शब्द छटा - खडा

Submitted by शशिकांत ओक on 7 July, 2014 - 13:05

शब्द छटा

खडा

मित्रांनो,
टाईम पास चा हा विरंगुळा!
घाला भर शब्दांची, अर्थ होऊ द्या खुळा!!

भाताचा घास तोंडात जातो तोच गालावर हात ठेवून चेहरा रागिट झालेला पाहिला की समजावे, 'खडा' लागला आहे!
कधी कधी तरूणींच्या डोळ्यांची फडफड पाहिली की तरुणांना 'खडा ' टाकायची हुक्की येते.
ज्वेलरीच्या दुकानातून 'खडा' ऐटीत अंगठीत खुलताना दिसतो.
दगडाचा छोटा कठीण तुकडा अनेक छटांनी सामोरा येतो. त्याला 'खडू' केला की सानेगुरूजींसारखा मवाळ होऊन होऊन सर्वांग झिजवत फळ्यावर जीव देतो.
ख नंतर 'ड' ला डा डकवला तर इतरांसाठी खणलेल्या खाईत कधी कधी आपल्याला कपाळ मोक्ष घडतो.
डी केले तर तोंड गोड करायची शर्करा मुखी येते.
पारशी बाबाजी मुंबईत उभा खडा राहीला आहे.
ख ला खा चा खो दिला तर कामाची गैरहजेरी सामोरी येते.
खा पुढे डी समुद्राशी सलगी करते.
खु शी डा ने जमवून घेतले तर फुलावर आफत येऊन झाडाशी नाते संपते.
डा मागे खो केले तर अडकाठी करून पडायची भिती वाटते.

अशी ही खड्याची शब्दार्थ छटा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऐकलेले आहे ..... दो-रयाने दोरी शी लग्न केले आणि त्यांना मुलगा झाला तर त्याचे नाव काय असेल........ " गुंता"

ऐकलेले आहे ..... दो-रयाने दोरी शी लग्न केले आणि त्यांना मुलगा झाला तर त्याचे नाव काय असेल........ " गुंता"

मामी, आपण पुर्वीच या नावाने बाफ(म्हणजे नेमके काय?)काढून विविध छटांनी धागा रंगवल्याचे वाचले. शक्य असेल तर माझा धागा त्यात सरकवला तरी छान... उद्देश मराठी भाषा वैभवाची सेवा केली जावी हा आहे...

उद्देश मराठी भाषा वैभवाची सेवा केली जावी हा आहे... >> अगदी अगदी. सहमत. Happy

बाफ म्हणजे बातमीफलक = धागा = थ्रेड

तुम्हाला चालत असेल तर कृपया या धाग्याच्या हेडरमधील माहिती माझ्या धाग्याच्या प्रतिसादात घालू शकता आणि मग अ‍ॅडमिनना हा धागा उडवण्याची विनंती करू शकता.

एडमिन, गुरूपौर्णिमेनिमित्ताने मायबोलीकर आपणासर्वांना हार्दिक शुभेच्छा...
कृपया मामींनी सुचवलेला बदल आपणास कडून जरूर करावा ही विनंती...

ओक, आधी तुम्ही लिहिलंय ते त्या दुसर्‍या धाग्यावरच्या प्रतिसादात तर टाका. ते काम तुम्हालाच करावे लागेल.
एकदा हा धागा उडवला की ते ही उडेल.

आणि कृपया अ‍ॅडमिनना त्यांच्या विपुत विनंती करा.