सरते वर्ष आणि नविन वर्षाच्या शुभेच्छा..

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

२००८ सरत आले. या वर्षाचा मागोवा बरेचसे स्तंभलेखक घेतीलच पण काहि गोष्टी येक भारतीय म्हणुन कायम लक्षात राहतील
२००७ संपताना मी येकंदरीत भारतीय शेअर बाजारा बाबतीत आशावादी होतो. जरी २००७ सारखे रीटर्न्स नाहि मिळाले तरी आपल्या अर्थव्यवस्थेचा पाया भक्कम असल्याने आणि त्यातुन आपण चिन प्रमाणे निर्यातीवर फार अवलंबुन नसल्याने जागतीक स्लोडाउन चा आपल्यावर फार परिणाम होईल असे वाटले नव्हते. जागतीक मंदीच्या लाटेत भारतीय बाजार ही कोसळला आणि २००८ च्या शेवटी आज स्वतःचा पोर्ट्फोलीओ बघवत नाही. बाकि छोट्या गुंतवणुकदारांची परिस्थीती फार वेगळी नसावी.तरिही येकंदरीत भार्तीय अर्थव्यस्थेबाबत आशावादी असल्याने वर्षभर थोडे थोडे वॅल्यु बाईंग चालुच ठेवले.

खेळाच्या बाबतीत मात्र हे वर्ष चांगलेच म्हणावे लागेल. कधी नव्हे ती भारताने वय्यक्तीक ऑलेंपीक सुवर्णाची कमाई केली. आणखीही पदकांची कमाई केली. बुध्दीबळ, बॅड्मींटन साठिही २००८ उत्तमच. क्रिकेट च्या दुनियेत धोनी च्या टिम ची कमाल लक्षात राहिलच त्याबरोबर सौरव, कुंबळे च्या रिटायरमेंट साठि ही हे वर्ष लक्षात राहिल.
चांद्रयान हा आपल्या अवकाश प्रकल्पातला महत्वाचा टप्पा. २००३ साली मंजुर झालेला चांद्र्यान १ , २००८ मधे आकारास आला हे इस्रो आणि प्रत्येक भारतियाला अभिमानास्पद.

२६/११ चा मुंबै आणि भारता वर झालेल्या दुर्देवी हल्यावर तर इथे जवळ्जवळ सगळ्यानीच लिहलय. ती घटना विसरणं अशक्यच पण त्या निमित्ताने सुरु झालेल्या विचारमंथनातुन काहितरी भरीव उपाय उभे राहातील हा माझा भाबडा आशावाद

सर्व मायबोलीकराना नविन वर्षाच्या शुभेच्छा.
http://colors-etc.blogspot.com/

विषय: 
प्रकार: 

२००९ हे वर्ष रॉबीन हूड यांच्या पुनरागमनाने लक्षात राहील.. Proud

माझ्या तर्फे सर्व मायबोलिच्या रसिकाना नविन वर्शाच्या हार्दिक शुभेच्छा !