बच्चे कंपनी आणि घराच्या रंगणार्‍या भिंती

Submitted by नलिनी on 8 August, 2014 - 12:21

माझ्या पाहाण्यात बर्‍याच घरात मला हि समस्या दिसली की त्या घरातील लहान मुले बर्‍याचदा पेन, स्केचपेन, पेन्सिल वापरून भिंतींवर लिखाण करतात, अर्थात त्या रेघोट्याच जास्त असतात.
आपण कोणाच्या घरात भाडेकरू म्हणून राहात असू तर आपल्याला भिंती पुर्ववत करून द्याव्या लागतात. स्वतःचे घर असेन तर हौशेने दिलेल्या रंगावर आपल्याला ह्या रेघोट्या नको असतात. तर आपण ह्यासाठी काय करू शकतो ह्यासाठी हा धागा.

१) घरात मुल रांगायला लागले ही की शक्यता गृहीत धरायला हवी की आपले मुल उद्याला भिंतींवर लिहिणार, त्यासाठी आधीपासूनच उपाययोजना करायला हव्यात.

२) मुलांना आपण काही शिकवताना, चित्र काढून दाखवताना, अक्षरं शिकवताना, फुले, चित्र काढून दाखवताना वापरात येणारे कागद घरात एखाद्या ठराविक ठिकाणी ठेवावेत. आपणच मुलांसमोर काहिही लिहिताना ते कागद वापरावे. मुलांसोबत त्यावर लिहित असताना सकारात्मक सांगावे की आपण लिहायला हा कागद वापरतो. त्यांच्यावर न लादता पण वारंवार सांगून आपण त्यांना लिखाणासाठी ठराविक कागद वापरायची सवय लावू शकतो.

आपण जर मुलांना नकारात्मक सुचना करत असू तर आपल्या असे लक्षात येईल की मुलं नको म्हणून ही तेच काम करत असते. म्हणून सुचना करताना हळू आवाजात आणि सकारात्मकच असायला हव्या.

३)जी मुलं आता जरा मोठी झालीत आणि त्यांना भिंतीवर लिहीणे आवडते त्यांच्यासाठी भिंतीवर तीन-चार मोठे कागद लावयचे. त्या कागदावर बॉर्डर आखायची. एका कागदावर पेनाचे, दुसर्‍यावर पेन्सिलचे, ब्रशचे तर चौथ्यावर स्केच पेनचे ( जी साधनं वापरात असतील त्यानुसार) चित्र काढायचे आणि मुलांना हे सातत्याने सांगायचे की ठराविक साधनाने ठराविक पेपरवरच लिहायचे आणि तेही बॉर्डरच्या आत. हे करत असतानाच क्रः २ चा मुद्दा ही आचरणात आणायचा.

४) मुलं एकाएकी हा बदल स्विकारणार नाहीत त्यामुळे त्यांना जरा वेळ द्यायला हवा. तसेच सोबत मुलांना स्लिपटॉक द्यायचा. मुल झोपल्यानंतर ५ ते १० मिनिट ह्या कालवधीमधे मुलाला हे सांगायचे की तो / ती एक गुणी बाळ आहे. त्याला/ तिला लिहायला चित्र काढायला खूप आवडते. चित्र काढताना तो अमुक ठिकाणी ठेवलेल्या कागदांचा वापर करतो. कींवा भिंतीवर लावलेल्या कगदावरच लिहितो.

तुमची मतं आणि तुमचे अनुभव नक्की शेअर करा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी सुरुवातीला भिंतीवर्/कार्पेटवर काढलेले रेघोटे बघून अपसेट व्हायचे पण एक घर विकताना स्वतः त्या भिंती पेंट केल्या. घराचे पेंट टच अप करणे इतकं सोपं (आणि स्वस्तही) असताना या कारणासाठी रागवावे असे यानंतर कधीही वाटले नाही. अर्थात मी भिंतीवर लिहायला प्रोत्साहन देत नाहीच.

मेधाची चॉकबोर्ड ची कल्पना मस्त आहे. पण मग भिंतीवर काढलेल्या कलाकृती जतन होणार नाहीत त्यामुळे तो पर्याय बाद. लेकीने सुरुवातीला कलर केलेली चित्रे बघण्यात मी रमून जाते. त्यामुळे पेपर हा बेस्ट मार्ग आहे माझ्या साठी.

टच अप म्हणजे पुर्ण भिंत /घर पुन्हा रंगवणे नाही. टच अप म्हणजे फक्त जिथे रेघोट्या मारल्या आहेत तिथे हलक्या हाताने ब्रश ने ओरिजिनल रंगाचा हल्कासा थर देणे. एरिया मोठा असेल तर मग आधी प्राइमर मारून मग रंगाचा थर.

मुळात घर हे येणार्‍या पाहुण्यांनी खुश व्हावे यासाठी नसून घरातील सदस्यांच्या(अज्ञान वा सज्ञान दोन्ही) आनंदासाठी व कम्फर्टसाठी आहे हे एकदा ठरवले की गोष्टींची उत्तरे मिळत जातात.

मुळात घर हे येणार्‍या पाहुण्यांनी खुश व्हावे यासाठी नसून घरातील सदस्यांच्या(अज्ञान वा सज्ञान दोन्ही) आनंदासाठी व कम्फर्टसाठी आहे >>>> +१००००००००००००००००००००००००

सध्या जेलपेननं स्वतःच्या हातापायावर डूडल करणे, डिझाईन्स काढणे वगैरे सुरू आहे. आपणही यातून गेलो आहोतच की! >>> मामी मी अजूनही करते हे. काल रात्रीच बसल्या बसल्या जेलपेननी माझ्या मोबाईलच्या पांढर्‍या कव्हरवर मेंदी डिझाइन काढलंय मी. ते पुरेसं वाटलं नाही म्हणून त्या पेननी हातावर २ टॅटूज काढले. मजा येते.

मुळात घर हे येणार्‍या पाहुण्यांनी खुश व्हावे यासाठी नसून घरातील सदस्यांच्या(अज्ञान वा सज्ञान दोन्ही) आनंदासाठी व कम्फर्टसाठी आहे >>>> +१००००००००००००००००००००००००

मुळात घर हे येणार्‍या पाहुण्यांनी खुश व्हावे यासाठी नसून घरातील सदस्यांच्या(अज्ञान वा सज्ञान दोन्ही) आनंदासाठी व कम्फर्टसाठी आहे हे एकदा ठरवले की गोष्टींची उत्तरे मिळत जातात.

>>> सौ टके की बात, नी.

ज्यांना घराच्या भिंती रंगलेल्या चालतात त्या पालकांचे अगदी मनापासून कौतूक करावेसे वाटते.
पण काही पालकांना नाही आवडत. त्यांनी मुलांना न मारता न रागावता पर्यायी व्यवस्था करून द्यायला हवी.

सई, मी समस्या हा चुकीचा शब्द वापरला हे तू लिहिल्यावर जाणवले मला. मला ही मुलांची समस्या आहे असे म्हणायचे नाही. पण ह्या कारणाने त्रस्त झालेले बरेच पालक मी पाहीलेत म्हणून मला हि त्यांची समस्या वाटली खरं तर.
रेघोट्यांच्या माध्यमातून मुलं सुरवातीला व्यक्त होत असतात म्हणूनच त्यांना त्यापासून अडवू नये. ते मनसोक्त करू द्यावे पण त्यासाठी जसे मेधाने सांगितलेली चॉकबोर्ड भिंत, सईने वापरल्याप्रमाणे ठराविक उंची पर्यंत आर्टीस्टीक पेपर, शर्मिलासारखे एखादी भिंतच मुलांना देऊन टाकणे, मोठा फळा लावणे ह्याचा वापर करायला हवा.

काहींना घरांना नव्याने रंग देणे हे स्वस्त आणि परवडण्यासारखे वाटते ते उत्तमच आहे पण बर्‍याच जाणांना हा खर्च जास्तीचा वाटू शकतो आणि मग तिथे मुलांना मारून, रागवून हे असे रंगकाम करण्यापासून परावृत्त केले जावू शकते. त्या पालकांनी मात्र रागावणे, मारणे हे थांबवावे आणि मुलांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध कराव्यात.

ठराविक वयात मुलांचे मोटर स्किल विकसित होणे गरजेचेच असते. हाही त्यातलाच एक भाग. मुलांच्या वयाला साजेसे, तुमच्या उपस्थितीत हाताळता येतील असे रंगाचे माध्यम बदलत राहायला हवे. मुलं जेव्हा चितारत असतात तेव्हा त्यात लुडबूड करू नये. त्यांचे रंगकाम संपले की काय काढलेस? हे विचारायला ही विसरू नये. जे काढलेय ते सुधारण्याच्या सुचना मुळीच देवू नये. अगदी न बोलता येणार्‍या त्या दिवसात जर तुम्ही मुलांना रंगाच्या मुळ छटांची ओळख करून दिलीत तर लवकरच मुलं इतर रंगछटां त्यातला फरक लिलया ओळखू लागतात.

गजानन, तुम्हाला सहकुटूंब आमंत्रण आहे माझ्याघरी. कधी येताय? Happy
शांडिल्यला मी पुर्वीपासून त्याच्या कलाकारीसाठी फळा, कागद हे उपलब्ध करून दिले. त्याने फारसे कधी भिंतीवर लिहीले नाही. तो ज्या डे केयर मधे जातो तिथे ही मुलांना भरपूर रंग, कागद वापरण्याची मुभा आहे. त्यांची चित्र तिथे थीम नुसार भिंतीवर नावानीशी लावली जातात. मी पण त्याचे चित्र घरातल्या एका भिंतीवर सातत्याने लावत असते. हल्ली आमच्याकडे थॉमस द इंजिन आणि त्याचे सवंगडी सातत्याने चितारणे सुरू असते आणि घरात लावलेल्या फ्रेमसवर, खाली-वर, आजूबाजूला ते लावणे ही.

नी, तुझ्या मतांशी सहमत.

छान आढावा घेतलास नलिनी.

हो घरभर रंगरांगोटी चालत नसेल तरीही अनेक उपाय आहेत. जोवर मुलांना चित्रकलेच्या माध्यमातून व्यक्त होण्यास संधी मिळत आहे तोवर ठीकच आहे. प्रत्येकाने आपल्या सोयीनं ती मुलांना नक्की उपलब्ध करून द्यावी.

सगळे प्रतिसाद नाहीत वाचले.पण एक अनुभव.लहानपणी मलाही ही सवय होती.आणि मस्तपैकी सगळ्या भिंती कव्हर झालेल्या होत्या.पण कधी कोणी ओरडलं,मारलं नाही.घरी भिंती मिळतायत म्हणून बाहेर लोकांकडे गेलं की चिडीचूप.
मग जेव्हा रंगरंगोटी केली गेली तेव्हा बजावून एक भिंत खास दिली गेली.आई-बाबांची बदलीची नोकरी असल्याने सगळी घरं भित्तीचित्रं भरून झालीत.पण कधी घरमालकांनी तक्रार अशी नाही केली.ही सवय एवढी लागलीये की आताही चित्र काढायला एक भिंत अखंड ठेवावी लागली. Happy मस्त वाटतं...परत लहान व्हायचा बेस्ट पर्याय.भिंती रंगवा.

जर हे कोण करत असेल तर त्याला ते करु द्या.फक्त शेजार्‍यांच्या घरी सूचना दिलीच पाहीजे.

बाकीच्या भिंतीवर काढल्यास मार द्यावा.<<<<<<
समजावून सांगणे वगैरे पायर्‍या गाळूनच टाकायच्या एकदम? सहीये
@श्रद्धा समजावून सांगणे हि कुठल्याही गोष्टीची पहिली पायरी असतेच. त्याकरता वेगळे काही सांगण्याची जरुरी नाहीये.आणि एखाद्या पालकाने " अरे बापरे आत्ता भीती रंगवायला लागतील आणि भिंत रंगवण्याचा खर्च आपल्याला काही परवडणार नाही" असा विचार करून जर मुलाला मार दिलाच तर ती काय त्याची चूक नाही ठरत. प्रत्येक पालकाची शिस्त लावण्याची पद्धत त्याच्या स्वभावानुसार /आर्थिक परिस्थितीनुसार आणि बर्याच बाह्य गोष्टींवर ठरत असते त्यात सही अस काहीच नाही Happy

<<आणि सरसकटीकरण नका करू एकदम! की घरात भिंतींवर लिहिणारी मुलं बाहेर सार्वजनिक मालमत्ता खराबच करतात वगैरे>> हे मी माझे विचार /मत सांगितले आहे . ते कोणाला पटतील /कोणाला नाही पटणार Happy

<<मग त्यांच्या पुरती अशी एकादीच भिंत ठेवावी . त्याच एका भिंतीवर रेघोट्या काढण्यासाठी त्याला सांगावे.>> हे मीच लिहिलेले कोणी वाचले नाही काय ?

नलिनीने म्हटल्याप्रमाणे "ज्यांना घरांना नव्याने रंग देणे हे स्वस्त आणि परवडण्यासारखे वाटते" त्यांनी भिंती रंगवायला मुभा द्यावी अन्यथा मुलाला रंगवायला /रेघोट्या मारायला भिंतीवर टांगणारा मोठा फळा घेऊन द्यावा किव्वा हातात पाटी द्यावी आणि याच्यावर तू रेघोट्या मारू शकतोस /चित्र काढू शकतोस असे समजावून सांगावे .

गंमतीशीर विषयावरील बाफ संध्याकाळी वाचला होता प्रतिसादांसकट! अनुभव काहीच नसल्यामुळे मन थेट मी लहान असतानाच्या वयात गेले आणि दोन भिंती मी बॉलपेनने रंगवून वेगवेगळ्या आकाराचे मासे त्या भिंतींवर काढले होते ते आठवले. हेही आठवले की आई, जिची कडक शिस्त असायची ती त्याबाबत काही म्हणाली नव्हती आणि बाबा जे कधीही रागवायचे नाहीत त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला होता की असे करू नये. आता वाईट वाटते, त्यांना त्या कुरूप भिंती मुलाच्या प्रेमाखातर सहन कराव्या लागल्या असतील आणि कदाचित काही महिने आधीच रंगकाम करावे लागले असेलही! असो!

पण तूर्त मात्र असे वाटते की मुलांना हे करण्यापासून परावृत्त करणे योग्य ठरेल. भले मुलांचा आनंद त्यात असेलही, पण तरीही असेच वाटते. असे वाटण्याचे कारण हे की आजकाल रंगकाम भलतेच महागलेले आहे. (कधी नव्हते म्हणा, तरी आजकाल अतीच खर्चीक वाटते). ह्याशिवाय, भिंती रंगवण्याव्यतिरिक्त इतर अनेक मनोरंजनाची साधने आजच्या मुलांना उपलब्ध आहेत.

बाकी आजची मुले, उदाहरणार्थ पाच वर्षाची मुले, आपण पाच वर्षाचे असताना जे काय होतो त्याहून अनेक पटींनी स्मार्ट आणि 'समजण्याची क्षमता' असलेली आहेत असे वाटते.

<मग त्यांच्या पुरती अशी एकादीच भिंत ठेवावी . त्याच एका भिंतीवर रेघोट्या काढण्यासाठी त्याला सांगावे>

कदाचित चित्र काढण्याला, काही लिहिण्याला रेघोट्या मारणे समजणे हा फरक असावा.

एकदा का भिंत त्यांच्या हातात सोपवल्यानंतर रेघोट्या मारल्या काय आणि चित्र काढले काय. कदाचित त्यांच्या रेघोट्यानमध्येच एखादे चित्रही दडलेले असेल Happy किव्वा त्यांचे लिहिणेही नक्षीदार असू शकते Happy

भिंतीवर चित्रं काढणार्‍यांना जग अपुरं वाटत असतं.कुठल्यातरी गोष्टीची तीव्र कमतरता किंवा त्यापुरती एक पोकळी वाटत असते.किंवा भावना 'एक्सप्रेस' करताना अडथळा येत असतो.मितभाषी मुलं भिंतींचा जास्त वापर करतात. थोडक्यात अंतर्मुख व्यक्ती.भावनांचा कोंडमारा किंवा योग्य असणार्‍या,पटणार्‍या गोष्टी ज्या जग समजून घेऊ शकत नाही किंवा त्या शब्दात बांधता येत नाही तेव्हा 'असा' कॅनव्हास योग्य असतो.

मस्त लिहिलेस नलिनी.
सुरवातीला भिंतींवर मोठे कागद चिट्कवले होते ते मुलीला खुपच आवडले होते. भाड्याच्या घरात सतत रहावे लागल्याने मी देखील मुलीला कागद ,कार्डबोर्ड, मग वही पासुन पिझ्झा बॉक्स, डायपर बॉक्स, सामानाचे मोठे कागद जे काही घरी रंगवायला, लिहायला देता आले ते देत राहीले.
आपले घर छान दिसायला आपणच काळजी घेतली पाहिजे ह्याची जाणीव करु दिल्याने तिने कधीही भिंती रंगवल्या नाहीत. मुल रेघोट्या मारायला सुरुवात केली की फक्त भिंतीच नाही तर किचनचा पांढरा ओटा, टाईल्स पासुन कुठेही लिहीत जातात.

वॉव .. रंगवलेल्या भिंती म्हणजे घरात लहान मूल बागडतेय याच्या, चैतन्य बहरतेय याच्या खुणा .. आपली तरी फुल्ल परमिशन .. पण माझी बायको पेश्याने शिक्षिका असल्याने तिचे याबाबतचे विचार काय आहेत ते बघायला हवेत.. चांगला टॉपिक दिलात डिस्कशनला Happy

तरीही, जर घर भाड्याचे असेल आणि प्रश्न खर्चाचा असेल तर पैश्याचे सोंग घेता येत नाही, मग ते टाळावेच. त्यासाठी पहिल्या पोस्टमधील आणि नंतरचे प्रतिसादांतील उपायही चांगले आहेत. हा प्रकार इतरांच्या घरात होऊ नये यासाठी काळजी नक्कीच घ्यावी आणि ते तितकेसे कठीण जाऊ नये जर मुलांना इतरांच्या घरात कसे वागावे हे ओवरऑलच शिकवले तर... असो, पण ज्यांना शक्य असेल त्यांनी घराला घरपण येऊ द्यावे कागदाच्या तुकड्यावर रंगकाम करणे आणि घराच्या मोठाल्या भिंतीचा कॅनव्हास करने यात फरक तर आहेच. घर आपलेच असले तर पुन्हा नव्याने न रंगवता ठेवल्याच त्या आठवणी पुढच्या रंगाची वेळ होईपर्यंत तरी काय हरकत आहे Happy

सगळे लहान मुलांबद्दल का बोलताय. माझ्या १८ वर्षाच्या मुलीनी तिच्या रूमचा चांगला wall paper काढून भिंती वर रंगकाम केल. मस्त दिसते ती भिंत आता

काल मी जालावर एक फोटो पाहिला त्यात पूर्ण खोलीला लेगो चे बेस शीट लावले होते व त्यात लेगो चे ठोकळे लावले होते. असे काही पण मजेशीर वाटते.

Pages