लो कार्ब डाएट -----मदत हवी आहे....

Submitted by नाना फडणवीस on 24 July, 2014 - 07:54

लो कार्ब डाएट बद्दल माहिती हवी आहे....काय खावे....काय नाही.....Triglycerides are too high - 1200 :(....प्लिज माहीती द्या....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणी एक माहिती म्हणजे...मी ब्रुस्सेल्स ला एकटा असतो.......options are very limited....cos I am living as a forced bachelor....

माबोकरान्नी नेहमीच मदतीचा हात दिलाय्....या वेळीही अपेक्षा आहे....

हाय प्रोटीन डाएट ची मदत होईल असं वाटतंय.
तुम्हाला बनवता येतं का काही? के संपूर्णपणे बाहेरच्या जेवणावर अवलंबून आहात?

धन्यवाद अरुंधती

धन्यवाद दक्षिणा >>>>आता जिवावर बेतलय म्हंटल्यावर काहीही करीन्...पण सांग्....डॉक्टर म्हणाले कि किडनी fail होउ शकते.... Sad

नेटवर फिरत असलेल्या जीएम डाएट चार्टचा वापर एका ओळखीच्या बाईंनी केला होता. त्या रस्त्यात चक्कर येऊन पडल्या. डॉक्टरला कन्सल्ट करणे योग्य

मान्य आहे बॉबी....पण प्रॉब्लेम असा आहे कि परदेशी राहात असल्यामुळे खायचे खुपच हाल होतात्....ब्रेड खाल्लाच पाहिजे कारण पोळ्या करता येत नाहित्......भात करता येतो पन वाचून कळलं की ते ही चन्गले नाही....काय खावं कळंतच नाहिये!! Sad

नाना , माझ्या एका नातेवाईकांनी वयाच्या ४८ व्या वर्‍शी ८०० ट्रायग्लिसेराईड्सचा काऊंट एका वर्षात नॉर्मल आणला आहे. त्यांना विचारुन लिहिते सविस्तर.
सध्या त्यांनी केलेले बदल जे मला लक्षात आहे ते सांगते

१. भात अर्धी वाटी पेक्षा जास्त नाही
२. चपाती ४. पण एकावेळी एकच चपाती. २-३ तासाने रोल /रॅप बनवुन खाउ शकतात.
३. फळ पण एकावेळी एक पूर्ण नाही. अर्धे सकाळी ७ ला अर्धे दोन तासानंतर.
४. सॅलड्स त्यतल्यात्यात जास्त पण भरपूर नाही. भाज्या योग्य प्रमाणात
५. अल्कोहोल बंद, स्मोकिंग बंद
६. व्यायाम अगदी नियमित. आठवड्याचे ५ दिवस

तुमची शुगर, थायरॉइड लेव्हल चेक केली आहे का ? नॉर्मल आहे का? वजन नॉर्मल आहे का?

माझ्या ओळखीचे एक पंजाबी गृहस्थ बर्फाळ प्रदेशात होते संशोधनासाठी. डीप फ्रीजर मधे फ्रोजन फूड चा स्टॉक होता. त्यांनी मोड आलेले कडधान्य, कच्च्या भाज्या, फ्रूटस अशा आहाराची सवय लावून घेतली आणि हिंडणे फिरणे भरपूर ठेवले. नाईलाजास्तव होतं हे , पण त्याचा त्यांना खूप फायदा झाला.

1200 triglycerides seems rather high.
In addition to low carb diet, you should consider reducing /eliminating things like bacon, chicken or goose liver, other fatty cuts of meat , egg yolks etc. These are very common ingredients in French cuisine. I imagine Belgian cuisine has a strong French influence.

Try to use whole grain / multi grain breads instead of white breads. Also increase your consumption of foods high in fiber - fresh vegetables, fruit, oat meal etc.
I would recommend consulting a local dietitian as they can give you better guidance about foods / ingredients available locally.

माझ्या नवर्‍याच्या मित्राचे पण खूप वाढले होते ट्रायग्लिसराइड्स. भात जवळपास सोडून नि चालण्याच्या व्यायामाने एकदम नॉर्मल आले. अर्थात प्रत्येकाची तब्येत वेगळी असते तेव्हा डाएटिशियनचा सल्ला घेणे बेस्ट.
माझी डॉक्टर नेहमी फिश ऑईल च्या गोळ्या द्यायची या समस्येसाठी. तुम्हाला काही औषध दिले नाही का?

प्रिंसेस, bobby jasoos, मेधा, सुपरमॉम , अरुंधती , आयान्नो खरं सान्गतो....तुम्ही प्रतिसाद दिला....मला अस वाटलं कि ज्णु माझी आई मला सल्ला देतीये.......खूप खूप धन्यवाद......the problem with dietician is that there are very few who could be speaking english...and I dont know french....tyaat ek site saangate ki low fat doodh pya....ek site saangate high fat doodh, lamb chalate mhanoon....gondhalalee bahoolee Sad

भारतातल्या परिचित डॉक्टर्सना तुमचे रिपोर्ट्स् इमेल करून, त्यांच्याशी संपर्क साधून तपशीलवार मार्गदर्शन नक्की घ्या. तिथे कोणत्या प्रकारचे अन्न उपलब्ध आहे, त्यातले तुम्हाला कोणते चालेल इ. चर्चा नक्की करा. नेटवरची माहिती पुरेशी नसते. शिवाय तुमची प्रकृती जाणणारे डॉक्टर जो सल्ला देतील तो जास्त हितावह असेल. जे काही कराल ते डॉकच्या सल्ल्यानेच करा.

माझ्या सासर्‍यांनी केलेला, ट्राईड आणि टेस्टेड असा हा उपाय आहे. सोपा, कमीखर्चाचा , नो कुकींग स्कील नीडेड आणि जगाच्या पाठीवर कुठेही करता येण्यासारखा

एक कप (भारतातला) दूध , त्यात तेवढेच पाणी व लसणाच्या सुमारे ८-१० पा़कळ्या(भारतातील साइजप्रमाणे) व्यवस्थित ठेचुन घालून हे मिश्रण एक वाटी होईल एवढे उकळायचे. सकाळी, अनशा पोटी(पाणीसुद्धा न पिता) ते प्यायचे. त्यानंतर सुमारे अर्ध्या तासाने चहा/कॉफी वगैरे रुटीन सुरु करायचे.

पांढरं पीठ ( म्हणजेच कार्ब) हे ट्रायग्लिसरॉइड्चं मुख्य कारण मानतात. म्हणजेच ब्रेड, पास्ता, पेस्ट्रीज व साखर हे बाद. ब्रेड अगदी मापून तो सुद्धा व्हीट/मल्टीग्रेनवाला. दिवसातून एकदाच. म्हणजेच लंचला सॅंड्वीच व डीनरला भात असं करता येईल. भातासाठी ब्राऊन राइसचा पर्याय उत्तम राहील. भाताचा आणखी एक पर्याय पोहे. तेही, भिजवलेल्या वाटीभर पोह्याला तीन वाट्या कापलेल्या भाज्या या प्रमाणात(कांदा, भो. मिरची, कोबी, फ्लॉवर, पालक चिरुन, मटार, मोड आलेले मूग, ब्रोकोली, अगदी तुम्हाला हवं ते), किन्वाचा उपमा वगैरे.

नाचणीचं व ह. डाळीचं पीठ मिळत असेल तर त्याची धिरडी छान होतात. भारतातून थालीपीठाची भाजणी मागवा. त्याची छोटी थालीपीठं लावता येतील. असो.

यासगळ्याबरोबर अर्थातच जमेल तेव्हढ्यापेक्षा किंचीत जास्त व्यायाम, चाळीशीच्या आत असाल आणि फिजीकली तंदुरुस्त असाल तर जरा रिगरस टाईपचा व्यायाम(डॉ. सल्ला आवश्यक) करा. सुरु करायच्या आधीचं रीडींग आहेच. सहा महिने सातत्यानी वरील उपाय केल्यावर पुन्हा ब्लड टेस्ट करा.

तुम्ही जे कुठले प्रयत्न कराल त्यास शुभेच्छा! एकटे रहाता आहात काळजी घ्यालच.

तुम्हाला काही प्रश्न असल्यास जरुर विचारा. संपर्कातून विचारलं तरी चालेल.

मी डॉ नाही, न्युट्रीशनिस्ट वा डाएटीशियन नाही. वाचून, अनूभवूनव जवळच्या नातेवाईकांच्या अनुभवांतून मिळालेले हे ज्ञान आहे. (संपूर्ण्पणे हार्मलेस हे माझे वैम)

सगळं सोडा नि या ईकडे, जिवापेक्षा काही मोठं नाही, खायचे प्याचे वांदे होत असतील फायदा काय पॆसा कमवुन

ईकडे दोन पॆसे कमी मिळतिल, पण खायची आबाळ होणार नाही. डाॅक्टर चांगले मिळतील

बरे झालात की जा हवतर परत

शुगोल...धन्यवाद...

बन्या....कोणाला काळजी वाटणे साहजिक आहे रे....पण कळतय पण वळत नाहिये बघ्....दुसरं म्हणजे इथे राहून सुध्धा care घेता यील ना....पण सुरुवात झाली पाहिजे कुठे तरी....

माबोकर्स्....धन्स....आज या जगात फार ओळख नसताना सुध्दा काळजी वाटणारे लोक आहेत हे बघून खरच बरं वाटतय... एक जबाब्दारी वाटतीये कि आपण खरच आता सुधारुन घेतलं पाहिजे.....

भाजलेले जवस/आलशी/फ्लेक्स सीडही अतिशय उपयुक्त हे तुम्ही सॅलॅड, चटणी, मुखशुध्दी (आलशी, ओवा, तील, बडीशोपह) ह्या प्रकारे खा. हा एका डायटिशीयने सांगितलेला आहे.व्यायामाला पर्याय नाही.

'कॉस्टकोतून फ्लॅक्समील घेऊन ये. एखादा पदार्थ ओव्हनमधे बेक करणार असशील त्यावेळी लसणाचे दोन गड्डे मुळांकडला भाग छाटून ऑलिवऑइल चोपडून, वर लालमिरच्यांचे फ्लेक्स घालून, फॉइलमधे बेक करायला ठेव. दोन वाट्या फ्लॅ.मीलात मीठ, एक चमचा भाजकी जिरपूड आणि हवं तितकं तिखट घालून मिसळून घे. लसूणगड्डे गार झाल्यावर नुस्त्या बोटांनी दाब देऊन लसूण्पाकळी बाहेर निघेल. पाकळ्यांना फोर्कने बारिक करून (बोटांनी) जवसपुडीत मिसळ. अफाट मस्त चवीची चटणी होईल.'

ही वरची चटणी मृण्मयीची भारी रेसिपी आहे. अगदी सोपी कृती आहे. मला प्राडीनं दिलीय Happy )

ना.फ.
सुरुवात होउ द्या.. diet control तर कराच पण व्यायाम अगदी आवर्जून करा. व्यायामाला पर्याय नाही.
स्वानूभव Happy

तिकडे 'रसमम' क्रिटिकल कंडिशनम चा धाग्यावर कुणि तरि प्रतिसाद दिलाय ' ड्रिंक्स बरोबर रस्सम मस्त लागते,एकदा करून बघा...आम्हि आता ह्याला मुकलो' अस काहिस...

नाफ,तुम्हाला कल्पना आहे का हो,कुणि लिहिलय ते??? हलके घ्या Proud

वरील सर्वांचे सल्लेतर भारी आहेतच.
त्यात अजुन एक, टेंशन घेऊ नका. ट्रायग्लिसराइडचेही नको. तसेच पुरेशी झोप घ्या. व्यायामाव्यतिरिक्तही शक्य असेल तर वाहनापेक्षा चालण्याचा पर्याय निवडा, लिफ्टऐवजी जिन्यांचा वापर करा. एका ठिकाणी अनेक तास बसुन न रहाता मधे-मधे फेर्‍या मारा.

डाएट तर कराच! जमेल तितकं करा... चपात्या करण्यासाठी रोटी मेकर नाही वापरता येणार का ब्रेड ऐवजी चपात्या, फुलके, पराठे, धिरडी बरे!!! पाकृ इथे खणा... ढिगाने सापडतील!!! नाहीतर सरळ दलिया चा खिचडा वै. खायचा.

व्यायाम मस्ट!! (आम्ही पण सुबह का भूला वालेच :फिदी:) इथे जॉईन व्हा... न ऐकणार्‍याचे हक्काने कान उपटले जातील. http://www.maayboli.com/node/50148

शुभेच्छा!

शुगोल मस्त प्रतिसाद... इथून बर्‍याच टिप्स मिळताहेत आहाराच्या. धन्स लोक्स!!