समांतर रेषांचं प्रमेय

Submitted by कमलेश पाटील on 23 July, 2014 - 02:58

आजकाल तुझ्या नसण्याची
सवय व्हायला लागलीय
तू परतावास म्हणून लावलेल्या
दीव्यावरही काजळी जमायला लागलीय.

भोवताली अनुभवत गमावलेल्या तुला
उगीचच आसावत राहताना
हातातून सगळंच निसटून गेल्याची
वेदना डोंगराऐवढी अचानक दाटतीयं

तू माझा मी तुझी असताना
न बोलता उमलणारं आपलं नातं
त्यालाही आता समजून घ्यायला
एकेक शब्दांची गरज भासतीय

दोन समांतर रेषांचं प्रमेय
खोडून काढायचं असं आपलं ठरलेलं
जगाला वेडं बनवण्याच्या नादात
आपलीच फसगत झालीय

नसतात बदलता येत नियम कधी
आपल्यालाच बदलावं लागतं
जपलेलं संचीत पुरवायची
आयुष्याला सवय लागलीय.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान