निर्लज्ज होऊन लिहीली पावसावर कविता

Submitted by ब्रह्मांड आठवले on 10 July, 2014 - 09:47

हे निलाज-या पावसा
अरे तू आलास की पापड ओले होतात
पण त्या लज्जत गेलेल्या पापडासमवेत
कविता पाडायला लावून
वेळीअवेळी शुभ्र कपड्यात भिजतांना
फक्त थंड थंडगार वाटतं..
रस्त्यावरचा चिखल अंगावर उडू लागतो
आणि भरून बाहणा-या कचराकुंडीतलं पाणी
अनेक जिनसा घेऊन लगट करू पाहतंं तेव्हां
गाडी रस्त्याच्या मधून चालवाविशी वाटते.
चालत चालत जाणा-या पादचा-यांना
निषेधाची सोय नसते
मग ते पब्लिक फेसबुकवर मनपाचा उद्धार करतात
त्यांच्या येण्याजाण्याच्या रस्त्यात कचरा टाकणारे हॉटेलवाले
आणि बेफिकीरपणे वडापाव विकणारे हातगाडीवाले
त्यांचं लक्ष होतात
पण अरे अलनिनोला घाबरणा-या पावसा
पुण्यातल्याच पब्लिकला तू त्राही भगवान करून का सोडत असतोस ?
आधीच गोष्टी मनाप्रमाणे घडत नसल्याने बीपी शूट झालेला असतो
तू येऊन सर्दीही शूट करून टाकतोस
आणि परप्रांतीय आपापले स्मार्टफोन काढून भिजणा-या पुणेक-यांना शूट करतात
पावसात अर्थसंकल्प सादर करणा-या आळशी सरकारकडून अपेक्षा तरी काय करावी ?
सगळ्या गाड्या बिहारहून मुंबईला येणा-या
जाणारी एकपण नाही
मुंबईचं काय , त्या पब्लिकला सगळं चालतं
गुडघाभर पाण्यात ऑफीसला जातात
साधा निषेध सुद्धा करत नाहीत
आम्हाला मात्र त्रास होतो
मुंबई आता अडीच तासांवर आलीय
बुलेट ट्रेन सुरू झाली तर एक तासावर येईल
मग सगळे बिहारी, भैय्ये पुण्यात येतील
फ्लायओव्हरखाली बि-हाडं थाटतील
मग हे बेशरम पावसा
तुझ्या साक्षीनं एकदा त्यांच्या झोपड्या पडतील
तिथं नगरसेवकाच्या कार्यकर्तीचं बचत गटाचं हॉटेल होईल
हळूहळू मार्केट होईल
मग भयानक कचरा रस्त्यावर येईल
पावसात तो सडेल
दुर्गंधी सुटेल
तू म्हणशील
ही असली कविता का लिहीली
तर
लोक वैतागलेत पावसाच्या कवितांना
आणि कविता नाहीत म्हणून तू ही नाही
तर दोघांनाही खूष करावं म्हटलं
म्हणून कविता लिहीली
नवे नियम पाळून
नव्या उपमा वापरायचं ब्रीद सांभाळून
आता ना गड्या पावसा
त्या जुन्या गोड कविता विसर
आता कि नाही
कीटक, डुक्कर, गाढव
कचरा, दुर्गंधी, माती, ढेकळं
वरून वाहणा-या फुटक्या ड्रेनेजच्या लाईन्स
त्या कडेला बसणारे भाजीवाले
माशांवर माशा घोंगावत रस्त्याच्या कडेला बसणारे
गाड्यांच्या तेलमिश्रीत कर्बधुराची फोडणी असलेले
वडापाव, भेळ, पाणीपुरी, कच्छी दाबेली आदी जिन्नस
आणि मिटक्या मारत भिजत खाणारं
पावसाच्या कविता न आवडणारं बुद्धीजीवी पब्लिक
आणि या सर्वांपासून दूर कुठेतरी
पुन्हा
श्रावणात घननिळा बरसला
सारखी कविता होईल
या प्रतिक्षेत बसलेले
गंभीर पाडगावकर
तुझ्या विचारात हरवलेले
त्यांच्यासाठी तू वेगळा बरस
आमच्यासाठी वेगळा बरस
आमचं चॅनेलपण आता
विकलं गेलंय
फार्फार रिअलिस्टीक झालय
हे सगळं नव्याने समजून घे
आणि बरस एकदाचा
नाहीतर
जनता माफ नही करेगी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुण्यातल्याच पब्लिकला तू त्राही भगवान करून का सोडत असतोस ?<< तुम्हाला मुंबईच्या म्हणायचंय का? म्हणजे मुंबईतल्याच पब्लिकला....असतोस..पुण्यातल्यापण कर वगैरे... Happy

बाजिंदा कोण हो ते?

<<<<<<<<<<
बाजिंदा | 10 July, 2014 - 09:53
ब्र.आ. , राव तुमच्या नावात लई घोळ हाय .
कविता चांगली व्हती . तुम्ची शैली जरा वळखीची वाटतिया.
>>>>
आवं ते असत्याल जुनंच कुनीतरी Wink

आवडली रचना, सहज आणि प्रवाही आहे.

तसेच शक्य असतानाही उगाच्च करायची म्हणून जास्त तिरकस, खोचक, भडक न केल्या बद्दल धन्यवाद Happy