अजब तिच्या स्वप्नांचे जळणे

Submitted by सुप्रिया जाधव. on 5 August, 2014 - 22:13

जरी फाटली चोळी नाही
एक पुरेसा !....टोळी नाही

अजब तिच्या स्वप्नांचे जळणे
कुठे राख-रांगोळी नाही

आयुष्याचा शिमगा झाला
जरी पेटली होळी नाही

दयायचाच तर असा रोग दे
ज्यावर औषध-गोळी नाही

डांव जाणते तुझा नशीबा
इतकीही मी भोळी नाही

भरभरून दे दु:ख, यातना
दुबळी माझी झोळी नाही

-सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त

जरी फाटली चोळी नाही
एक पुरेसा !....टोळी नाही

अजब तिच्या स्वप्नांचे जळणे
कुठे राख-रांगोळी नाही

भरभरून दे दु:ख, यातना
दुबळी माझी झोळी नाही >>> खूप छान, सुंदर

छानच