काय त्यांच्या आत काही हालले का?

Submitted by profspd on 12 July, 2014 - 05:15

काय त्यांच्या आत काही हालले का?
वारलो मी, आणि ते ओशाळले का?

राखरांगोळीत वेड्यासारखा मी....
शोधतो की, स्वप्न कुठले वाचले का!

झुळुक होती की, तुझी चाहूल होती?
हृदय हे पळभर असे झंकारले का?

गुणगुणाया लागले ते एकट्याने.....
काय माझे शेर त्यांना भावले का?

एकमेकांचे इशारे पाहिले मी......
कोण जाणे, पाहुनी मज हासले का?

हारजीतीचा न काथ्याकूट केला....
ना तमा मज, हारले का, जिंकले का!

श्वास होते मंद, निपचित देह निजले....
कैकजण पाहून गेले, वारले का!

धसमुसळ त्यांचीच आहे धसकट्यांची.....
हेंगडे म्हणतात वरती फाटले का?

श्वास घेतानाच सरली जिंदगानी.....
जिंदगीभर श्वास नुसते घेतले का?

भूक केव्हाची बिचारी थांबलेली....
पाहते ताटात काही वाढले का?

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्वास होते मंद, निपचित देह निजले....
कैकजण पाहून गेले, वारले का!<<< Rofl

धसमुसळ त्यांचीच आहे धसकट्यांची.....
हेंगडे म्हणतात वरती फाटले का?<<< धसकटे आणि हेंगडे हे शब्द नवीन असल्यामुळे त्यांचेच हसू आले आधी! (म्हणजे पूर्ण शेराचे हसू यायच्या आधी)

Lol

LOL!

mothya kashtane sagalyach gaal BB wr pratisad denyach talat hote.
ithe control ch zaal nahi Lol

साद देती हिमशिखरे शुभ्र पर्वताची
क्रमीन वाट एकान्ती ब्रम्हसाधनेची
मला नाही उरली आता ओढ प्रपन्चाची...

अशी काहीशी अवस्था साधारण निवृत्तीनन्तर होते. ती योग्यच आहे, पण बाकीचे अजून निवृत्त झालेले नाहीत, काही तर तारुण्याच्या अजून पन्चविशीतच आहेत. त्यान्च्यावर या गझलान्चा भडीमार झाला तर ते पण निवृत्तीचा विचार करतील.:फिदी:

देवा तुझ्या गाभार्‍याला उम्बराच नाही........पुढचे सुज्ञानी पूर्ण करावे.

आता कुठे गझला लिहायला उसंत मिळाली आहे! आता फक्त गझल, गझल आणि गझल!
मग कुणी पंचवीशीत असो किंवा गद्धेपंचवीशीत असो!