पंचधातूची गणेशमूर्ती

Submitted by sunilt on 30 July, 2014 - 22:56

यंदा शाडू अथवा POP च्या गणेशमूर्तीऐवजी कायमस्वरूपी अशी पंचधातूची मूर्ती आणण्याचा विचार आहे.

तशा मूर्ती ठाण्यात कुठे मिळू शकतील? तसेच साधारणपणे २ फुटांच्या मूर्तीची किंमत किती असू शकेल?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुनील, कौपिनेश्वर मार्केटात विद्वांसांकडे चौकशी कर कोणी बनवून देईल का त्याची. पितळेच्या मुर्ती डेकोरेटिव्ह आयटम्सच्या दुकानात पण मिळतील, पण सगळे धातू योग्य प्रमाणात मिसळून खात्रीची पंचधातूची मुर्ती घडवून देणारा कारागिर हवा.

अजून नेहमीच्या सोनाराकडेही चौकशी कर.

पण सुनिल कायमस्वरूपी गणेशमूर्तीचि दर वर्षी स्थापना आणि तिचे विसर्जन योग्य आहे का ?

योग्य - अयोग्य आपण ठरवायचे, मला तरी त्यांचा निर्णय योग्य वाटतोय. प्रदुशन न केल्याने देव जास्तच खुष होइल त्यांच्यावर.

आणि समजा प्रथा पाडणार्‍यानेच अश्या धातुच्या मुर्तीची प्रथा पाडली असती तर केलीच असती ना आपण. तेव्हा काळानुरुप प्रथा बदलायला हव्यात. कमीत कमी जे करतायेत त्यांना पाठींबा तरी द्यायला हवा.

पण सुनिल कायमस्वरूपी गणेशमूर्तीचि दर वर्षी स्थापना आणि तिचे विसर्जन योग्य आहे का ? >> योग्य नाही असे आपल्याला वाटते कां?? असल्यास त्याचे कारण?

आपल्या समजुतीनुसार, प्राणप्रतिष्ठा केल्यानंतरच मूर्तीत देवत्व येते. उत्तरपूजेनंतर ते लयास जाते. त्यानंतर मूर्तीत देवत्व तसेही नसते.

पुढील वर्षी पुन्हा प्राणप्रतिष्ठा करायची असतेच.

खेरीज, प्रदूषण टाळणे हा फायदा आहेच.

पंचधातूची मूर्ती तयार घेण्यापेक्शा ओतून घ्यावी, खात्रीची असण्याचा तोच एक मार्ग आहे. धातू आणि मूर्तीचे मॉडेल पुरविणार असाल तर कोणताही फोउन्ड्रीवाला ओतून देइल.

एक भा. प्र. : पंचधातूच्या मूर्तीमधे काही विशेष असते का? (माहीत नाहीय नीट म्हणून विचारतो).

म्हणजे गंजत नाही, काळी पडत नाही, असा काही प्रकार आहे, की अजून काही कारण?