पिकल पान

Submitted by bnlele on 10 July, 2014 - 08:06

पिकलपान
हिरवी असता झाडावर,
दाटिदाटिनी बिलगून असतात,
वार्‍यासंगे डोलत-नाचत मजेत असतात.
हिवाळा,उन्हाळा,पाऊस झेलून असतात.
हिवाळ्यात दंवांना गोंजारतात=
पावसात भिजून तालावर नाचतात=
उन्हाळ्यात आद्र नजर्रेनी साथ देतात.
शब्दाविना जरि अबोल होतात उष्ण श्वास !
विसाव्याला आलेले पक्षि सुद्धा-
पंखांची चावरी धरतात !
केव्हांतरि एक पान पिकून जात.
पडत देठ गळून गिरक्या घेत खाली येत !
सांगू कां होत अस?
हताश-दिल चौफेर शोधत असत-
सखे-सोयरे अन्‌ गेले दिन-
आपसात मग्न कुणाच लक्षच नसत.
केविलवाण जमिनीवर पडत-
शेजारी तसच पिवळ पान दिसत-
मातीच पांघरूण वरती असत.!!
भास्कर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ख्रर साणंगायच तर योग्य धागा कसा शोधावा हेच कळलेल नाही अन् सांगणर कुणि नाही.
खूप प्रयत्न करून पाहिले पण यश नाहिच.हे ललित सदरात टाकण्याचा मानस होता.

समस्या व्याकरणाची नाही. या आधि मी बरेच लिखाण पोस्ट केल आहे.
नवीन पद्धतीत योग्य समूहाचे सदस्यत्व घेऊन, लेखनाचा योग्य धागाशोधून- निवडून पोस्ट कसे करायचे हे जमत नाहिए
कुणि सांगाव अस वाटत.

.