मी अनमोल ?

Submitted by anjali maideo on 9 July, 2014 - 10:13

मी अनमोल ?
---------------------------
असाच सुस्तावून पडलो होतो एका निर्झरामध्ये
इतरांपेक्षा होतो किंचीत उजळ सप्तरंगी वैगरे
कुणी वेड्या रसिकाने मजला ओंजळीत घेतले
मी ही गेलो सामावून मग त्याच्या खजिन्यामध्ये
कधी सोडले त्याने मजला चंचल मत्स्यांसंगे
मी ही रमलो नितळ नितळ सुशोभित काचमहालामध्ये
कधी टेबलावर विखुरलेल्या बेशिस्त कागदा दडपले
गती विचारा देण्यासाठी कुणी मला गिरकवले
एके दिनी मग आला कुणी तो प्रसिद्ध रत्नपारखी
सांगुन गेला होते माझे मोल अनमोल किती
मग सांगड झाली कारागिराच्या छिन्नी हतोड्यासंगे
पैलू पाडून कातीव मजला कोंदणात बसविले
विराजलो आता कुणा प्रसिद्ध जवाहिरी-याच्या दुकानामध्ये
येता जाता स्तुती लोकांची सहज कानी पडते
खरच आनंदलो का थंड हवा अन् मंद प्रकाशामध्ये
का रहात होतो खळखळणा-या निर्झरात मी मजेने ?

अंजली मायदेव

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users