गणेशोत्सव वर्गणी का खंडणी ?

Submitted by ferfatka on 7 August, 2014 - 13:16

गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली असून, मंडळातील कार्यकर्ते टोळक्याने वर्गणी गोळा करताना सध्या दिसत आहेत. मोठमोठ्या गणेशमूर्ती, अवाढव्य देखावे, सजावट, गाणी, सेलिब्रिटी यांमुळे गणेशोत्सवाला वेगळेच स्वरूप येऊ लागले आहे. अनेक वेळा सामान्यांच्या काळजात धस्स होते ते वर्गणीच्या जाचामुळे. वर्गणी ऐच्छिक असावी. सोसायटी, गल्ली, वॉर्ड, बच्चे कंपनीची मंडळे, नव्याने सुरू होणारी मंडळे अशा अनेक मंडळांना एकाच व्यक्तीला गणेशोत्सवासाठी वर्गणी देण्याचे काम करावे लागत आहे. १५ ते २० मंडळांचे कार्यकर्ते एकत्र येऊन मागील वर्षाचे पावती पुस्तक दाखवून यंदा किमान ५० रुपये तर जादा वाढ करावी अशी विनंती (?) करीत आहेत. वर्गणी न दिल्यास अशांवर रोष ठेवण्यात येतो. आजची महागाई पाहता वर्गणी केवळ रोषणाई आणि सजावटीवर खर्च न करता समाजोपयोगी कामावर खर्च करता आली, तर अधिक चांगले होईल. सध्या महागाई वाढली आहे. तिला कंटाळलेल्या सर्वसामान्य माणसावर वर्गणीचे हे ओझे अशाने थोडे तरी कमी होईल. गणेशोत्सवातून जो सामाजिक संदेश लोकांपर्यंत पोहोचायला हवा, तो पोहोचत नाही आणि उत्सवाचे झगमगते अर्थकारण कोणाही सामान्य माणसाला परवडण्यासारखे नाही. त्यामुळे वर्गणी मागताना मंडळांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

घरच्या गणपतीसाठी पावतीपुस्तक छापून घ्या. त्यांनी वर्गणी मागितली की आपलं पावतीपुस्तक पुढे करून त्यांच्याकडे वर्गणी मागा>>>>:फिदी: हे आवडले.

रिया, कुमार केतकर हे लोकसत्ताचे सम्पादक.

गुलमोहर - प्रकाशचित्रण ??>>>> सहज फेरफटका मारायला गेले अन गल्ली चुकले.:फिदी::दिवा:

निधप
ते तुम्हाला उद्देशून नव्हत. गैरसमज नसावा. ज्यांच्यासाठी होत त्यांनी आपली खोचट प्रतिक्रिया दिलेली आहे.

मी असे खंडणी/वर्गणी मागायला आले की केव्हाच पैसे देत नाही (आमच्या कडे सध्या १०००/- च्या पावत्यांचा रेट चालु आहे), सर्व माझ्याकडे खुप रागाने पाहतात पण मला काहीच फरक पडत नाही. माझ्याशी भांडतात पण माझी उत्तरे पाठ असतात , एकाने मला सांगितलं की तुम्ही देवासाठी पैसे देत नाहीत मग आम्ही सण कसे साजरा करणार तर मी त्याला सांगितलं तुमच्या पैशाने करा की, आम्ही पण घरी गणपती बसवतो पण स्वखर्चाने; तरीही गणपती बसवण्याच्या शेवटच्या दिवशीपर्यंत येउन येउन भांडत असतात (यात सरकारी शिक्षक , बँकेत काम करणारे, पॉलीटीकल पार्टीवाले सर्वांचा समावेश) , मी दुर्लक्ष करते, एकदा एक तृतीयपंथीयाचं त्यांच्या भागातल्या गणेशोत्सवासाठी वर्गणी मागण्यासाठी येणं झालं, अतिशय सभ्य भाषेत कीतीही रुपये दिले तरी चालतील हे ऐकल्यावर मी १०१/- देउन टाकले.

बाकी इथेही अगदी जागोजागी गणेशोत्सव होतात; आमच्या इथले गणपती गुंड लगेचच मारामारीवर येणारे आहेत, एका दुकानदाराकडुन तर १०,०००/- मागितले होते, वर्षातुन १०,०००/- गणेशोत्सवासाठी काढुनच ठेवायचे असे एकजण म्हणुन गेला, अशी एकट्या बोईसर मध्ये २० हुन जास्त मंडळे आहेत , बिचार्‍या दुकानदारांनी काय करावं??

गणपतीतच एकदा एका कामासाठी सन्ध्याकाळी बाहेर गेलो.( मी, आई आणी काकु) बरेचसे बघुन झाले होते, त्यामुळे नवल नव्हते. पण एका स्टेजखाली पडद्यातुन एक फट दिसली म्हणून सहज डोकावले. तर चार- पाच टाळकी विमानासकट हवेत उडुन पत्ते कुटताना दिसली. शेजारच्या दुकानदाराला विचारले तर तो हसून म्हणाला की वर्गणीचे सगळे पैसे गणपतीसाठी वापरले जातात असा तुमचा गोड गैरसमज दिसतोय. ( पुणेरीच दुकानदार तो, खवचट पण खरेच बोलणार)

नी त्या पाटीसाठी धन्यवाद मीही करून लावतेच अशी एक पाटी घराबाहेर.

<<घरच्या गणपतीसाठी पावतीपुस्तक छापून घ्या. त्यांनी वर्गणी मागितली की आपलं पावतीपुस्तक पुढे करून त्यांच्याकडे वर्गणी मागा>> हे आवडले.

<रिया, कुमार केतकर हे लोकसत्ताचे सम्पादक.> होते. आता नाहीत. आता (म्हणजे गेले तीनेक वर्षे तरी गिरीश कुबेर आहेत)

हे खंडणीबहाद्दर गुंडगिरीचे अनुभव पुणे-नाशिकचे आहेत का?
मुंबईत लालबाग परळ परिसरात हा अनुभव कधी आला नाही.
आमच्या लालबागच्या राजाचे तर क्या कहने, लोक स्वताहून भरभरून देतात.

@ रश्मी तै
फळकुटाखाली विमान उडवण्याइतकी जागा असते ? तुम्हाला खेळण्यातलं म्हणायचंय का ? ते ही शक्य नाही.

सुरेश कोडीतकर आयुष्यात कधी एक रूपया वर्गणी न दिलेले लोक वर्गणी द्या म्हणून बोलताना दिसतात. एरव्ही द्यायचेच नाहीत तर जे देतात त्यांना खिजवा असा विचार असेल नै ?... आमच्या महिला मंडळातर्फे अशांचा जाहीर सत्कार केला जातो मूंबोत. तुमची हरकत नसल्यास इच्छा असल्यास तुमचाही सत्कार केला जाईल.

आमच्या लालबागच्या राजाचे तर क्या कहने, लोक स्वताहून भरभरून देतात.>>मागच्या वर्षीचे एका कार्यकर्ताचे प्रताप विसरलेत काय?>>
गणपतीच्या मूर्तीला जर चालता आलं असतं तर मागच्या वर्षीचा प्रकार बघुन बाप्पा नक्कीच उठुन गेला असता.

मला मुळात ते ढणाढणा लावलेली कुठलीच गाणी, भाषणं ऐकवत नाही. सारखं वाटतं की का मूठभर लोक बाकी पब्लिकला वात आणतात. अजिबातच रस नसतो त्यात. शांतपणे करायचा असेल शक्तिप्रदर्शन न करता तर ठीक; नपेक्षा नाही झाले तर बरंच.

बंद करुन टाका सार्वजनिक गणेशोत्सव>>>>> माझे तर अनेक वर्षा पासुनचे स्वप्न आहे की गणपतीचे १० दिवस रोज तुफान पाऊस पडावा, जोराचा वारा सुटावा आणि ह्या गुंडांचे स्पीकर आणि मांडव मोडुन पडावेत.

पण दुर्दैव, असे कधीच होत नाही.
बघु ह्या वेळी तरी होतय का ते.

अहो सुन्दरी डोळ्याला जे प्रत्यक्ष दिसले ते लिहीले, त्यात तुम्हाला आश्चर्य काय वाटले ते स्वर्ग जाणो.:अओ:

आता खेळण्यातल्या विमानात्/विमानावर बसायला लहान कुक्क्कुल्या बाळाला पण जागा नसते, मग मोठे गद्धे पन्चविशीतले तरुण बसु शकतील काय्?:फिदी:

आणी स्टेज उन्चीला आणी रुन्दीला पण मस्त मोठे होते. ( कानात सान्गते इकडे या. त्या गणपती मन्डळात आमच्या बिल्डिन्गमधलाच मुलगा होता. दुसर्‍या दिवशी सत्यनारायण पूजा तिथे असल्याने तो स्टेजवर आवरा आवरी करत होता. त्याला हे सगळे माहीत होते. पण तो सोमरस प्रेमी नसल्याने स्टेजवर बसला होता.)

ह्याच बरोबर ते सध्या नवरात्राचे मांडव घालणे पण बंद केले पाहिजेल. फुकट २-२ महिने रस्ता अडवून ठेवायचा आणि वर टिपऱ्या खेळून बाकीच्यांना त्रास द्यायचा

सगळ्याच मंडळात असे नसते.. १०० पैकी ६० मंडळांचा त्रास हा असतोच परंतु ४० मंडळ तरी किमान व्यवस्थित रित्या आपापले कार्यक्रम आखत असतात.. त्यामुळे सरसकट सगळ्याच मंडळांवर रोष ओढवणे चुक आहे..

राजकिय पक्षांच्या कार्यकर्त्यांची अरेरावी जास्त दिसुन येते एक तर स्थानिक गुंड वगैरे सामिल असतात वर पक्षाचा वरदहस्त.. त्यामुळे ही अरेरावी खंडणीचीच जास्त असते.. आमच्या इथे गावावळुन ओवाळुन टाकलेला ख्रिश्चन धर्माचा मुलगा सगळ्याच कार्यक्रमात पुढे वर्गणी मागायला......आज काय आंबेडकर जयंती मग अण्णाभाउ साठे जयंती .. गणपती नंतर काय नवरात्री ... त्यानंतर काय वाल्मिकी जयंती मग ख्रिसमस अरे चालले काय? ... विचारल्यावर तोंडवर करुन सगळे धर्म सारखे आपल्यासाठी ......

अश्यांना १० रुपयापासुनच सुरुवात करायची.. वैताग असतो...

आमच्या लालबागच्या राजाचे तर क्या कहने, लोक स्वताहून भरभरून देतात.>>मागच्या वर्षीचे एका कार्यकर्ताचे प्रताप विसरलेत काय?>>
गणपतीच्या मूर्तीला जर चालता आलं असतं तर मागच्या वर्षीचा प्रकार बघुन बाप्पा नक्कीच उठुन गेला असता.

>>>>>>>>

आपला विषय वर्गणीचा आहे आणि लालबागच्या राजाची वर्गणी दमदाटी न करता जमा होते तसेच कित्येक लोक मोठमोठ्या देणग्या देतात, सोन्याचे दागिने वगैरे चढवतात अगदी गुप्तदान वगैरेही करतात.

पुन्हा साजिरांची पोस्ट आठवली. नेमकी पोस्ट आता टंकणे शक्य नाही कारण सेव्ह केलेली नव्हती.

==========

बंद करून टाका सार्वजनिक गणेशोत्सव<<< भावना वगैरे दुखावतात ना?

अस्तिक लोकांच्या दृष्टीने:

देव<<अध्यात्म<<मनःशांती<<सज्जन वर्तन<<मोक्ष

अशी साखळी आहे.

ह्यातील 'देव' हा साखळीतील पहिला दुवा अत्यंत केविलवाणेपणाने मंडपात एका ठिकाणी बसलेला असतो, बाकीचे दुवे नावालाही उरलेले नसतात, हे सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप आहे.

बदलत्या काळानुसार तंत्रज्ञान, वेग, थाटमाट ह्यात परिवर्तन झाले तर हरकत नाही, पण येथे बदलत्या काळानुसार अधिकाधिक बीभत्सता येत आहे. गेली अडीच दशके गणपती पाहायलाही गेलेलो नाही. आधी रात्र रात्र फिरायचो आम्ही सोसायटीतील मुले!

असमाधान, अतृप्ती, ताणतणाव, असंतोष, उद्वेग हे सगळे बाहेर काढण्यासाठी अत्यंत विकृत उपाय योजणे व त्यात आनंद मानणे हे (निदान पुण्यातील तरी) सार्वजनिक गणेशोत्सवाचे नित्य स्वरूप झालेले आहे.

Sad

आम्ही सुदैवी. आमच्या भागात दोनच मंडळे आहेत. पहिले बरेच जुने. आम्ही राहायला आलो त्याआधीपासूनचे. दुसरे, त्यांचे बघून जवळच्या चाळींतल्या काही तरुणांनी काढलेले.किमान पंचवीस वर्षे झाली असतील. हा गणपती आमच्या अगदी जवळ. घरात आरत्या ऐकू येतात इतका.

पहिल्या मंडळाचे लोक आमच्या कॉलनीत तरी वर्गणी मागायला येत नाहीत. कॉलनीच्या तोंडाशी असलेल्या एका मंदिराच्या शेजारी संध्याकाळी टेबल टाकून बसतात. मंडपातही पावतीपुस्तक घेऊन बसतात. आधी वर्गणी मागायचे तेव्हा कार्यक्रमपत्रिका आणि अहवालही द्यायचे. आता काही नाही. लहान असताना तिथल्या सांस्कृतिक कार्यक्रमांना (म्हणजे रेकॉर्ड डान्स, पडद्यावर सिनेमे) जायचो.

चाळीतली मंडळी आताच येऊन गेली. ६-७ जणांचं टोळकं इतक्या सगळ्या विंग्जचे सगळे जिने कशाला चढतं हे गणरायालाच ठाउक. ( विंग्ज प्रत्येकी दहा फ्लॅट्स). फक्त गणेशोत्सवाची वर्गणी, पावतीवर काय नाव लिहायचं, थँक्यू, एवढाच संवाद होतो. २१ रुपये फक्त दिलेत. पाच दिवसांचा गणपती विसर्जन झाले की प्रसादही वाटतात. आवाजाची भिंत नसते. पण लाउडस्पीकरवर सकाळ दुपार २-२ तास भक्तिगीते वाजतात. आरत्या म्हटलेल्या, त्याहीपेक्षा आरतीसाठी भक्तांनाच आवाहन केलेले ऐकू येते.
पहिल्या मंडळाचा गणपती बराच लांब आहे. विसर्जनाच्या वेळा यांची मात्र आवाजाची भिंत आहे.

टिळकांनी ज्या उद्देशाने गणेशोत्सव सार्वजनिक केला तो उद्देश आता पूर्ण झाला आहे त्यामुळे आणि गणेशाचा सार्वजनिक होणारा अपमान पाहता सार्वजनिक गणेशोत्सव आता बंद करावेत असं माझं मत आहे .

आमच्या लालबागच्या राजाचे तर क्या कहने, लोक स्वताहून भरभरून देतात.>>मागच्या वर्षीचे एका कार्यकर्ताचे प्रताप विसरलेत काय?>>
गणपतीच्या मूर्तीला जर चालता आलं असतं तर मागच्या वर्षीचा प्रकार बघुन बाप्पा नक्कीच उठुन गेला असता.

>>>>>>>>

आपला विषय वर्गणीचा आहे आणि लालबागच्या राजाची वर्गणी दमदाटी न करता जमा होते तसेच कित्येक लोक मोठमोठ्या देणग्या देतात, सोन्याचे दागिने वगैरे चढवतात अगदी गुप्तदान वगैरेही करतात.>>
अरे हो बरं झालं आठवण करुन दिली, मायबोलीवर "विषयाला" धरुन प्रतिक्रिया द्यायच्या असतात ते.
बाकी, लोक देणगी देतात, गुप्तदान करतात, मग काय कार्यकर्त्यांना तर परवानगीच आहे "काहीही" करण्याची, असो धन्यवाद.. दोन्ही गोष्टी लक्षात आणुन दिल्याबद्दल.

Pages