बरा पडतो अरे, एकांत हा संवादण्यासाठी!

Submitted by profspd on 8 July, 2014 - 05:54

बरा पडतो अरे, एकांत हा संवादण्यासाठी!
विनाव्यत्यय स्वत:शी पारदर्शी बोलण्यासाठी!!

किती ओट्याभरण चालू, खुशामत आणि मनधरणी......
किती हे लोक धडपडतात निव्वळ गाजण्यासाठी!

तुला काळीज मी माझे नवे कोरे दिले आहे....
नव्याने बेत स्वप्नांतील अपुल्या आखण्यासाठी!

न सुटला सूर्य सुद्धा झुंडशाहीतून मेघांच्या....
ढगांची झुंड सूर्याला गिळे अंधारण्यासाठी!

निमित्तालाच ते आहेत अगदी टेकले आता....
जरासेही पुरे खुसपट तुला झिडकारण्यासाठी!

मला कळते कधी जिंकायचे, केव्हा हरायाचे....
कलेजा लागतो मोठा खुशीने हारण्यासाठी!

अता माझ्याच हृदयाची सफर दररोज मी करतो....
मला माझ्यातुनी खुडतो, मला विस्तारण्यासाठी!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

टीप: जमिनीचे मक्तेदार कैलास गायकवाड

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुणाशी बोललो नाही कधी संवादण्यासाठी
अताशा ढोल वाजवतो जरासा गाजण्यासाठी

फ़ुकाचा शोधतो कागद,जिणे संपून गेल्यावर,
पुन्हा आलेख जगण्याचे ,नव्याने आखण्यासाठी

प्रकाशाने गरीबी जाहली उघडी, बघावे का
जरा जाळून सूर्याला,पुन्हा अंधारण्यासाठी?

सदा लाथाडले आहे जगाने दु:ख देऊनी
कधी भेटेल संधी हे जगत झिडकारण्यासाठी

नियम पाळून कोणीही कुठे जिंकायचा नाही
जगाचे कायदे पाळू,सुखाने हारण्यासाठी

जगाने जाणली ”कैलास”ची नुकतीच श्रीमंती
जरासा संकुचित झालो ,इथे विस्तारण्यासाठी

........डॅा. कैलास गायकवाड

Rofl

=))

न सुटला सूर्य सुद्धा झुंडशाहीतून मेघांच्या....
ढगांची झुंड सूर्याला गिळे अंधारण्यासाठी!>>>>> हे आवडलं.

जमिनीचे मक्तेदार या नात्याने संदर्भ दिला आहे!
कोणत्याही शोधनिबंधामधे प्रिव्हियस वर्क व संदर्भ दिले जातात तद्वत!

माझा मलाच नावडता असलेला एक शेर आठवला

पराकोटीचा बेशरम तू, लाचार तू, येडपट तू
शेणामधल्या किड्यासारखी, अविरत वळवळ म्हणजे तू

अरे हा मुटे कीटक परत आला का तिडमिडत त्याच्या कृमीय भंगार आठवणी सांगायला!
फारच वळवळतो बाबा हा नको त्या ठिकाणी!

बाकी सदरहू कीटकानी स्वत:चे वर्णन 'तू'च्या आड हुबेहूब वर्णिले आहे! इतका जरी या कीटकाला आत्मबोध झाला तरी खूप झाले!

देवपूरकर, तुम्ही स्वतःला प्रतिभावान समजता. मग तुमची गाडी किटकाच्या पुढे का जात नाही. काय हे कल्पना दारिद्रय?
अहो, तीचतीच शिवी ऐकताना बोअर होतेय राव.
काही नवीन घुबड, डुक्कर असले काही विशेषण वापरा राव.! Happy

<<< अरे हा मुटे >>>
देवपूरकर, तुम्हेी एकेरीवर उतरला आहात त्यामुळे तुम्हाला देवपूरकर ऐवजी सतीश म्हणण्याचा आणि तुम्ही ऐवजी "तू"
संबोधण्याचा मला परवाना मिळाला आहे, असे समजतो. Sad

प्राध्यापकाला चावले आहे झुरळ
खडूसराव | 8 July, 2014 - 10:28
****
बरा पडतो अरे, एकांत हा संवादण्यासाठी!
profspd | 8 July, 2014 - 15:24

वैवकु,काहेी कार्यकारणभाव जुळतो का ते बघा! Happy