अजूनही मंद मंद छातीत श्वास होता!

Submitted by profspd on 14 July, 2014 - 12:20

अजूनही मंद मंद छातीत श्वास होता!
स्मशान खोळंबले, न अवधी कुणास होता!!

किती जरी चाललो, अखेरी तिथेच आलो....
कलेवरासारखाच माझा प्रवास होता!

प्रसंग बाका, परंतु सुटलो सहीसलामत....
तुझ्या कृपेचा कटाक्ष तो आसपास होता!

कुणास ठाऊक, बाग केली कुणी खरेदी?
असा कसा चेहरा फुलांचा उदास होता?

कितीक पापी नि दुष्ट दुनियेत मातलेले....
जरी कमी संत, तोच टेकू जगास होता!

बघून मृगजळ तहान मी भागवीत होतो....
प्रवासभर सोबतीस हा गोड भास होता!

निघून गेला असेल कोणी निमूट इथुनी...
तमाम हा आसंमत झाला भकास होता!

तुझ्याच प्रेमात काय पडलो, कमाल झाली....
वसंत झाला जणू अता बारमास होता!

तुझ्यामुळे जिंदगी सुगंधीत जाहली ही....
हरेक श्वासामधे तुझा तो सुवास होता!

सुनावली शायरी अशी मैफलीस मी की,
हरेकजण हासला किती दिलखुलास होता!

जगास का वाटते करे मी भविष्यवाणी?
परिस्थिती पाहुनीच केला कयास होता!

कधीच गझलेत नाव मी गुंफले न माझे.....
कळेल माझी गझल असा बाज खास होता!

अटीतटीने झटीत होतो जगायला मी....
कळायच्या आत खेळ झाला खलास होता!

अखेर माझेच ओठ, माझेच दात होते....
मला स्वत:चाच जास्त सर्वात त्रास होता!

अनेक मतले उभे प्रतीक्षेत पूर्ण व्हाया....
तुझाच गझले, विचार चोवीस तास होता!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रसंग बाका, परंतु सुटलो सहीसलामत....
तुझ्या कृपेचा कटाक्ष तो आसपास होता!

छान.
व्यक्तीगत आयुष्याशी संबंधित आहे, काही अडचण नसेल तर खुलासा करणार का या प्रसंगाविषयी ?

--------------------------------------------------------------------------------------------------------

कधीच गझलेत नाव मी गुंफले न माझे.....
कळेल माझी गझल असा बाज खास होता!

खरंय अगदी.
फोन नंबर, हुद्दा, कामाचे ठिकाण असे तीन शेर होऊ शकतात अजून. Wink

निघून तो काय गेला निमूट इथुनी....<<< ह्या ओळीतल्या वृत्तभंगामुळे

कधीच गझलेत नाव मी गुंफले न माझे.....
कळेल माझी गझल असा बाज खास होता!

अनेक मतले उभे प्रतीक्षेत पूर्ण व्हाया....
तुझाच गझले, विचार चोवीस तास होता!<<<

ह्या चार ओळी सोसत नाही आहेत.

जमीन तस्करी .... गदंवि/शेर-ए-हझल/अपराध क्र.१/१

अजूनही मंद मंद दरवळत वास होता
रुमाल नाकास लावण्याचाच त्रास होता

जमीन तस्करी .... गदंवि/शेर-ए-गझल/अपराध क्र.१/२

कुठून आलो? कशास आलो? कुठे निघालो?
अगम्यतेने मुकाच माझा प्रवास होता

अजूनही मंद मंद छातीत श्वास होता >>> अरे काय लिहितात हे.
ईन मीन चार शब्द एका मिसर्‍यात, त्यातही अर्धा मिसरा वर्तमानकाळात आणि अर्धा भूतकाळात. काळ, कर्ता ई. व्याकरणाचं पार फतफतं करून टाकलं आणि ह्या फतफत्यात गझलियत तर पावकोर शेंगदाणा सापडावा आणि तोही खवट निघावा अशी.

अनेक मतले उभे प्रतीक्षेत पूर्ण व्हाया....
तुझाच गझले, विचार चोवीस तास होता! >>> एक कॉम्प्युटर प्रोग्राम जरी लिहिला की, मराठी डेटाबेसमधून रँडम शब्द ऊचलायचे, त्यांना लघू, गुरू मात्रा आणि यति असे नियमांचे फंक्शन लावायचे आणि एखाद्या वृत्तात त्यांच्या दोनोळी बांधायच्या.. तरी बदाबदा चांगल्या गझला पडतील राव.

प्रोफेसर तुम्ही हे प्रोग्राम बनवायचे मनावर घ्याच, मग दिवसागणिक नाहीतर मायक्रोसेकंदागणिक गझला पाडाल. चोवीस तासात अहगहणित गझला तयार होतील.

जमीन तस्करी .... गदंवि/शेर-ए-गझल/अपराध क्र.१/३

असे कसे हे अरिष्ट्य भारी टळून गेले?
असेल सत्कर्म पुण्य-गाठी; कयास आहे

मुट्या,

तलम रेशमाला गोणपाट लावतोस काय रे?

माझ्या असंख्य गझला या जमिनीत आहेत! तू आताशीे रांगतो आहेस खुरडतो आहेस!