नवरात्रातील अष्टमीच्या पुजेसंबंधी माहिती हवी आहे.

Submitted by RJ28 on 12 August, 2014 - 09:03

माझ्या माहेरी आमच्या भागात ( बोरिवली, मुंबई) एका ठिकाणी नवरात्रात अष्टमीला पुजा आयोजित करतात. इच्छुकांनी आधी नाव-नोंदणी वगैरे करुन अष्टमीला तिकडे जाऊन पुजा करायची.
माझ्या सासरीही (मिरज) अशीच नाव-नोंदणी करून पुजा करता येते. आता लग्नानंतर मी पुण्यात आल्यामुळे इथलं काही माहिती नाही आणि सुट्ट्या घेऊ शकत नसल्यामुळे मला पुण्यात करता आली पुजा तर बरं पडेल. कोणाला असं ठिकाण माहित आहे का ? कॉ. नं. मिळू शकेल का ?

P.S. :- हा प्रश्न इथे इतक्या लवकर विचारण्याचे कारण, जर पुण्यातलं काही नाही जमलं तर मला ऑफिसमध्ये आतापासूनच सुट्ट्यांची तजवीज करावी लागेल...... म्हणून.
कृपया मदत करा. Happy

अनेक आभार्स...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या माहिती प्रमाणे पुण्यात नवा विष्णू मन्दिर आणि गणेश मन्गल कार्यालय (दोन्ही मंडई जवळ) अशी पूजा होते. फोन नंबर नाही. पत्ता सविस्तर सांगू शकेन. जाउन चौकशी करावी लागेल.

अर्जिता, माझ्या मते आता गणेश मंगल मधे ती पुजा होत नाही...मला शनिपाराजवळचेही एक ठिकाण माहिती आहे. तु मला संपर्कातुन तुझा नं पाठव किंवा मेल कर. मी तुला पत्ता सांगते. Happy

हर्षा ते शिवाजी मंदीर का कायसस आहे कुठे पुण्यात तिकडे करतात ही पुजा.. मी गेले होते एक वर्ष.. सावरकर म्हणुन एक बाई आहेत..

शनिवार पेठेत अप्पा बळवंत चौकाजवळ (केळकर रोड) एका मंगल कार्यालयात होते अशी पूजा, खूप छान व्यवस्था असते. जमलं तर जरूर जा.

मुग्धे, बरोबर आहे तुझही... आणि रावी तुम्ही म्हणताय ते अ ब चौकात नाहीये केळकर रस्ता, श्री मिसळ शनिपाराच्या समोरच्या रस्त्याने सरळ गेलं की आहे तो एक हॉल लक्ष्मीकृपा कार्यालयासमोर Happy

_हर्षा_ > नाही गं . मी म्हणत्येय ते शनिपाराजवळ्च नाही. ते अ.ब. चौकाजवळच आहे.