एका लघुग्रहास मायबोलीकर aschig (आशिष महाबळ) यांचं नाव मिळाल्याबद्दल अभिनंदन!

Submitted by गामा_पैलवान on 21 July, 2014 - 08:52

लोकहो,

एका लघुग्रहास डॉ. आशिष महाबळ यांचे नाव त्या लघुग्रहाला देण्यात आले आहे. 'महाबळ' म्हणून हा लघुग्रह आता ओळखला जात आहे.

याबद्दल मायबोलीकर aschig (आशिष महाबळ) यांचं नाव मिळाल्याबद्दल अभिनंदन!

सध्या डॉ. महाबळ हे अमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी येथे सिनीअर सायंटिस्ट म्हणून कार्यरत आहेत.

बातमी इथे आहे :
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha/Aster...

आ.न.,
-गा.पै.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आत्ताच वाचले!
आशिष महाबळ यान्चे मन्गळ आणि गुरु मधल्या लघुग्रहान्च्या सन्ख्येइतके अभिनन्दन Happy खरोखर ही अभिमानाची गोष्ट आहे.

मटाच्या बातमीत खालील उल्लेख आहे
"हा लघुग्रह 'सध्या' सुर्याच्या पश्चिमेस ३० अन्शावर आहे"
हे दोन्ही उल्लेख अशास्त्रीय आहेत.
१. सध्या म्हणजे नक्की कुठल्या वेळी
२. स्पेस मधल्या सर्व दिशा ह्या कशाच्यातरी सापेक्ष असतात, त्यामुळे सुर्याच्या पश्चिमेस ३० अन्शावर कुणाच्या द्रुष्टीने? तसेच पूर्व पश्चिम ह्या दिशा पृथ्विवरील सुर्य उगवण्याच्या व मावळण्याच्या दिशेवरून आपण ठरवतो.

आशिच्ग ह्याना विनन्ती की त्यांनी कृपया कुतुहलाचा खुलासा करावा Happy

Pages