"मुंबई"

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 31 July, 2014 - 23:29

बात चुकतेच ठोकताळ्याची
मुंबईतील पावसाळ्याची

स्वाद देतो चहा न उंचीही
आठवण दाटते उकाळ्याची

बंद दारात कोंडली गेली
माणसे चाळितिल जिव्हाळ्याची

बाल्कनीतून जग खुले झाले
मौज नाहीच पोटमाळ्याची

कौतुके लाख पंढरीची पण
वाट माझी जुनी वडाळ्याची

होय गर्विष्ठ वाटतो "कैलास"
नम्रता बाणतो लव्हाळ्याची

--डॉ.कैलास गायकवाड

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नव्या जमीनीसोबत काही फ्रेश कल्पना, नवे शब्द.
बढिया.

बाल्कनीतून जग खुले झाले
मौज नाहीच पोटमाळ्याची

एकंदर गझल आवडली.
मक्ता भावला नाही. तसेच चाळितिल खटकत आहे कानाला.

होय गर्विष्ठ वाटतो "कैलास"
नम्रता बाणतो लव्हाळ्याची <<< वा

बाल्कनीचा शेरही मस्त!

बाल्कनीतून जग खुले झाले
मौज नाहीच पोटमाळ्याची

कौतुके लाख पंढरीची पण
वाट माझी जुनी वडाळ्याची

मस्तच . Happy

मस्त !
वेगळाच बहर जाम आवडला.

सर्वच शेर आवडले.

मक्त्यामध्ये 'गालगा गालगा लगागागा' झाले नाही का ?

मक्त्यामध्ये 'गालगा गालगा लगागागाल' झाले नाही का ?<<<<< जितू ही सर्वमान्य सूट आहे तखल्लुसासाठी अशी एखादी मात्रा मक्त्यात एखाद्वेळेस वाढलीच तर सूट मान्य केली जाते मी असेही पाहिले आहे की ही मात्रा सहसा तखल्लुसाच्या शब्दात दडलेली असते आणि सहसा ते ओळीचे शेवटचे अक्षर असते / मात्रा असते ह्या प्रकाराला काहीतरी नावही आहे पण आता आठवत नाहीये (हा नियम आहे की केवळ एक मतप्रवाह हे माहीत नाही )

धन्यवाद

छान

दुस-या शेरातील 'न', तिस-यातील -ह्स्व दिर्घातील सूट यामुळे रसभंग होतो आहे. बाकी खयालातील वैविध्य आवडले.

बाल्कनीतून जग खुले झाले
मौज नाहीच पोटमाळ्याची

होय गर्विष्ठ वाटतो "कैलास"
नम्रता बाणतो लव्हाळ्याची >>> हे जास्त आवडले.

vaah

बुमरँग,

ही गझल.....ये मुलाकात इक बहाना है...प्यार का सिलसिला पुराना है....या चालीवर म्हणून पहा.

किंवा....तुमको देखा...तो ये खयाल आया.....या चालीवर म्हणा.

लज्जिता व्रुत्तातील गझल आहे.

सर्वान्चे अनेक आभार.

.तुमको देखा...तो ये खयाल आया.....या चालीवर म्हणा.
>>>>

जबराट.... 'पावसाळ्याची' तर कसलं भारी वाटलं ! सहीच....