मूग किती उपयुक्त कडधान्य. एकतर पचायला तसं हलकं. आणि कोणत्याही रुपात त्याला खाता येतं. मला सुचलेले हे पदार्थ. तुम्हीही अजून सुचवा
1. मुगाच्या डाळीचे वरण - मूगडाळ हळद हिंग घालून कुकरमधे शिजवून नंतर त्यात मीठ घालून केलेले वरण
2. मूगाचे तिखट वरण- वरील वरणाला मिरच्या, कढिपत्ता अन लसूण यांची फोडणी दिलेले तिखट वरण
3. मूगाची डाळ - मोहरी, हिंग, कढिपत्ता, तिखट, हळद यांच्या फोडणीवर भिजवलेली मूगडाळ घालून मंद आचेवर शिजवून नंतर मीठ, कोथिंबीर घातलेली कोरडी मूगडाळ
4. कोशिंबीर- हिरवे मूग भिजवून, वाफवून, दही, मीठ, मिरची, साखर, कोथिंबीर अशी केलेली कोशिंबीर
5. उसळ - हिरवे मूग भिजवून, मोड आणून सालासकट, मोहरी, हिंग, हळद, तिखट, कांदा, टॉमेटो, यांवर परतून नंतर त्यात मीठ, गूळ,,अमसूल टाकून केलेली उसळ.
6. बिरडं - हिरवे मूग भिजवून, मोड आणून, सालं काढून , हिंग, हळद, कांदा, धणेजिरेपूड, तिखट यावर परतून, शिजवून, त्यात लसूण, ओलं खोब-याचे किंवा तळके वाटण घालून, चिंच, गूळ, मीठ घालून केलेले बिरडे.
7. स्प्राऊट्स - हिरवे मूग भिजवून, त्यांना मोठे मोड आणून, ते वाफवून इतर सँलेड्स मधे किंवा चायनिज पदार्थात वापरणे.
8.खिचडी- साधी वा भाज्यांसह केलेली. साधी वा तिखट
मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
अवल काकू , तू कर्तृत्ववान
अवल काकू ,
तू कर्तृत्ववान नाहीयेस का ??
मुगाचे डोसे कसे बर विसरलीस ?!
अग लिहीना तू आणि मी नाही बाई
अग लिहीना तू
आणि मी नाही बाई ते कर्तृत्ववान वगैरे.... मी आपली साधी गृहिणी, कलाकार, फारतर शिक्षक
त्यांना अजून कर्तृत्ववान
त्यांना अजून कर्तृत्ववान असल्याचा साक्षात्कार तेवढा झालेला नाही. त्यासाठी 'वेळ यावी लागते'.
अवल.... ग्रेट यू आर....माझ्या
अवल....
ग्रेट यू आर....माझ्या ऑपरेशननंतर माझ्या खाण्यापिण्यावर बंधने आली होती...तरीही डॉक्टरांनी उसळ - हिरवे मूग भिजवून, मोड आणून सालासकट...खाण्यामध्ये मेजर आयटम म्हणून ठेवा म्हणून सांगितले होते....अर्थात चवीपुरते तिखट इतकेच वापरावे...मीठ बिलकुल नाही...असा सक्त इशाराही दिला होता....वरील लिखाणात मूगाचा तोच प्रकार पाहून संतोष झाला.
आता तुझ्या घरी आल्यावरदेखील हेच खात बसणार मी.
मुगाचे कढण - भिजवलेले मूग
मुगाचे कढण - भिजवलेले मूग भरपूर पाणी घालून शिजवायचे. त्यात एखादं आमसुल चालेल. शिजल्यावर त्यातले पाणी गाळून घ्यायचे. वरून जिरे हिंग कढिलिंब यांची तुपातली फोडणी.
मुगाची पुरणपोळी - सेम ह. डाळीची करतो तशीच. उलट पिवळी मूगडाळ पुरणपात्रात घालायची कटकट नाही. घोटून घेऊन गूळ घालून जरा घट्ट करून घेतली की झाली.
मुगाचे आप्पे - हे कर्तृत्व दाखवून उरलेल्या मुगाच्या डोश्याच्या पिठाचे करतात
रोजच्या स्वयंपाकात जिथे जिथे बेसन वापरावे लागते तिथे मी मुगाचे भरड दळलेले पीठ वापरते.
बाकी मुगाचा शिरा वगेरे येऊ द्या...
धन्यवाद मयेकर ! '
धन्यवाद मयेकर !
' कर्तृत्ववान ' शब्दाबद्दल . हा शब्द लिहिण अवघड आहे. तस एकंदरीतच कर्तृत्ववान होणही अवघड आहे
काकू इथे बघा . कर्तृत्ववान होण्याची रेसीपी आहे.
www.maayboli.com/node/46883
भरत मामा मितान मस्त ग.
भरत मामा
मितान मस्त ग. मुगाचा शिरा... यम्मी
मूग गिळून गप्प बसणे हा
मूग गिळून गप्प बसणे हा वाक्प्रचार का आला असावा बरे?
स्प्राऊट भेळ (पाकृ काय
स्प्राऊट भेळ (पाकृ काय सांगणार... हेतेढकला झालं! )
भिजवलेले मूग किंचित वाफवून +
भिजवलेले मूग किंचित वाफवून + उ. बटाटा याचा एकत्र गोळा पापु मधे.. रगड्याच्या ऐवजी... अहाहा ओहोहो
मुगांबट (रेसिपी)
मुगांबट (रेसिपी)
रोजच्या स्वयंपाकात जिथे जिथे
रोजच्या स्वयंपाकात जिथे जिथे बेसन वापरावे लागते तिथे मी मुगाचे भरड दळलेले पीठ वापरते.>>> मितान घरी काढतेस का मिक्सर मधे भरड की गिरणीतून ह.डाळीप्रमाणे दळून आणतेस?
मूगाचे लाडू. अख्खे मूग
मूगाचे लाडू.
अख्खे मूग भाजायचे खमंग. मग ते जात्यावर भरडायचे. नंतर सुपात पाखडुन साल काढायची . अशा तर्हेने जी मूगाची डाळ तयार होईल ती दळून तिचे पीठ करायचे.
हे पीठ खूप दिवस टिकते. जेंव्हा लाडू करायचे असतील त्या वेळी जरुरीपुरते तूप पातळ करुन पिठात घालयचे आणि शक्यतो गूळ मिक्स करुन लाडू वळायचे. हे लाडू अतिशय खमंग आणि चविष्ट लागतात. आणि पौष्टिक सुद्धा आहेत.
शहरात अशा तर्हेने पीठ करणे शक्य नाही. कारण मिक्सर मध्ये भरडण्याचे काम होत नाही. तयार पीठ गावाहुनच यावे लागते.
शहरात काही ठिकाणी बेसनासारखे मुगाच्या डाळीचे लाडू करतात. ( बसनाऐवजी मूगडाळ पीठ) ) पण त्यांना वरील प्रकारे केलेल्या लाडवांची चव नाही.
आमच्याकडे मुंगी-मसरकी दाल
आमच्याकडे मुंगी-मसरकी दाल फेमस आहे. मुग आणि मसुराची डाळ (किंवा मलका मसूर --म्हणजे साल नसलेले आख्खे लाल मसूर) समप्रमाणात कुकरमध्ये हळद-मिठ घालून शिजवायचे. (प्रेशर आलं की शिट्टी व्हायच्या आत गॅस बंद करायचा.) या वरणाला थोड्याश्या तुपामध्ये किंवा तेलामध्ये जीरे-मेथ्या, भरपूर बारीक चिरलेलं आलं,(हवा असल्यास थोडासा चिरलेला लसूण), कांदा, टॉमॅटो, धण्याची पावडर, गरम मसाला /किचन किंग मसाला/चिकन मसाला (जो कोणता मसाला घरी असेल तो) इ पदार्थ घालून फोडणी करायची. फोडणीत घातलेला कांदा-टॉमॅटॉचा मसाला व्यवस्थित शिजून एकजीव व्हायला हवा.
मुगाच्या डाळीची वाटली डाळपण
मुगाच्या डाळीची वाटली डाळपण छान होते, आपण चणाडाळीची करतो तशी.
१)मुगागाठी २)मुगाचे पोळे (
१)मुगागाठी
२)मुगाचे पोळे ( कांदा + हि.मि.+ बारीक चिरलेले आले+ कोथिंबीर)
३) मुगाचे कढण( नारळाचे दूध+ गूळ घालून केलेली खीर)
४) मुगाची आमटी
हिरव्या मुगाचे डोसे /
हिरव्या मुगाचे डोसे / धिरडी.
मोड आलेले हिरवे मूग घालून केलेल्या वेगवेगळ्या कोशिंबिरी व रायते.
मूगडाळीची खीर / पायसम्
भिजवलेली पिवळी मूडा घालून केलेल्या कोशिंबिरी, भाज्या.
हि/पि मूडा घालून खिचडी
मो हि मू ढकलून केलेले सूप / सलाड / चाट / भेळ.
मूग पीठाची भजी / भिजवलेल्या हिरव्या मुगाला भरड वाटून नेहमीच्या भज्याच्या पिठात मिसळून + आलेलसूण पेस्ट इ. घालून पकौडे.
इतर मोड आलेल्या कडधान्यांसोबत हि मू कोशिंबीर / उसळ / चाट.
साध्या तांदळासोबत पि मू डा एकत्र शिजवून केलेला भात. (अवीट गोडीचा. नुसता खा / तूप-मीठ / दूध / दही घालून खा... पोटभर व तृप्ती देणारा पदार्थ)
मो हि मू नुसतेच तेल / तूप /
मो हि मू नुसतेच तेल / तूप / लोण्यात किंचित परतून, वरून नुसता चाट मसाला / तिखट-मीठ भुरभुरून खायलाही मस्त लागतात.
सौदिंडियन प्रकारची तूप, जिरे, कढीपत्ता, हिंग, लाल मिरच्यांची फोडणी - वरून दानशूरपणे ओला नारळ व कोथिंबीर पेरून, लिंबू पिळून.
मुगाची शिजलेली डाळ सारण म्हणून वापरून केलेल्या पुऱ्या / पराठे / कचोऱ्या वगैरे. मूग डाळीचे स्टफिंग वापरून सामोसे, वडे.
मस्तच
मस्तच
दुधी व पि मू डा सूप मस्त
दुधी व पि मू डा सूप मस्त लागते व पोटभरीचे होते.
गाजर व पिमूडा सूपही मस्त.
मोहिमू घालून इडल्या
मोड आलेले मूग वापरून सारण करून स्टफ्ड सँडविच
भिजवलेली पिमूडा फ्राय करून, मसाला - तिखट-मीठ घालून टोस्टवर
पोंगल राईस
मूग पॅटिस
याखेरीज मूडा ढोकळा / मूडा हलवा / टिक्की वगैरे प्रकार आहेतच!
पिमूडा भिजवून त्यात मिक्सर मध्ये हिमि, लिंबाचा रस वगैरे घालून वरून लाल मिरची, हिंगाची फोडणी वरून घालून चटणीपण करतात असे ऐकले आहे.
आमच्याकडे नवरा आणि माझी आई या
आमच्याकडे नवरा आणि माझी आई या दोघांनाही बेसन चालत नसल्याने फार्फार पूर्वीपासून
मुगाच्या पिठाचे पिठले, कांदा/बटाटा.मिरची भजी,पीठपेरल्या समस्त भाज्या , मुगाचेच फोडणीचे व साधे वरण असा बहुश: मूगमय स्वयंपाक असतो.शिवाय मोड आलेल्या मुगाची उसळ वगैरे प्रासंगिक . सुरुवातीला थोडे कुरकूर करणारे पक्षकार आता रांगेला लागलेत ( मूग गिळून बसलेत ) .
सो एकंदरीत मूग हे प्रकरण
सो एकंदरीत मूग हे प्रकरण आखुडशिंगी , बहुगुणी प्रकारातल दिसतय
अरे वा भारतीताई. आम्ही पण
अरे वा भारतीताई. आम्ही पण बरेच वर्षे मुगडाळीचे वरण, आमटी करतो, तूरडाळ आणतंच नाही मी, पाहुणे वगैरे येणार असतील तर आणते.
अन्जू , तूर + मूग ५०/५० असाही
अन्जू , तूर + मूग ५०/५० असाही प्रकार दीर्घकाळ चालला. आता विशुद्ध मूगराग.
एक तळलेली मूग दाळ मिळते जरा
एक तळलेली मूग दाळ मिळते जरा खारट असते ती पण मस्त लागते. एस्प. बीअर बरोबर.
बाकी स्प्राउट् स आमटी इत्यादी. तूप जिर्याची फोडणी घातलेली आमटी, गर म आंबेमोहराचा भात. आणि मूग डाळ खिचडी.
देवकिने लिहिलेले मुगागाठी अणि
देवकिने लिहिलेले मुगागाठी अणि मुगाचे कढ्ण हे पदार्थ आम्च्याकडेही परन्परेने आलेले आहेत.गोकुळष्टमीला कढ्ण करतात.
यशिवाय मुगाच्या डाळिची उसळ गोकुळष्टमीला उपासाला चालते.डाळ पाण्यात भिजवायची.डाळ तासाभरात चंगली भिजते.फोडणिला हिंग्,मोहरि,जिरे नंतर हिरवि मिरची,थोडे आले टाकायचे,भिजलेली डाळ टाकुन थोडे पणि घालायचे.हळद्,मिठ टाकायचे.लगेच शिजते.नुसति खायलाही चांगली लागते.
मूगडाळ
मूगडाळ पालक्/चार्ड्/मेथी/राजगिरा जोडीला भात किंवा पोळी/फुलके
माझी आजी मूग भाजुन त्याचे पीठ पथ्याचे आणि पौष्टिक म्हणून वापरायची - खास करुन लहान मुले, बाळंतीण, आजारातून उठलेली, सगळ्यांसाठी हे पीठ वापरले जायचे. बेसनाच्या लाडवा ऐवजी या पीठाचे मूगदळाचे लाडू असायचे. थालिपिठ खायची परवानगी नसलेल्या मंडळींसाठी हे पीठ आणि वडीचे आळू, हळद, तिखट, मीठ, त्यात भिजवताना थोडा चिंचेचा कोळ आणि गूळ असे घालून मूगाचे थापटे करायची. स्स! नुसत्या आठवणीनेच तोंडाला पाणी सुटले.
दिल्ली साइडला मुगाचे पीठ रेडी
दिल्ली साइडला मुगाचे पीठ रेडी मिळते त्याचे चीले छान लागता त. फ्रेश आणि लाइट रेसीपी आपल्या टॉमाटो आम्लेट पेक्षा.
कोवळे पडवळ किसून, मीठ घालून
कोवळे पडवळ किसून, मीठ घालून त्यात भाजलेली मुगाची डाळ घालायची. त्याला सुटलेल्या पाण्यात मुगडाळ भिजते. मग त्यात चुरडलेली मिरची व दही घालायचे. वरून फोडणी द्यायची.
मूग जरा भाजून ते शिजवायचे. मग त्यात गूळ, नारळाचे दूध व वेलची घालायची.
मूग असेच भाजून ते शिजवायचे आणि मग त्यात नेहमी प्रमाणे साहित्य ( हळद, हिंग, तिखट, कोकम ) घालून
घट्ट्सर आमटी करायची. वरून फोडणी द्यायची.
मेथीची ताजी भाजी तेलात परतायची. मग त्यात मूगडाळ घालून शिजवायची. वरून लसणीची फोडणी द्यायची.
मूगाच्या डाळीचे सांडगे करायचे.
हे पिठ ओले असतानाच त्याचे गोळे करून वाफेवर ( थेट पाण्यात टाकले तर थोडे बेसन टाकायचे ) शिजवायचे.
मग त्यावर कच्चे तेल घालून खायचे.
आधी मूगडाळ भाजून घ्यायची, ती अर्धी भाजली कि त्यात तांदळाच्या कण्या भाजायच्या. मग त्यात पाणी घालून शिजवायचे. मग त्यात गूळ, वेलची व ओले खोबरे घालून शिजवायचे. घट्ट झाल्यावर वड्या करायच्या.
मूगाची डाळ भिजत घालून वाफेवर शिजवायची मग जिरे,हिरवी, हळद, हिरवी मिरची यांच्या फोडणीवर मोकळी
परतायची.. वरून लिंबू पिळायचा.
हरभर्याच्या पाल्यात वाटलेली मूगडाळ घालून त्यात आवडीप्रमाणे मीठ मसाला घालून गोळे करायचे. त्यापैकी अर्धे तळून घ्यायचे. हरभर्याच्याच पाल्याची पातळसर भाजी घालून त्यात न तळलेले गोळे शिजवायचे आणि वाढतेवेळी तळलेले गोळे घालायचे.
पिवळ्या मुगाची उसळ - आमसूल,
पिवळ्या मुगाची उसळ - आमसूल, गूळ घालून - फुलके / भाकरी / गरमागरम भात / गार भात - सर्वांबरोबर अति रुचकर लागते. सोबत साजूक तुपाचा गोळा. लिंबाचा रस, कोथिंबीर ऐच्छिक.
Pages