का करावी मी सुखांची आर्जवे?

Submitted by profspd on 5 July, 2014 - 13:55

का करावी मी सुखांची आर्जवे?
मस्त मी माझ्याच या दु:खांसवे!

आर्तता ओथंबते गझलेमधे......
पण, उरी पान्हावणारे दिल हवे!

ना उद्याचे भय, न खन्ती कालच्या........
रोजचे आयुष्य हे असते नवे!

चार किरणेही पुरेशी रे, मला........
तेवढ्यानेही किती मी पालवे!

गात मी झोकात जगतो जिंदगी........
का घशामध्ये जगाच्या खवखवे?

गजबजे माझ्या मनाचे झाड हे........
रोजचे जमतात स्मरणांचे थवे!

सोडुनी मी गाव हा गेल्यावरी.........
का गझल माझीच त्यांना आठवे?

तू जवळ नसतेस तेव्हा तू स्मरे.........
आणि तू येता दुरावा जाणवे!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चार किरणेही पुरेशी रे, मला.......<<<<
एकदा किरणे असा शब्द घातलाय तर पुन्हा एक " रे " कशाला खर्ची घातला ?
तुम्हालाच असे वृत्तपूर्तीसाठी "रे (ज्)" लागतात नेहेमी नेहमी आता दिलेत तर ठेवून घ्य ना !