गणेशोत्सव वर्गणी का खंडणी ?

Submitted by ferfatka on 7 August, 2014 - 13:16

गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली असून, मंडळातील कार्यकर्ते टोळक्याने वर्गणी गोळा करताना सध्या दिसत आहेत. मोठमोठ्या गणेशमूर्ती, अवाढव्य देखावे, सजावट, गाणी, सेलिब्रिटी यांमुळे गणेशोत्सवाला वेगळेच स्वरूप येऊ लागले आहे. अनेक वेळा सामान्यांच्या काळजात धस्स होते ते वर्गणीच्या जाचामुळे. वर्गणी ऐच्छिक असावी. सोसायटी, गल्ली, वॉर्ड, बच्चे कंपनीची मंडळे, नव्याने सुरू होणारी मंडळे अशा अनेक मंडळांना एकाच व्यक्तीला गणेशोत्सवासाठी वर्गणी देण्याचे काम करावे लागत आहे. १५ ते २० मंडळांचे कार्यकर्ते एकत्र येऊन मागील वर्षाचे पावती पुस्तक दाखवून यंदा किमान ५० रुपये तर जादा वाढ करावी अशी विनंती (?) करीत आहेत. वर्गणी न दिल्यास अशांवर रोष ठेवण्यात येतो. आजची महागाई पाहता वर्गणी केवळ रोषणाई आणि सजावटीवर खर्च न करता समाजोपयोगी कामावर खर्च करता आली, तर अधिक चांगले होईल. सध्या महागाई वाढली आहे. तिला कंटाळलेल्या सर्वसामान्य माणसावर वर्गणीचे हे ओझे अशाने थोडे तरी कमी होईल. गणेशोत्सवातून जो सामाजिक संदेश लोकांपर्यंत पोहोचायला हवा, तो पोहोचत नाही आणि उत्सवाचे झगमगते अर्थकारण कोणाही सामान्य माणसाला परवडण्यासारखे नाही. त्यामुळे वर्गणी मागताना मंडळांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गणपतीच्या मूर्तीला जर चालता आलं असतं तर मागच्या वर्षीचा प्रकार बघुन बाप्पा नक्कीच उठुन गेला असता.

उठुन जाता जाता ज्यांनी हे केले त्यांना लाथा घालुनच मग जिथे जायचे तिथे गेला असता.

फक्त गणपती उत्सवच नाही तर बरोबरीने दहिहंडी, नवरात्र, म्हसोबा, आंबेडकर जयंती, शिव जयंती असलेही अनेक उत्सव येतील ह्या धाग्यात.. सगळ्याच उत्सवासाठी वर्गणी मागायला सुरुवात झाली आहे आता..

आमच्याकडे गुरु नानक जयंती, गुरु गोविदंसिंग जयंती, अय्यप्पा, दत्तजयंती याकरता वर्गणी मागायला येतात. एकदा इस्कॉनच्या कृष्णजन्मासाठीही पैसे मागायला आलेले.

एकदा 'सरस्वती पूजन' म्हणून एक फोटो ताटात ठेवून वर्गणी मागायला, टिपिकल टगी दिसणारी मुलं आली होती. कितवीत आहात विचारल्यावर ७वी की ८वी काहीतरी सांगितलं, अन जवळच्या शाळेचं नांव.

सोबत येतो शाळेत, अन तुमचं सरस्वतीपूजन स्पॉन्सर करतो म्हट्लं, तर पळून गेली.

दुर्दैवाने, वर्गणी मागणार्‍यांतल्या बहुतेकांच्या दातावर टिपिकल गुटखा खाऊन रंगतात तसे किटण चढल्याचे दिसत होते..

<<फक्त गणपती उत्सवच नाही तर बरोबरीने दहिहंडी, नवरात्र, म्हसोबा, आंबेडकर जयंती, शिव जयंती असलेही अनेक उत्सव येतील ह्या धाग्यात.. सगळ्याच उत्सवासाठी वर्गणी मागायला सुरुवात झाली आहे आता..>> अगदी बरोबर. धाग्याचे नाव बदला,
मला तर अशा भीका मागणार्‍यांचा वीट आला आहे. अरे तुम्हाला काय करायचय ते तुम्ही करा ना आम्हाला का ओढताय त्यात आम्हाला इंटरेस्ट नसेल तर..

Kamal aahe.lokmanya tilkani lokan na ektra yenya sati ganeshostav stapit kela aani aapla samaj ektra yeto ter tumhi tyana gund bolta?koni bhikari bolto chotya chotya goshti madhun tumche gyan je pajrat te tumchya kade theva.baki dharmacha nanganach chalto vatat.kon bolt vadal aale pahije.mandap padla pahije.kay vichar aahe. Aevadha ganeshtovacha tras hot assel ter dusra choice shodha. Aani ho hindustanat hindu che san sajre honar.uesless

Correct @ manojmane979.

You are a verry important part of the "full package". And the sooner people here realise it, the better..

अर्रे काय हे? गणेशोत्सव बंद करा, नवरात्री बंद करा, मग हिमालयात जाऊन रहा ना.
ध्वनीप्रदुषणाचा मुद्दा मान्य, पण म्हणुन काय सण बंद करायचे?
ठीकठीकाणी जाऊन मुर्त्या , त्यांची विशेषता, आरास, मखर, देखावा बघणे त्यासाठी तब्बल २-३ तास लाईनीत उभे राहणे, किती एन्जॉयेबल आठवणी होत्या. जीव तळमळतो आज पण ह्या सर्व गोष्टींसाठी.

Pages