दही दलिया

Submitted by लक्ष्मी गोडबोले on 5 July, 2014 - 14:26
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तूप १ चमचा

दलिया १ वाटी

मीठ , पाणी.

फोडणीसाठी : १ चमचा तेल, मोहरी, जिरे, १ मिरची , ४ पाकळ्या लसुण , ४ पाने कढीपत्ता.

इतर साहित्य : एक वाटी दही , बारीक चिरलेला कांदा, शिजवलेले मिश्र मोड

क्रमवार पाककृती: 

एक वाटी दलिया पाण्यात धुवुन निथळुन घ्यावा.

एक चमचा तूप घेऊन त्यात तो दलिया परतावा. त्याचा रंग बदलून सुगन्ध येईल इतपत परतावा.

मग त्यात लागेल तितके पाणी आणि मीठ घालून मऊसर शिजवुन घ्यावा.

मग फोडणीचे साहित्य वापरुन फोडणी करावी.

शिजलेला दलिया, दही , कांदा आणि फोडणी मिसळुन घ्यावे.

दही दलिया तयार.

सोबत शिजवलेले मिश्र मोड घेतले होते. मोड , एक चमचा तेल, मीठ आणि हळद इतकेच घालून थोड्याश्याच पाण्यात शिजवले होते.

daliya3.jpg

वाढणी/प्रमाण: 
१ - २
अधिक टिपा: 

दलिया दही मोड हे अगदी पूर्णान्न आहे. मधुमेही रुग्णाना अगदी योग्य आहे. हाय प्रोटीन हाय फायबर आहे. सध्या रात्री पोटभर दलियाच घेतो. दलिया खिचडी आणि दलिया खीर घेतो. हा प्रकार आजच केला. तीन वर्शाच्या माझ्या मुलीलाही हे सगळे प्रकार आवडले आहेत.

माहितीचा स्रोत: 
प्रयोग
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

म्हणजे आधी भाजून न घेता बाकी जिन्नस तेलावर परतून घेऊन त्यात दलिया घालून मग कुकरला एक शिट्टी? <<
नव्हे नव्हे.
सर्व उपम्यासारखेच म्हणजे रवा भाजून घेतो तसा दलियाही आधी भाजून घ्यायचाच.
फोडणी, कांदा, भाज्या, आधणाचे पाणी, दलिया, शिट्ट्या असा क्रम.

दोन माझे आणे -
एक वाटी दलिया, अर्धी वाटी हरबरा डाळ, तूर, मूग यांपैकी एक किंवा सगळ्या थोड्या२. कांदा, बटाटा (थोडाच घ्यायचा); अजून भाज्या हव्या असतील तर- गाजर, वांग वगैरे... बाकी फोडणीचं साहित्य.
फोडणी करून कांदा, भाज्या परतून घ्यायच्या, त्यात दलीया, डाळी घालून जरावेळ परतायचं. हे परतणं आवश्यक नाहीतर दलिया शिजल्यावर चिकट होतो. नंतर बेताचं पाणी घालून कुकरमध्येच शिजवून घ्यायचा. त्यानंतर हवं असेल तर पाणी घालून खिचडी सारखा सरबरीत करायचा किंवा तसाच मोकळाही छान लागतो. अजिबात गोळा नाही होत नीट परतला असेल तर... नेहेमीचं कंफर्ट फूड आहे हे!

आज थोडा बदल केला. तुपात भाजलेला दलिया व भिजवलेली कडधान्ये मीठ हळद घालुन एकत्रच शिजवले. मग त्यात दही घालुन कालवले. वेळेची बचत.

Pages