मुंबईची गाथा

Submitted by लाल्या on 11 July, 2014 - 05:27

एक होती मुंबई, तिची ऐका गाथा.

कोळ्यांची मुम्बादेवी, हौसेने नटली,
बघता बघता इकडे, मुंबा नगरी वसली.
मराठमोळी माणसांची, मराठमोळी वस्ती.
कोणाची नाही फ़िकर, कोणाची नाही धास्ती.
मुंबईच्या नावाने, उजळला मराठी माथा.
एक होती मुंबई, तिची ऐका गाथा.

मुंबईच्या सुखापासुन, लांब तिथे दूर.
बिहार आणि यूपी मध्ये, होता भ्रष्टासुर.
त्यांच्या लोकांचे होते, जेवणाचे हाल.
सर्वांनी साद घातली, "बंबई हमें पाल".
मराठीने त्यांना दिला आपला अर्धा वाटा.
एक होती मुंबई, तिची ऐका गाथा.

मुंबईमध्ये हळुहळु, झाली भरभराट,
सर्वांना दिसे इथे, भाग्याची पहाट.
देशाच्या सर्व भागांतून, लोक इथे आले.
मुंबईने सर्वांना आपलंसं केले.
सारी तिची लेकरे, सर्वांची ती माता.
एक होती मुंबई, तिची ऐका गाथा.

टॅक्सीवाला सरदारजी, कलईवाला खान.
मुम्बईत पहायला मिळे, सगळा हिंदुस्तान.
मुंबईने सर्वांना, घेतलं आपल्या कुशीत,
घर दिलं, माया दिली, सगळे होते खुशीत.
मुंबईचे गुण गायी, सर्व येता जाता.
एक होती मुंबई, तिची ऐका गाथा.

आधी आधी वाटले, सारे मुंबईकर.
हळुहळु पाहुणा बसला छातीवर.
जिथे हवं थूंका, जसं हवं रहा,
मुंबई गेली खड्ड्यात, पैसा तेवढा पहा.
"यूपी बिहार के लियेही बंबई बना था."
एक होती मुंबई, तिची ऐका गाथा.

बघता बघता मुंबईत, वाढु लागली गर्दी.
"गर्दीने तो बम्बई की, हालत पतली कर दी."
मुंबईत सगळीकडनं, माणसांचा लोंढा आला.
मुंबईतला मराठी, दिसेनासा झाला.
"तुम्ही कोण? मराठी? अंबरनाथला राहता?"
एक होती मुंबई, तिची ऐका गाथा.

मुंबईतुन मराठी, झाली कुठे गुल?
मराठींनाच दाखवी बोर्ड "हाउस फ़ुल".
जे जे आले मुंबईला कामधन्द्यासाठी.
सीमापार केली त्यांनी माय मराठी.
मराठी मातीमध्ये, बाकीच्यांच्या बाता.
एक होती मुंबई, तिची ऐका गाथा.

म्हणायला मुंबई होती आर्थिक राजधानी.
पण तिची झोळी, सदैव रिकामी.
साद घाले दिल्लीला, बनवुन द्या हो रस्ते.
दिल्ली म्हणे नाक उडवुन, "माफ़ करो, नमस्ते.
सारा धन हमारा, पहलेही कहा था!"
एक होती मुंबई, तिची ऐका गाथा.

मुंबईच्या जमीनीवर, गर्दी गेली वाढत.
बघवेना फुगलेल्या मुंबईची हालत.
जागोजागी फ़ेरीवाले, पावलोपावली घाण.
एकेकाळी होती जिथे सोन्याची खाण.
ज्यांना दिली माया, त्यांच्याच खाई लाथा.
एक होती मुंबई, तिची ऐका गाथा.

अमराठी वोटेबँकने रोवले इथे पाय.
तेव्हा त्यांच्या नेत्यांना, सुचला एक उपाय.
"चला आता मुंबईतुन आपले खिसे भरु.
मुंबईचे सुद्धा आता, यूपी बिहार करु.
मुम्बाईच्या जमीनीला नासवुया आता."
एक होती मुंबई, तिची ऐका गाथा.

दिवसेंदिवस वाढत गेली, बाहेरच्यांची नशा.
बघता बघता मुंबईची, झाली दुर्दशा.
"अश्रू कोणी बघु नये, डोळे तिचे झाका.
दु:ख तिने सांगु नये, तोंड शिवून टाका."
चालु राहिला अखंडीत, लुटण्याचा सपाटा.
एक होती मुंबई. तिची ऐका गाथा.

मुंबईने जेव्हा आपली, व्यथा सांगितली,
मिडियाने देशामध्ये, जी आग ओतली.
आपल्या जागी मराठीच, झाला बंडखोर.
शिवरायांच्या जमिनीवर, मराठीच चोर?
मुंबईची कैफ़ियत, आता पुढे वाचा.
एक होती मुंबई, तिची ऐका गाथा.

आजही मराठी भाकर अर्धी अर्धी खाईल.
तुमच्या बरोबर मुंबईच्या, पदराखाली राहील.
पण आदर तिचा केला नाहीत, तर याद राखा!
सपाटुन पडेल, मराठी तडाखा.
घाईघाईत पकडायच्या मग घराकडच्या वाटा.
एक होती मुंबई, तीची ऐका गाथा.

काय म्हणता नितिशजी, पासवान आणि लालु?
मराठींच्या व्यथेवर, राजकारण चालु?
बिहारमध्ये लावली तशी आग नका लाऊ.
संतांच्या महाराष्ट्राचा, अंत नका पाहु.
तुका म्हणे "नाठाळाच्या काठी हाणु माथा."
एक होती मुंबई, तिची ऐका गाथा.

-माधव आजगांवकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही....पण ती आधीच्या फॉरमॅट मध्ये होती. तीला "गुलमोहर" मध्ये आणायला दुसरा कोणता मार्ग असेलही...पण मला मिळाला नाही! Sad