ती रात्र...

Submitted by sas on 31 December, 2008 - 18:02

ती रात्र...

गेल्या जवळ जवळ दोन वर्षां पासुन आम्ही एक मेकांना date करत होतो. त्याने प्रपोस केल्या नंतर आणी त्याला "नाही" म्हटल्यावर काही दिवस त्याला टाळल मग नुसती Friendship करायला काय हरकत आहे? ह्या त्याच्या मागणीशी सहमत होवुन त्याच्याशी 'हाय हेलो' सुरु केल (खरतर त्याच्या बद्द्ल माझ्या हि मनात ओढ निर्माण झाली होती Friendship च्या नावे तिला संतुष्ट केल)

सुरवातिला College मध्ये भेटायचो मग College कट्ट्यावर बसु लागलो त्यानंतर त्याने मला College अधुन Hostel वर सोडायला येण सुरु झाल. त्याच्या जवळ गाडी नव्ह्ती आणी माझ्या जवळ ही नाही. College ते Hostel ४०-३५ मि. च्या walk ला company मिळाली... नकळतच हातात हात आले.

एका दुपारी "तो आजारी आहे म्हणुन College ला आला नाही" अस त्याच्या मित्रा कडुन समजल व त्याला पहाण्याच्या बहाण्याने त्याच्या Room वर जाण सुरु झाल.

त्याच्या room वर गेल की त्याचे roommates आम्हाला एका खोलीत एकट सोडुन दुसर्‍या खोलित निघुन जायचे. त्या बंद खोलितले ते गरम श्वास आणी वाढणारी धकधक... एकमेकांना चुकुन तर कधी मुद्दामुन केलेले स्पर्श... आणि त्याच्या मिठित जाण्यास मनाला घातलेली आवर... जास्त काळ नाही टिकवता आली ती आवर...

त्याच्या वाढदिवसाला सकाळि सकाळी त्याच्या room वर जावुन त्याला wish करण्याची ती तडप...त्याची पहीली मिठी पहिल ...

हे सर्व होण्या आधी त्याच्या सिगरेट पिण्या वरुन झालेली आमची भांडण आणी एकदा त्याच्या रुम वर गेले असतांना त्याला ओढतांना पाहुन केलेल Break-Up हं break-up नव्हत ते मनातली आग आणखी भडकण्यास मिळालेल एकांताच विरहाच इंधन होत. त्या काही दिवसात मानातली आग ईतकी भडकली की आम्ही पुन्हा date करु लागलो तेव्हा आनंदाच्या भरात त्या अगिचा प्रकोप झाला.. हवाहवासा आवडणारा, पण तरिही अजुन सार्‍या सिमा पार झाल्या नव्हत्या ज्या त्याच्या Bday ला जवळ जवळ पार झाल्या.

सार किती fast होत गेल. रुसवे, फुगवे, भांडण पण तरिहि सार रम्य वाटत होत. त्याच Masters झाल आणी त्याला नोकरी मिळाल्यावर त्याने room सोडली आणी वेगळा Flat भाड्याने घेवुन एकट रहाण सुरु केल. मग माझ ही दिवस दिवस भर त्याच्या Flat वर रहाण, स्वयंपाक करण, घर निट ठेवण सुरु झाल थोडक्यात live-in but at night at diffrent places.

पुढे एका वर्षात माझ masters झाल मी नोकरी साठी दुसरी कडे गेले. मग भेटायच कस कधि ? weekends ला त्याच्या Flat वर रहायला जाण सुरु झाल. ..(now weekend live-in)

शुक्रवारी office सातुन लवकर निघुन बस पकडायची ...तो बस Stand वर वाट बघत असयचा कधी late यायचा. Hoteling Shopping Movie आणी रात्री त्याच्या घरी.. नव्हे Flat वर.

सुरवातिला काही महिने वेगळे बेड वै झाल पण नंतर...तरिही अजुन आमच्यात जे एक अंतर उरल होत ते मिटविण्याची माझी हिंमत नव्ह्ती...सुरवातिला तोही मागे नाही लागायचा पण नंतर त्या वरुन आमची भांडण सुरु झाली तो बळजबरी चे गोड प्रयत्न करु लागला.

त्याच्या Flat वर weekend ला आम्ही सलग दोन दिवस आणी रात्र सोबत असायचो इतका वेळ सोबत रहाण/घालवण हे माझ्या job नंतरच सुरु झाल. ह्या आधी आम्ही भेटायचो तेव्हा. जास्तित जास्त ४-५ एकत्र रहायचो ... म्हणुन कदाचीत तेव्हा जास्त वाद भांडण होत नसावित. पण, आता कित्येकदा आमचे वाद, भांडण इतकी तिव्र होत होती कि मी सामान घेवुन माझ्या ठिकाणी परत निघुन जायचे. सोमवारी साकाळची बस न घेता रविवारी दुपारी वा संध्यकाळीच.

ह्या काळात त्याने TV घेतला, weekend ला movie पहाण्यात बाहेर खुप वेळ जातो म्हणुनही घेतला म्हणायचा. weekend ला त्याला भेटायला गेल की त्याच्या बरोबर बाहेर वेळ घालवायला मला जास्त आवडायच पण तो Flat वर जाण्याची घाई करायचा. प्रत्यक वेळी त्याला नाकारण कठिण होत होत.

आपण प्रत्येक weekend ला त्याला भेटायला जायला नको वाटायच कधि कधि ,आणी काही weekends ला office च्या कामा मुळे जाण ही व्हायच नाही पण हे खुप क्वचीतच

Weekends येत होते जात होते... नेहमी प्रमाणे weekend ला office च काम पटपटा आवरुन मी बस पकडली नी काही तासात आम्ही सोबत होतो ... बाहेरची काम आटपुन आम्ही Flat वर गेलो.. नेहमी प्रामाणे मी त्याचा पसार्‍याने भरलेला Flat आवरला, त्याच्या वस्तु निट ठेवल्या.. त्याचे कपडे त्याच कपाट निट लावल. शुक्रवारी रात्री आम्ही बाहेर जेवायचो पण शनिवारी नी रविवारी आम्ही त्याच्या Flat वरच स्वयंपाक करायचो.. कधि कधी भाजी किराणा आणायला जायचो. त्या साठी शुक्रवारी रात्रिच मी स्वयंपाक घरही आवरुन ठेवायचे. जे ह्या weekend ला ही केल... होता होता रात्र झाली नी आम्ही झोपण्याची तयारी केली.. रात्रिच्या १२:३० ते १ चा सुमार तो जवळ येवु लागला म्हणुन मी सरकले थोडावेळ असच होत गेल आणी तो एकदम...

तसा तो रागीट, dominating आणी पुरुषी अहंकार असलेला स्त्रि वर दबाव आणुन तिला मनविण्याचा प्रयत्न करणारा.

...पण तो अस काही करेल हे मला वाटलही ही नव्हत...मी Pls Pls don't म्हणत असतांना अचानक तो भयंकर रागात आला आणी Bed वरुन (पलंग) उठुन त्याने जोर जोरात bed मागे पुढे ओढला.. मला काहीच सुचत नव्हत त्याचा अवतार पाहुन मी खुप भांबावले ,गोंधलले ,घाबरले... मी त्याला शांत करण्यास काही बोलणार तोच त्याने माझा हात पडुन... तो माझ्या हाताला चावला आणी जोरात त्याने त्याचा हात भिंतिवर आपटला... भर रात्री १ च्या सुमारास त्याने माझा हात धरला आणी मला Flat च्या बाहे र काढल म्हणाला "आता रात्रि बाहेत काय करते बघतो" ...

...१०-१५ मि मी दाराच्या बाहेर उभी होते मग मला आत घेवुन मला त्याच्या हातांनी दाबुन धरुन बराच वेळ तो "मी तुला आत घेतल नसत तर काय झाल असत...मी आत वाट्टेल ते अक्रु शकतो..." अस बरच काही बोलत होता..त्या वेळी काही न बोलण मला योग्य वाटल आणि गुमान पणे त्याच बोलण एकुन कशी बशी मी ति रात्र काढली.

प्रेम अंधळ असत म्हणतात पण प्रेमात मी अंधळी झाले होते... इतक सगळ होवुनही सकाळी मी तिथेच थांबले सार निट होईल ह्या मुर्ख आशेने..मी काही कपडे धुवुन वाळायला घातले... तो उठला आणी आमच २-३ वाक्यांच काही तरि बोलण झाल आणी तो म्हणाला "निघ माझ्या घरातुन" ... मी सामान घेवुन निघुन गेले.

मी रिक्षातुन Bus Stand कडे जात असतांना त्याला पाहिल. बाईक वरुन तो मला शोधत होता पण मी त्याल पाहुनही त्याल हात केला नाही आणी निघुन गेले.

हे इतक झाल्यावरही मला अक्कल आली नाही त्याने फोन करुन मला मनावुन घेतल. त्याच week मध्ये office च्या कामा साठी आमची team त्यच्या शहरात गेली..त्यात मी ही होते. त्याला फोन करुन आमची कोन्फरंस कुठे आहे ते सांगितल.. त्या ठिकाणि तो आला पण लांबुनच आम्ही एक मेकांशी हसलो... त्याचा हात प्ल्यास्टर मध्ये होता... त्याने मला फोन वर हे सांगितल होत पण मला खर वाटल नव्हत... त्या रात्री त्याच्या रागात त्याने स्व:ताचा हात मोडुन घेतला ह्याची खंत मला जास्त होती त्याने माझ्या सोबत काय केल ह्यापेक्षा...

पुढे 'ती' रात्र आठवली की माझा त्याच्या पासुन दुर होण्याचा नव्हे त्याला माझ्या जिवनातुन काढुन टाकण्याचा माझा विचार अधिकच पक्का होत गेला. 'ती रात्र' कितितरी वेळा भय, राग, स्वताची घृणा (स्व:ताच, स्वताला हतबल व्हाव लागल अश्या परिस्थितित ढकलल्या ची घृणा), तिरस्कार अश्या किति तरी रुपातुन माझ्या मनाला घायळ करायची पण तरिही मी बरेच दिवस , महिने मोहात अडकलेले होते... मला आपण चुकतोय हे समजल होत पण उमजायच बाकी होत आणी उमजायला बराच वेळ लागला ... मी प्रेमात अंधळी झाले होते... आता वाटत ते 'प्रेम' होत???

(माझ्या मैत्रिणी बरोबर घडलेल हे सार मी शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे माझ्या 'Contact immediatly its urgent' ह्या कथे प्रमाणे.. त्या कथेत जे टाकायच राहिल ते ह्या कथेत लिहल आहे. .. आभार)

गुलमोहर: 

तुमच्या सगळ्या मैत्रिणींना हे असे अनूभव काय येतात?? Uhoh

adm हा अनुभव त्याच मैत्रिणिचा आहे. Pls त.टि. वाचा..... आभार Happy

>>>तुमच्या सगळ्या मैत्रिणींना हे असे अनूभव काय येतात

अडम, आता वाक्य फिरव नी लिही 'तुमच्या मैत्रिणीलाच असे सगळे अनुभव कसे काय येतात?' Proud

'तुमच्या मैत्रिणीलाच असे सगळे अनुभव कसे काय येतात?' >> Lol

Sayonara and Saksham:

What do u mean by माझ्याच मैत्रिणिलाच असे अनुभव कसे काय येतात?.. सगळ्यांच आणी सगळ्यांच्या मित्र/मैत्रिणिंच आयुष्य सुरळित नसत हे सांगायची गरज नको. Sorry to say पण ही काही हसण्याची वा टिंगल करण्याची बाब नाही.

जगात सगळेच काही अडचणीत, दुखा:त असलेल्यां पासुन दुर रहातात त्यांच्याशी मैत्री करत नाही अस नसत.

माझ्या बर्‍याच मित्र मैत्रिणीं ना जिवनाचे कडु अनुभव अधिक आलेत म्हणुन त्यांच्याशी मैत्रि तोडण मला योग्य वाटत नाही आणी त्यांच दु:ख share करण्यास माझी ना नाही.

देशात असतांना मी आधार आश्रम, रिमांड home वै. मध्ये जायचे तिथे ही माझ्या काही मैत्रिणी झाल्या होत्या. आता जरी माझा त्यांच्याशि बरेच वर्षांपासुन संपर्क नाही पण मैत्रिचा धागा मनात अजुन आहे. आणी मला त्या सार्‍या मैत्रीणि प्रिय आहेत.

शाळेत असतांना माझ्या ३ मुक-बधिर मैत्रिणि होत्या याचा अर्थ असा नाही माझ्या सार्‍याच मैत्रिणी वा माझ्याच मैत्रिणी मुक-बधिर असतात. आणी तुमच्या मते अस असेल तर मला आनंदच आहे की मला काही Special Friends मिळाले होते आणी जिवनाचा-मैत्रिचा एक वेगळा अनुभव मला एकटिला मिळाला.

माफ करा पण दोन्ही गोष्टी वाचल्यावर मला तुमची मैत्रिण बिचारी न वाटता मूर्ख वाटली. मूर्ख शब्द ऐकायला कर्कश्श वाटत असेल पण पर्याय नाही.
विश्वासार्हता दिसलेली नसतानाही त्या मुलावर नको इतका आंधळा विश्वास टाकणे (बॅन्क खाते, एटीएम आणि इमेलचे पासवर्डस देणे इत्यादी..) किंवा सरळ सरळ तोंडावर त्याने अपमान करूनही त्याचे काहीच न वाटणे/ न वाटवून घेणे (तुझ्याशी अफेअर गावात कळले तर आमची बदनामी होईल ह्याहून मोठा अपमान अजून काय असणार?) आणि आता हे sort of Live In. शरीराचे सोहळे कुठपर्यंत करायचे आणि कुठे थांबायचे यात दुमत असू शकते. एका ठिकाणपर्यंत पोचल्यावर पुढे जावेसे वाटणे, पुढे जाण्याची मागणी करणे यात चूक नाही. दुसर्‍या बाजूने स्टॉप साइन दिल्यावर बळजबरी करणे हा आणि केवळ हाच गुन्हा. सगळेच निर्णय तिचे आणि शारीरीक जवळीक सोडता बहुतांशी मूर्खपणा या खात्यात दाखल होणारे.
त्या मुलाचे समर्थन करण्याचा उद्देश नाही पण या मुलीलाही माझी फारशी सहानूभूती नाही.
नशीब तिचं की त्या मुलाने तिच्या पत्रांचा, असलेल्या माहितीचा (पासवर्डस!) दुरूपयोग केला नाही. पासवर्डस चा दुरूपयोग केला असता तरी संबंधित लोकांनी या मुलीला हेच सांगितले असते की तुम्ही तुमचे महत्वाचे पासवर्डस असे सांगितलेच कसे दुसर्‍याला.
तिने निर्णय घेतले, ती पुढे गेली. सगळ्या धोक्याच्या घंटा वाजत असतानाही तिकडे दुर्लक्ष करून पुढे जात राह्यली. आणि पुढे जाणे त्रासदायक होऊ लागल्यावर रस्ता बदलून निघून गेली. यातला एकही निर्णय तिच्यावर लादलेला जाणवत नाही. तेव्हा आपल्या निर्णयाच्या परिणामांची जबाबदारी आपलीच असते हे या कन्येला समजावून सांगा.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

ajjuka,
तुमच बरोबर आहे. माझी मैत्रिण ही स्व:ताच्या मुर्ख पणा बाबत अनेकदा पश्चाताप करते . तेव्हा तिला ती मुर्ख पणा करत आहे हे समजल नाही पण आता कबुल करते की चुक तिचिही होती तिने इतक मोहात अडकायला नको होत. किती अजब आहे ना आता तिला जे चुक वाटत ते तेव्हा कस आणी का नाही समजल? केवळ एकटेपणा नको म्हणुन ??? कुणा वर इतक्या सहज विश्वास टाकण म्हणजे... असो...प्रतिसादा बद्द्ल आभार Happy

सास,

तुम्ही या कथेमध्ये फार इंग्रजी शब्द वापरले आहेत. वाचताना ते बरेच खटकते. त्यातल्या बहुतांश इंग्रजी शब्दांना सोपे मराठी शब्द उपलब्ध आहेत. तेव्हा तुमची पुढची कथा बहुतांशी मराठीतून असेल अशी आशा करतो... Happy

सास, तुमची पोस्ट अपेक्षितच होती. मी तुमच्या मैत्रिणीची टिंगल टवाळी अजिबात केलेली नाही. अडमची पोस्ट आणि त्या खालची तुमची पोस्ट ह्याला अनुसरुन मी फक्त शब्द फिरवले.

सास,
तुमच्या मैत्रिणीची टवाळी माझ्या पोस्टमधे जाणवली असल्यास क्षमस्व. तो उद्देश नक्कीच नाही. एखादी शिकली सवरली, जॉब करणारी मुलगी इतकं आंधळेपणाने, इतक्या दुबळेपणाने कसं वागू शकते याचा सात्विक संताप आहे हा. असा सात्विक संतापाचा ऍटॅक मला येतच असतो.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

ajjuka
तुमच्या प्रतिसादात मल काहिच टवाळि नाहि जाणवलि मि आधिच्या प्रतिसादां बद्द्ल लिहल.
तुमचा प्रतिसाद सहाजिक आहे आणि तुमचि मत हि बरोबर आहेत. Happy

sayonara
माझ्या कडुन तुमच मन दुखवल गेल असेल तर मि क्षमस्व आहे, पण एकद्या असल्या प्रतिसादाने विषय
वादात भरकटतो जे मला नको होत म्हणुन मि प्रतिसाद दिला.

Santino
मि ईंग्रजि शब्द वापरण टाळण्याचा प्रयत्न करेल. Happy

सगळ्यांचे आभार Happy

काहि समजल नाहि.
तो mad hota ka? any way love is blind.हे समजल.

sas, मला एक सांगा, प्रत्येक गोष्टीनंतर 'हा माझ्या मैत्रीणीचा अनुभव' असं लिहायची गरज आहे का ? मग लोक प्रश्न विचारणारच की. तुम्ही एक कथा लिहा आणि मोकळ्या व्हा ना !
एकदा का हे खरं घडलं आहे असं कळलं की लोक चर्चा, चेष्टा, टवाळी, निंदा, सगळं करणारच. तुम्हांला फक्त गुडी गुडी प्रतिक्रिया हव्या असतील तर तशीही तळटीप टाका. म्हणजे कोणीही काहीही म्हणणार नाही (किमान मैत्रीणीबद्दल, तुमच्याबद्दल बोलणारच नाहीत असं सांगू शकत नाही Happy )

मिलिंदा

तुमचा सल्ला खरच चांगला आहे... आभार Happy
जे सत्यात घडलय ते सत्य म्हणुन न लिहिता केवळ कथा म्हणुन लिहण जास्त योग्य असत कदाचित.

'ओळखीच्या/ माहीतीतल्या' वा ज्या संस्था मध्ये मी काम केलय तिथल्या मुली/मुलीं बरोबर हे अस घडल अस लिहिण्या एवजी मी मैत्रीण शब्द वापरुन संबोधन करते इतकच... बाकी आता मैत्रीण शब्द लिहितांना विचार करेन... Happy

ज्यांच्या सोबत काही विक्षीप्त घडल असेल वा ज्यांना काही प्रोब्लेम असेल अश्यांना मैत्रिण बनवण वा बोलावण बर्‍याच लोकांना रुचत नाही हे खोट नाही!!

प्रतिक्रीयां बद्द्ल मी परत तेच सांगेन प्रतिक्रिया चांगल्या शब्दातही देता येतात मन दुखविणारे, वाद घालणारे ई. शब्द न वापरता. (चांगल्याच प्रतीक्रीया, चांगल्या प्रतिक्रिया, चांगल्या शब्दात प्रतिक्रिया यात फरक आहे)

चांगल्या शब्दात प्रतिक्रिया द्या ही विनंती आहे, पुन्हा तेच उदा. देते:

"तु हे लिहलस/केलस ते घाण, वाईट, अर्थहीन आहे" ह्या शब्दांपेक्षा

"तु जर हे अस लिहल/केल असत तर अधिक चांगल/अर्थपुर्ण झाल असत" अश्या शब्दात प्रतिक्रीया का लिहु नये हे माझ म्हणण आहे...

माझ म्हणण चुक असेल तर मी क्षमस्व आहे!!!

(मराठी ही माझी मुळची भाषा नाही त्या मुळे कदाचित मला माझे भाव निट लिहता येत नसावेत.. आणी मला नेमक काय म्हणायचय ते वाचणार्‍यांना समजण अवघड होत असाव... )

http://www.maayboli.com/node/5046

गार्गी
मी फक्त कुणाला तरी प्रेमात आलेला अनुभव माझ्य शब्दात लिहलाय...लेखात समजण्या सारख अस काही खास नाही... प्रेमात असे ही अनुभव येतात आणी love is blind ह्या शिवाय ... आभार Happy

जरा जोब च्या ईगो मध्ये स्त्रित्वाच भान विसरु नका.
मैत्रिनिना सन्गा जरा जपुन.