इच्छा (माझ्यासाठी म्हणत नाहीए).

स्वप्नासवे निघाली स्वप्ने कुणाकुणाची
ओसाड होत गेले टुमदार गाव माझे

हा फार आवडला .

'अजुन' असे करावे लागेल ना ?

सर्वांचे मनापासून आभार...

न ए कु तुमचा आवाज ओळखीचा (आणि जवळचा ही वाटतो) Happy शेर (नेहमी प्रमाणे) मस्तच! Happy

सुशांत, अजून बरोबर आहे.. Happy

Happy