मॉरिशियस - भाग पाचवा - बीच टुअर Ile Aux Cerf Island (deer island)

Submitted by दिनेश. on 7 August, 2014 - 11:15

मॉरिशियस - ओळख - http://www.maayboli.com/node/50140

मॉरिशियस - भाग पहिला - ल मेरिडीयन http://www.maayboli.com/node/50152

मॉरिशियस - भाग दुसरा - शुगर म्यूझियम - Aventure du Sucre http://www.maayboli.com/node/50186

मॉरिशियस - भाग तिसरा - बोटॅनिकल गार्डन, Pamplemousses Botanical Garden, Sir Seewoosagur Ramgoolam Botanical Garden http://www.maayboli.com/node/50225

मॉरिशियस - भाग चौथा - पोर्ट लुई Port Louis & Le Caudan Waterfront http://www.maayboli.com/node/50261

दुसर्‍या दिवशी समुद्रकिनार्‍यावरची सहल होती...

१) मला तिथे खुप घराच्या आवारात अशी नैसर्गिक झाडूची झाडे दिसली

२) नेहमीप्रमाणेच मस्त नाश्ता

३) मग "ज्योतिबा" दर्शन

४) मला तिथे मस्त करवंद पण दिसलं, मी ते अर्थातच तोडून खाल्लं.. पण त्यापुर्वी फोटो काढायचे भान होते Happy

५) मग आम्ही एके ठिकाणी अंडर सी वॉकला गेलो. ( माझा कॅमेरा वॉटर प्रूफ नसल्याने ते फोटो नाहीत Sad )
३ ते ४ मीटर पाण्यात, डोक्याभोवती हवेची हंडी बाधून चालायचे असते. पोहणे यायची गरज नसते. एक दोन
मिनिटातच आपण तोल संभाळायला शिकतो. मग आजूबाजूला मस्त प्रवाळ आणि रंगीबेरंगी मासे दिसतात.
मार्गदर्शक आपल्याला अगदी संभाळून चालवतो.

त्या ठिकाणचा बीच पण सुरेख होता.

६)

७)

८)

९)

१०)

या फोटोत तुमच्या अगदी डाव्या हाताला जो छोटासा प्लॅटफॉर्म दिसतोय तिथून पाण्यात शिरलो आम्ही

११) डोंगरी शेत माझं गं

१२) या ठिकाणाहून आम्ही स्पीड बोटीने Ile Aux Cerf Island (deer island) ला गेलो. इथून पाच मिनिटावरच हे सुरेख बेट आहे.

१३)

१४) पाण्याची खोली, आकाशातले ढग, सूर्याची दिशा यावर अवलंबून पाण्याच्या रंगाच्या अनेक छटा दिसत होत्या.

१५)

१६)

१७) ते बेट म्हणजे भन्नाट जागा आहे. कुणालाही पाण्यात उतरायचा मोह होईल तिथे.
कॅमेरासकट सर्व सामान तसेच उघड्यावर टाकून सर्वच जण पाण्यात उतरत होते. नितळ पाणी होते.

१८) तिथेच दोन रेस्टॉरंट्स आहेत. एकात भारतीय जेवण मिळते. ३७५ मॉ. रुपयांना चांगले जेवण मिळाले.

१९) तिथेच अनेक वॉटर स्पोर्ट खेळायला वाव आहे. आम्ही ग्लास बॉटम बोटीने एक फेरी मारली. पण ग्लासपेक्षाही
पाणी नितळ होते त्यामूळे ग्लासमधून काढलेले फोटो तेवढे खास नाहीत.

२०) परत त्या बेटावर भटकत राहिलो

२१) मी पण कधी कधी रसिक होऊन मासे पकडतो बरं

२२) मन आम्ही दुसर्‍या स्पीड बोटीने एका अनोख्या जागेकडे निघालो.

२३)

२४)

२५)

आम्ही एका नदीच्या गॉर्जमधे शिरलो.. पाण्याच्या रंग गहीरा हिरवा झाला

२६)

इथे आम्हाला जायचे होते

२७) पण तिथे जेमतेम एक बोट मावण्याएवढी जागा असल्याने थोडी वाट बघावी लागली

२८) मग या धबधब्याच्या अगदी जवळ गेलो

२९) तिथला थरार मला ना शब्दात पकडता येत ना फोटोत !

३०) परत फिरायला कुणीच तयार नव्हते पण आमच्यामागे पण काही बोटी वाट बघत थांबल्या होत्या

३१)

परत परत मागे वळून बघत होतो.

३२) परत समुद्राकडे

३३) आणि मग भन्नाट वेगाने परत किनार्‍याकडे

पुढे चालू

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे, दिनेशदा, सगळेच फोटो अगदी 'मार डाला' कॅटॅगरीतले आहेत.

आम्ही इथे गेलो नसल्याने हा धागा माझ्या तावडीतून सुटत आहे याची कृपया नोंद घ्यावी.

आभार !

मामी,, नेक्स्ट टाईम नक्की जा... मस्त जागा आहे ही. त्या धबधब्यापर्यंत दुसर्‍या बाजूनेही जाता येते.

हाय हाय मार डाला .. पाण्याचे रंग काय जीवघेणे आहेत....

मला बस्स एक्दातरी जायला मिळो इथे.. तोवर फोटो आहेअच पाहायला. कित्येकदा प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट असे होते. Happy

मामे.. निराशा केलीस गं..

पहिला फोटो पाहुन उसालाही असे दिसणारे तुरे येतात याची आठवण झाली.

प्रचि क्र.३०..
तुम्हारी फोटोमे 'वो' एक और हाथ किसका था....

(तुम्हारी खतमे वो एक और सलाम किसका था )

साधना, जाशील गं नक्की ! ते झाडूचेच झाड आहे का ? मला शंकावजा खात्री वाटतेय Happy

आणि पाण्याचे रंग फोटोत दिसताहेत त्यापेक्षा सुंदर होते. हा सिझन चांगला असल्याने हवेत दमटपणा नव्हता, त्यामूळे नेहमी खार्‍या हवेचा जो (मला) त्रास होतो तोही नव्हता.

रॉबीन, त्या कपलचा फोटो आहे माझ्याकडे, "अंकल अंकल... हमारा भी फोटो निकालो ना.." करत सगळी कपलं मागे लागायची माझ्या... पाठवले पण त्यांचे त्यांना फोटो.

बोलायला शब्दच शिल्लक नाहीयेत इतके खास, अप्रतिम, सुपर्ब, अफलातुन......फुकटात मॉरीशियस पहायला मिळतय एक अनवट ठेव्यासारखे.
तुमच्यासाठी टोपी उडवण्यात आली आहे !!!!!

जिवाचे मॉरिशियस!!! एकदम कातील आहेत फोटो, दिनेश.

ब्रे.फा. मध्ये ओल्या नारळाचे तुकडे? भारीच की! त्या लाल चकत्या कसल्या आहेत ?

पाचव्या फोटोतले ते बुटबैंगण झाड कसले डेरेदार आहे! आणि मॉसने नुसते लगडलय. ते बघायलाच कसलं सही वाटतय!

समुद्राचे रंग तर अहाहा!!!!! सतरावा फोटो क्लासच. त्या दोन झाडांनी मस्त फ्रेम झालीये. तो माणूस रूल ऑफ थर्ड मध्ये असता तर आणखी मस्त झाला असता तो फोटो!

माधव, लाल चकत्या ग्रेपफ्रुटच्या.
मालवणला सकाळी भाताच्या पेजेबरोबर अश्याच खोबर्‍याच्या चकत्या असायच्या. गोव्याला पण असतात ना ?

ते झाड एका बीचवर होते...

आणि १७ वा फोटो मला पण खासच आवडलेला.. तो पाठमोरा असल्याने "परवानगी" घेतली नाही Happy

चला आता पुढच्या भागाकडे वळू !

दिनेश दा,

आपली फोटोग्राफी अतिशय उत्तम आहे. यातला कोणताही फोटो फोटोग्राफी स्पर्धेसाठी पाठवल्यास बक्षीस नक्की. आपण या मॉरीशस फोटोंचे एखाद्या आर्ट गॅलरीत प्रदर्शन भरवा. उत्तम प्रतिसाद मिळेल.

निव्वळ अप्रतिम.

केदार