संपतो रस्ता कुठे कळले मला

Submitted by जयदीप. on 8 July, 2014 - 10:05

परतलो माझ्या जुन्या गावात मी
हरवलो होतो तुझ्या शहरात मी

संपतो रस्ता कुठे कळले मला
वाचला आहे स्वतःचा हात मी

मिळवली मी पारदर्शकता तुझी
टाकली आहे अखेरी कात मी

उघडले आहेस आता दार तू
पिंजरा सोडून आहे जात मी

एवढे अध्यात्म आहे जाणले
गुंतलो आहे किती शरिरात मी

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान