काळ

Submitted by चाऊ on 11 July, 2014 - 03:56

कोकीळेसारखं, आपलं पोर
दूस-याच्या घरट्यात सोपवून
काडी कापूस जमवून नेटानं
आपलं स्वत:चं घर बाधण्यासाठी
दिवस रात्र राबायचं

मिळेल तसा तोकडा वेळ
पूरवून, वाढवून
पिलांसाठी, पिलांसोबत
खेळत, शिकवत आणी शिकतही
दिसामासी वाढणारं रुप
प्रेमानं पहात सुखावायचं

त्यांच्या वाढत्या कर्तुत्वाचा
आणी उंचीचाही अंदाज येईस्तोवर
आपल्या आयुष्यातील
सावल्या लांबताना पाहून
जाणवतं, गेला केवढा काळ

आणी आठवतं आपलं बालपण
आईचं वात्सल्यपुर्ण प्रेम
वडीलांचा आधार आणी धाकही
आणी त्यांच्या सरत्या वयात
काठीसारखं, त्यांचा आधार बनून
त्यांना जपण्याचे समाधान

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खर आहे Happy