गणेशोत्सव वर्गणी का खंडणी ?

Submitted by ferfatka on 7 August, 2014 - 13:16

गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली असून, मंडळातील कार्यकर्ते टोळक्याने वर्गणी गोळा करताना सध्या दिसत आहेत. मोठमोठ्या गणेशमूर्ती, अवाढव्य देखावे, सजावट, गाणी, सेलिब्रिटी यांमुळे गणेशोत्सवाला वेगळेच स्वरूप येऊ लागले आहे. अनेक वेळा सामान्यांच्या काळजात धस्स होते ते वर्गणीच्या जाचामुळे. वर्गणी ऐच्छिक असावी. सोसायटी, गल्ली, वॉर्ड, बच्चे कंपनीची मंडळे, नव्याने सुरू होणारी मंडळे अशा अनेक मंडळांना एकाच व्यक्तीला गणेशोत्सवासाठी वर्गणी देण्याचे काम करावे लागत आहे. १५ ते २० मंडळांचे कार्यकर्ते एकत्र येऊन मागील वर्षाचे पावती पुस्तक दाखवून यंदा किमान ५० रुपये तर जादा वाढ करावी अशी विनंती (?) करीत आहेत. वर्गणी न दिल्यास अशांवर रोष ठेवण्यात येतो. आजची महागाई पाहता वर्गणी केवळ रोषणाई आणि सजावटीवर खर्च न करता समाजोपयोगी कामावर खर्च करता आली, तर अधिक चांगले होईल. सध्या महागाई वाढली आहे. तिला कंटाळलेल्या सर्वसामान्य माणसावर वर्गणीचे हे ओझे अशाने थोडे तरी कमी होईल. गणेशोत्सवातून जो सामाजिक संदेश लोकांपर्यंत पोहोचायला हवा, तो पोहोचत नाही आणि उत्सवाचे झगमगते अर्थकारण कोणाही सामान्य माणसाला परवडण्यासारखे नाही. त्यामुळे वर्गणी मागताना मंडळांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किमान ५० रुपये तर जादा >>>>>>>>>>फक्त ..........?????? इथे तर मागिल वर्षी ५००० होते तर आता किमान १०००० तरी द्याच....... यंदा गणपती मोठा आणि कार्यक्रम मोठा आहे... ही दरवर्षीची थाप ठोकतात

मंडळात काम करून सुद्धा आम्हाला कधी हा अनुभव आला नाही. आम्ही सुरुवातीला राहत असलेल्या विभागात स्थानिक असल्यामुळे आगरी समाजातील नागरीकांचा मंडळात दबदबा आहे. पण कधी त्यांना जबरदस्तीने वर्गणी उकळताना पाहिले नाही. वीस वर्षांपूर्वी २५ रुपये वर्गणी होती ती आता १०१ रुपये आहे. मला नाही वाटत वर्षातून एकदा दिल्याने काही कमी होत. हजारात कोणीतरी एखादा करतो आणि पेपरवाले सगळ्यांना झोडत सुटतात. उगीचच एखाद्या उदाहरणावरून सगळ्यांना दोषी ठरवणे चुकीच आहे. हि तर कुमार केतकर स्टाईल झाली.

मला नाही वाटत वर्षातून एकदा दिल्याने काही कमी होत. हजारात कोणीतरी एखादा करतो आणि पेपरवाले सगळ्यांना झोडत सुटतात. उगीचच एखाद्या उदाहरणावरून सगळ्यांना दोषी ठरवणे चुकीच आहे. हि तर कुमार केतकर स्टाईल झाली. >>>>>>>>>>>>

Biggrin या नाशिक ला... आमच्या ऑफिसात बसा....... १० हज्जार देतो... आलेल्या सगळ्या मंडळांना त्यातुन वर्गणी द्यायची.. आहे का मंजुर........

नसल्यास कैच्याकै बोलु नका

गणपती मोठा म्हणजे काय? लाऊडस्पीकरची भिंत अजून मोठी. आजूबाजूच्या कुणाचाही कणभरही विचार न करता दिवसरात्र कर्कश्श गाणी. कुठल्यातरी नेत्याची भेट (यातून मंडळातल्या कार्यकर्त्यांचे भले होते!), कुठल्यातरी नटाला, मॉडेलला आणणे.. बाकी का ही ही नाही.

मला नाही वाटत वर्षातून एकदा दिल्याने काही कमी होत. << तुम्ही द्या ना मग. आम्ही का द्यायची वर्गणी? काय फायदा त्या गणेशोत्सवाचा मला? गर्दी, गोंगाट हा फायदा नाही.
गोंगाट वाला मोठा गणपती याचा समाजाला तर कणभरही फायदा नाही. ९०% मंडळे असलीच आहेत.
कशाला मी न्यूसन्स वाढवायला पैसे देऊ?

हजारात कोणीतरी एखादा करतो आणि पेपरवाले सगळ्यांना झोडत सुटतात. उगीचच एखाद्या उदाहरणावरून सगळ्यांना दोषी ठरवणे चुकीच आहे>>>>> @सुनटुन्या - हजारात एखादा मागत नाही खंडणी. ९९९ खंडणी मागणारे असतात गणपतीच्या नावाखाली.

वीस वर्षांपूर्वी २५ रुपये वर्गणी होती ती आता १०१ रुपये आहे. मला नाही वाटत वर्षातून एकदा दिल्याने काही कमी होत.>>>>>> कमी होतय का नाही हा प्रश्न नाहीये. मला द्यायची नाहीये एक रुपया सुद्धा तर का द्यायची ह्या गुंडांना?

येतात का ते सांगा उगाच फाटेफोडु नका.. वर्गणीचा त्रास काय असतो ते तुमच्यासारख्यांना कळणार नाहीच...

तुम्ही १०१ घेतात याचा अर्थ सगळेच घेतात आणि प्रेमानेच खंड्णी मागतात असे होत नाही...

कुमार केतकर कोण ?
( माहित नसल्याबद्दल आधीच सॉरी)
__________________

आमच्या इथे सगळे मंडळ येऊन सांगोन गेलेत की तुम्ही आसपासच्या सगळ्या मंडळांना फक्त ५०१ रुपयांची वर्गणी द्या. या उप्पर एकही पैसा कोणी मागितला तर आम्हाला सांगा Uhoh

आमच्या आसपास किमान १० मंडळं आहेत. सगळ्यांना ५००१ म्हणजे Uhoh असं होतंय आम्हाला तर.
त्यात आमच्या घरीही गणपती असतोच की.
वर म्हणे या उप्पर एकही पैसा कोणी मागितला तर आम्हाला सांगा\... यांना सांगून काय करायचं? Uhoh

____________

सुन्याटुन्या तुम्ही म्हणताय तसं दिलेली वर्गणी घेणारं एखादं दुसरं मंडळ असेल पण मोस्टली सगळे असलेच

अहो ते कुमार केतकर माझ्या नात्याचे ना गोत्याचे मला काही पडलेली नाही त्यांची.

माझ्या आसपासच्या गणपतींमधे प्रचंड कर्कश्श गाणी, नटीला, नेत्याला बोलावणे आणि एक सत्यनारायण यापलिकडे काहीही कार्यक्रम होत नाहीत. ज्यांच्या पैशावर हा सत्यनारायण घालतोय त्यांना त्या सत्यनारायणाचा प्रसाद आणून देणे एवढेही कष्ट हे लोक घेत नाहीत. सत्यनारायणाचे सगळे फळ म्हणे प्रसाद खाण्यात असते. तर आम्ही पैसे देऊन आम्हालाच प्रसाद मिळत नाही.
आसपासच्या घरात कुणी आजारी असेल, कुणाच्या घरी मृत्यू घडला असेल तरीही हे गणपतीवाले शीला की जवानी वाजवायचे थांबत नाहीत.
यांच्यामुळे आधीच प्रचंड असलेल्या ट्रॅफिकला अडथळा येऊन ट्रॅफिक तुंबणे अजून जास्त होत रहाते.

यातली एकही गोष्ट माझ्या वा समाजाच्या फायद्याची नाही. तस्मात मी असल्या गणपतीमंडळांना वर्गणी देण्याची मला गरज वाटत नाही. हा यांनी गुंडगिरी करून मला त्रास देऊ नये यासाठीच केवळ वर्गणी देण्याची गरज असते.. पण ही तर खंडणी झाली...

त्यात आमच्या घरीही गणपती असतोच की.
<<
घरच्या गणपतीसाठी पावतीपुस्तक छापून घ्या. त्यांनी वर्गणी मागितली की आपलं पावतीपुस्तक पुढे करून त्यांच्याकडे वर्गणी मागा. हाकानाका Wink

हिंदुच्या सणाविरुद्ध धागा काढल्याने लिंबुटिंबुकडुन जाहिर निषेध.

लिंबु हल्ली दिसत नाहीत. म्हणुन प्रॉक्सी लावली

त्यात आमच्या घरीही गणपती असतोच की.
<<
घरच्या गणपतीसाठी पावतीपुस्तक छापून घ्या. त्यांनी वर्गणी मागितली की आपलं पावतीपुस्तक पुढे करून त्यांच्याकडे वर्गणी मागा. हाकानाका डोळा मारा

>>

हे लईच भारी. जिसका जूता उसीका सर::फिदी:

आम्च्याकडे भावाने २ गोष्टींची उत्तरे द्या व खंडणी घेऊन जा असे सर्व ग्.भक्त खिसेकापूंना सांगितले. कोणालाच एकाही प्रश्नाचे उत्तर आले नाही व मान खाली घालून निघून गेले.
१. लोकमान्य टिळकांचा जन्म दिनांक महिना व वर्ष सांगा
२. अथर्वशिर्ष म्हणून दाखवा.

नी +१
आम्ही पूर्वी रहायचो तिथला गणपती तर शहरातील सर्वात जास्त ध्वनीप्रदूषण करणार्‍या मंडळांपैकी एक होता. दुपारी ४ ते पहाटे ४ लाउडस्पीकर्सची भिंत गाणी वाजवत राही. आसपासच्या घरांमधे काहीही झालं तरी त्यात खंड नाही. आसपासच्या लहान बाळांना घेऊन दहा दिवस बाहेर जाऊन रहा असं डॉक्टर आवर्जून सांगायचे.
सध्या निदान रात्री ११|| -१२ ला बंद होतो. पण म्हणून आवाजाच्या पातळीत फरक नाही.

आम्च्याकडे भावाने २ गोष्टींची उत्तरे द्या व खंडणी घेऊन जा असे सर्व ग्.भक्त खिसेकापूंना सांगितले. कोणालाच एकाही प्रश्नाचे उत्तर आले नाही व मान खाली घालून निघून गेले.
१. लोकमान्य टिळकांचा जन्म दिनांक महिना व वर्ष सांगा
२. अथर्वशिर्ष म्हणून दाखवा.>>>>>>>

तुमच्या कडे येणारे गुंड बरेच सज्जन असावेत. तुम्ही रहाता तिथे रहायला यायला पाहीजे. आमच्या इथले गणपती गुंड असले काही विचारले तर घरातच घुसतील.
दुकानदारांना धमकी देताना तर मी अनेकवेळेला स्वताच बघितले आहे.

हो वरदा...
चिग, निंता, अक्रा मारूती(शॉर्टफॉर्मने गैरसमज होतील म्हणून केला नाही) परिसरात रहाणार्‍यांचे हाल इतरांना समजणार नाहीत. मी १० वर्ष काढलीयेत अकरा मारूती परिसरात. भयाण...

लोकमान्य टिळकांच्या पुण्यात गणेशोत्सवात दोन तीन वर्षापासून सनी लिऑनला बोलावतात. तिची बिदागी वाढलेली आहे. त्यामुळे जास्तीची वर्गणी/खंडणी द्यावी लागते.

(बादवे सनी लिऑन जेव्हा रिअ‍ॅलिटी शो आणि बॉलीवूड मध्ये आली तेव्हा तिचा उल्लेख पेप्रात ' पोर्न स्टार ' असा केला जायचा. आमच्या एका स्नेह्यांच्या हायस्कोलात जाणार्‍या मुलीने पेपर वाचता वाचता इनोसंटली बापाला शंका विचारली बाबा पोर्न स्टार म्हणजे काय हो ? बापाला जमीन दुभंगून ...... वगैरे वगैरे !)

टोच्या, बरोबर आहे तुमचे. पुण्यातले, आणी त्यातही सहनिवास सोसायटीतले गुंड , करून करून किती गुंडगिरी करणार?

१. लोकमान्य टिळकांचा जन्म दिनांक महिना व वर्ष सांगा
२. अथर्वशिर्ष म्हणून दाखवा.

>>
हे पा,
कोंबडीने आम्लेटाची चव सांगितलीच पायजे असं काय नाय.
उगं शम्बर रुपड्यासाटी कल्हई मारू नगा . उंद्याच्याला गाडी पंचर काडाय ढकलीत न्याया लागंन तव्हा कळन . चाल रं सुन्या , हितनं... म्हनं कंचा टिळक का काय शिर्श...

चिग, निंता, अकरा मारूतीच्या आसपासची मंडळे, अखिल मंडई मंडळ, बाजीराव रोडवरचे वाडेश्वरच्या इथले मंडळ वगैरे लोक घरात घुसून हाणत असावेत वर्गणी नाही दिली तर...

सुमेधा, पुण्यातले म्हणू नकोस. सहनिवास मधले म्हण Happy
आम्ही सपे त मंडळांची गुंडगिरी काय असते ते व्यवस्थित बघितलं आहे लहानपणापासून.

पण नी, निंता वाले अपवाद बरंका. ध्वनीप्रदूषण आणि वर्गणीच्या आकड्याची जबरदस्ती - दोन्हीमधे. चिग, नाबा, वगैरेचा त्या बाबतीतला दर्जा वेगळाच

निंता वाले अपवाद बरंका. << होय का? ह्म्म पण तिथेही कर्कश्श गाणी ऐकलीयेत.

नाबा? नातूबाग? विचारूच नकोस... झेललीये त्यांची गुंडगिरी. एका परिसरात ७ मंडळे + बिल्डींगचा गणपती.. असला प्रकार होता.

सर्कार कुणाचंही असूद्या यात बदल होत नाही.
जो सत्तेवर तो खातो.
उगाच आपण तोंडची वाफ दवडत बसतो हा पक्ष तो पक्ष...
सगळे एकाच माळेचे मणी आहेत.

बादवे सनी लिऑन जेव्हा रिअ‍ॅलिटी शो आणि बॉलीवूड मध्ये आली तेव्हा तिचा उल्लेख पेप्रात ' पोर्न स्टार ' असा केला जायचा<<< च्च.. असं म्हणू नै. अ‍ॅडल्ट मूव्ही स्टार म्हणावं!!!

रत्नागिरीमध्ये सुदैवानं वर्गणी वगैरे कुणी मागायच्या मूडमध्येच नसतं. सगळ्यांना घरचय गणपतीची हौस. तरीही ग्रामपंचायतवाले वर्गणी घेऊन जातात.

मद्रासला फक्त देवळामधले लोक वर्गणी मागायला येतात. पूजा ज्या दिवशी असेल त्या दिवशी देवळामध्ये भरपेट जेवण प्रसाद म्हणून देतात, त्यामुळे पैसे द्यायला काही वाटत नाही. बाकी तमिळमधली गाणी वाजत असल्यानं डोक्याला काहीही त्रास होत नाही. Happy

Pages