Contact immediately its urgent

Submitted by sas on 29 December, 2008 - 13:55

आज कित्येक महिन्यांनी 'याहु' मेसेंजर वर लोग्ड झाले. ओफ लाईन मेसेजेस वरुन नजर टाकत असतांना "contact immediately its urgent" ह्या मेसेज वर नजर गेली, कुणाचा बर हा मेसेज? नाव पहील आणी मानात काहीस धस्स झाल नव्हे मनात काहीतरी खटकल काहीस विचित्र आणी वैतागवाण ... तापदायक वाटल.

गेल्या काही महिन्यांन पुर्वी अश्याच एका साईट वर जुन्या Classmates ला शोधत होते आणी काही जणांशी contact झालाही...जुन्या मित्र मैत्रिणींशी contact झाल्याचा आनंद मनात दरवळ असतांनाच अचानक एक धास्ति मनात वावरली... 'तो' एखाद्या मित्र/मैत्रिणिच्या Contact List मध्ये असेल तर?... त्याने आपल्याला त्यांच्या Contact List मध्ये पाहिल तर.. आणी कदाचित झालही तसच.

वेगवेगळ्या फेक प्रोफाईल्स चा आडोसा घेवुन कुणीतरी माझ्या Friend List मध्ये शिरण्याचा प्रयत्न करु लागल, पण ह्या सार्‍या गोष्टींची Public Forum वर बरेच वर्षां पासुन असल्याने सवय झाली आहे आणी म्हणुन कोणत्याही नविन, अनोळखी वा शंकास्पद व्यक्तीला माझ्या कडुन माझ्या Friend List मध्ये शिरकाव मी दिला नाही आणी माझ्या Profile च्या सार्‍या सेटिंग्स काटेकोर पणे बदलुन मी माझ्या profile ला अगदी लिमिटेड access ठेवले. तरीही अधुन मधुन Friend Invites येतच असतात.

गेल्या काही दिवसात आलेल्या Friend Invites मधल्या बर्‍याच invits मात्र एका विशिष्ट अक्षराने सुरु होतार्‍या होत्या वा कोणीतरी जबरदस्ती आपल्या Friend List मध्ये घुसु पाहतय असा भास देणार्‍या होत्या.

मी ज्या Profile ची information पुर्ण नाही, ज्या profile च्या Contact list मध्ये मोजकेच contacts आहेत अश्या profile च्या Friend Invit ला वा msg ला भाव देत नाही हे लक्षात आल्याने कोणीतरी फेक वाटणार नाही अस फेक (profile with complete information about self and few contacts in friend list) बननुन मझ्या मागे लागलय हा ही भास मला अनेकदा झाला पण मी कोनत्याही अश्या profile च्या जाळ्यात आले नाही.

...विशेष म्हणजे माझ्या Classmates वा ईतर Contacts च्या Friend List मध्ये 'तो' नाही पण तरीही माझ्या Classmates च्या Friend-list through त्याला माझी माहीती मिळाली हे नक्कि.

गेले काही महिने मन अस्वस्थ आहे, मानात कुठेतरी काही तरी खटकतय. कितिही प्रयत्न केला तरी ते जुने दिवस विचारात डोकावुन मला हैराण करत आहेत.

हे सार नको होत म्हणुनच तर मी इतके दिवस/वर्षे जुन्या Classmates शी काहीही संपर्क ठेवले नव्हते पण ... पण किति दिवस एका नकोश्या धास्ती ने भितीने स्व:ताला, स्व:ताच्या मनाला अस कोंडुन ठेवायच... का अस विनाकारण कुणाचा धाक बाळगायचा.. का अस आपल अस्तित्व लपवत रहायच ह्या अश्या विचारांच्या मोहात पडुन मी 'जो होगा देखा जायेगा' हा निर्णय घेतला होता आणी जुन्या Classmates शी संपर्क केला होता.

जुन्या मित्र/मैत्रिणिंच 'आज' काय चाललय आणी 'आज' मी काय करतेय, काय आहे हे share करत असतांना माझा गेलेला 'काल' परत आठवणीतुन समोर येतोय आणी माझ्या 'आज' ला अशांत करतोय.

... तु हरवलास तर मी तुला कुठे शोधेल??? नाही नाही तुझ्या शिवाय मी कस राहील...मला वेड लागेल तु मिळाला नाहीस तर तु माझ्या आयुष्यातुन निघुन गेलास तर... हे अस हो असच किति किति वेळा त्याला सांगायचे मी...किति वेळा त्याच्या फोटोशी हे सार बोलायचे मी. माझ्या अश्या घाबरण्याला कधि कधि तो फिल्मी स्टाईल ने उत्तर द्यायचा "दुनिया बडी छोटी है"

Masters च पहिल वर्ष College चे पहिले पहिले दिवस...Junior and Seniors Meet चा तो दिवस.. त्याने मला पाहिल आणी मी ही त्याला पण माझ्या मनात तस काही आल नाही. अचानक काही दिवसांनी तो मला भेटला आणी म्हणाला मला तुझ्याशी काही बोलायचय..मी काय ते विचारल्यावर म्हणाला "will u marry me"..मी एकदम चकरावले आणी सहाजिकच "नाही" म्हणुन निघुन गेले.

पण कुठेतरी तो मनात एक हलकीशी अनोळखी भावना जागवुन गेला.. देखणा, उंच, रुबाबदार असा तो मनात कुठेतरी घर करुन गेला.

त्याच माझ्या कडे बघण...लायब्ररीत माझ्या जवळ येवुन बसण, हसण मला वेड लावत गेल आणी we started dating तो माझा Senior होता त्याच Master आटोपल आणी तो job शोधु लागला.. job मिळालाही..त्याने Flat भाड्याने घेतला आणी त्यच्या अधिच्या roommates बरोबर रहाण त्याने सोडल.

आम्ही खुप जवळ आलो.... त्याच्या room वर जाण तिथे रहाण ... Shopping/Hotling... एकदा त्याच्या चुलत बहिणी कडे ही आम्ही गेलो... तो माझ विश्व बनला आणी मी त्यच्यात गुंतत गेले इतक की माझ्या bank account, ATM चे details माझे emai चे password मी त्याला दिले स्व:ताहुन...त्याचे मात्र कधी नाही विचारले.

दरम्यान बरेचदा मी त्याला लग्नाच विचारल तो कधी Seriously घ्यायचा तर कधी नाही. पुढे एका वर्षात माझ masters झाल मला दुसरि कडे job आला... weekends ला आम्ही भेटायचो.

आमच्यातले वाद वाढात होते. तसा तो रागिट पण हौशी आणी dominating.. त्याने माझ्या ही नकळत माझ्या वर टाकलेली बंधन मला जाणवायची पण ते त्याच माझ्या वरच प्रेम त्याचा वेडेपणा वाटायचा .

आम्ही दुर राहायला रहायला लागल्या पासुन मला सार्‍या गोष्टि ची खरी जाणीव व्हायला लागली. त्याचा dominating स्वभाव मला कळु लागला. आणी मुख्य म्हणजे तो लग्ना बाबतित serious नाही हे खुप जाणवु लागल. बरेचदा लग्ना वरुन आमच बिनसल. त्याला त्याच्या घरी बोलायची भिती वाटायची. गावात त्याच्या घरची बदनामी होईल , वडिल ' हो' म्हणणार नाहीत.. वडिलांचा गावात खुप मान आहे मी अस केल तर ते दुखावतिल.... अस सांगायचा... अजुन एक वर्ष बघु तुझ आत्तच शिक्षण पुर्ण झालय ... आपल लग्न नाही झाल तरी आपण Friends राहु .. आपण लग्न करु शकलो नाही तरी एक्मेकांना 'डिच' करायच नाही ... एक्मेकांच्या Understanding ने दुर व्हायच... हे अस ही सांगायचा ह्या सार्‍यात आणखी एक वर्ष गेल ही. पण मला आस होती.

दरम्यान त्याचे पालक त्याला भेटायला आले

माझी त्याच्यांशी भेट करव म्हणुन मी त्याच्या खुप मागे लागले. Weekend ला त्याला भेटायला गेले तेव्हा त्याला खुप खुप सांगितल...दुपारची संध्याकाळ झाली तेव्हा तो तयार झाला... घाबरतच त्याने मला त्याच्या बहिणी कडे नेल जिथे त्याचे पालक होते. तिथे Dinner ला मी आणी तोच बाकी कोणी आम्हाला company दिली नाही. Dineer नंतर त्याने मला बस stop वर सोडल त्याच्या बाईक वरुन. त्याच्या बाईक वरुन तो नेहमीच मला सोडायचा, घ्यायला यायचा.

आमच break-up वै. झाल नव्हत पण मी Life Partner चा शोध सुरु केला. Matri Sites वर मी मुल बघायला लागले, profiles exchange करायला लागले... मला हे करावस वाटल हे इतकच कारण ह्या मागे होत बाकी काही नाही , मी काही निर्णय वै. घेतला नव्हाता मला असच सुचल आणी मी केल.... मी त्याच्या शी हे बोलले ही...त्याला मी ज्या मुलांशी online बोलतेय हे ही सांगितल..."मला हे सर्व सांगत जावु नको मला त्रास होतो" म्हणायचा पण लग्ना बाबत ठाम "होकार" वा निर्णय नाही द्यायचा.

माझा Online Partner Search सुरु होता. मला त्याला भेटण त्यच्याशी बोलण सार नकोस होवु लागल. मी त्याला फोन करण, भेटायला जाण टाळु लागले आणी त्याला भेटायच नाही हेच माझ्या मनात पक्क होत गेल. त्याला हे जाणवायला लागल्यावर तो फोन वर "मला भेटायला ये, फोन करत जा" अस बळेच समजवायला लगला.

ज्या दिवशी मी माझ्या emails चे password change केले. त्याने मला फोन वर "password change केले का? विचारल...फोन वर, तुझे नवे password काय असतिल? हे बळजबरीने जाणुन घ्यायचा प्रयत्न केला. माझे password 'त्याच नाव' असायचे त्याने बरेच try केले पण त्यला माझे password गेस करता आले नाही.

आमच्या एका common मित्राला त्याने मला समजवायचा सांगितल, त्या मित्राचा मला फोन आला..त्यावेळी तो ही call एकत होता हे मला जाणवल.

Password नंतर मी माझा फोन नंबर बदलला. त्याने माझ्या Office मध्ये फोन करण्यास सुरवात केली. त्याच्या office मधल्या कोणाच तरी ओळखिच माझ्या office मध्ये होत त्याच्या सेल फोन वरुन मला contact करण त्याने सुरु केल पण २-३ दिवसातच तो माणुस job सोडुन गेला हे माझ्या साठी खुप खुप चांगल झाल.

त्याने बरेच वेळा माझ्या office मध्ये फोन केले जे मी कधिच घेतले नाही. एकदा त्याने माझ्या कलिगच्या desk वर फोन करुन "तिला मला फोन करायला सांगा नाहीतर मी तिथे येईन...."अस फोन वर धमकावल.

काही दिवसांनी त्याच्या b'day ला त्याने माझ जे काही सामान त्याच्या कडे होत ते त्याने कुरियरने पाठवल त्यात आमचे फोटो, greetings, gifts ई. सार होत. कुरियर वर त्याने त्याचे २-३ contact number लिहले होते.मी सारे फोटो, पत्र, greetings, त्याचे नंबर जाळुन टाकले.

दरम्यान माझ्या एका online मित्राने मला propose केल आणी internet वर आम्ही लग्नाचा decision घेतला. काही दिवसातच आमच लग्न झाल. मी एक नवी सुरुवात केली.

हे सार होत असतांना म्हणजे माझ्या लग्नाच्या बरेच महिने आधी जवळ जवळ ६-८ महिने आधी जेव्हा मी त्याला टाळायला सुर वात केली... व तो फोन वर मला dominate करु लागला तेव्हा ... मी त्याच्या घरी फोन करुन त्याने मला फोन वा संपर्क करु नये अशी request त्याच्या वडिलांना केली. फोन वर जे बोलण झाल ते ठिक नसल तरी सभ्य होत.

त्याचे वडिल "तु त्याच्या गाडिवर बसुन आलीच का" अस मला म्हणाले. मी त्याच्या गाडिवर बसले म्हणजे सारि चुक माझिच अस म्हणाले...मी त्यांना "तुमचा मुलगा माझ्या मैत्री करायला आला होता, ... आता मी दुसर्‍या शहरात आहे आणी मला त्याची मैत्री नको तेव्हा Please त्याला मला फोन वै. करु नको हे समजवा.." ही विनंती करुन..."Uncle Please tension घेवु नका" अस बोलुन फोन ठेवला होता.

माझ्या लग्ना नंतर १५-२० दिवसांनी माझ्या घरुन मला फोन आला, माझे वडिल म्हणाले तुझ्या साठी कोणा 'विक्रांत' चा फोन आला होता त्याचे वडिल तुझ्या लग्नाच्या १-२ दिवस आधी गेले. प्रगतिला (मला) नोरोप द्या अस तो म्हणाला पण तुझ लग्न २ दिवसावर होत म्हणुन तेव्हा तुला काही सांगितल नाही.

ह्या नंतर काही दिवसानी परत माझ्या office मध्ये त्याचा फोन आला. त्याचा नंबर मी माझ्या वडिलांना दिला व त्यांना "विक्रांला मला फोन करत जाउ नको सांगायला लावल"

माझ्या वडिलांच त्याच्याशी जे बोलण झाल ते वडिलांनी मला लगेच फोन करुन सांगितल तो म्हणाला "माझ्या बाबांना Heart अट्याक ने मृत्यु आला आणी प्रगतिने त्यांना फोन केला त्यामुळेच अस झाल...माझ्या बाबांच्या मृत्युला तिच कारण आहे.."

माझ्या वडिलांनी जेव्हा त्याला सांगितल "तुमचे वडिल गेले तेव्हा प्रगती आणी आम्ही सारे एका लग्नात होतो...प्रगतिने त्या दरम्यान जवळ जवळ महिना भर कोणाला फोन नाही केला" तरी तो समजायला तयार नव्हता.

त्याचे फोन येण बंद झाल पण काही दिवसांनी नवर्‍याला heart चा problem असलेल्या एका बाईचा help साठीचा एक mail मात्र त्याने मला Fw केला. त्यानंतर ३ वर्षे गेली...मी शहर बदलल, job बदलला आणी माझ्या संसारात गुंतले.

आणी पुन्हा अचानक .. अचानक नाही माझ्या classmates ला contact करण्याच्या मोहा मुळेच कदाचित "तो" पुन्हा माझ्या जिवनात येण्याचा प्रयत्न करतोय.

बरेच दिवस फेक profile ने संपर्क करण्याचा प्रयन्त करुन, माझ्या जुन्या email-id वर फेक नावने ओळखीने email करुन जेव्हा त्याला काही साध्य झाल नाही तेव्हा त्याने माझा नवा email-id शोधुन काढला आणी मला Yahoo msgr वर... contact immediatly its urgent हा मेसेज आणी Friend Request दिली....

गेल्या काही महिन्यात तोच मला फेक profile ने contact करत होता ही माझी खात्री झालिय... मागेही..माझ्या लग्ना आधी मी त्याच्याशी contact बंद केल्यावर माझ्या मैत्रिणिच्या नावाने त्याने मला Yahoo msgr वर friend बनवल होत व माझा Cell नंबर बदलला का? विचारल आणी नवा नंबर देण्याचा आग्रह केला होता. ती माझी मैत्रिण नसुन "तो" आहे हि शंका येताच मी chating बंद केल होत...

आता त्याचे फेक डाव फसले तर तो सरळ त्याच्या नावाने माझ्या शी संपर्क करु पहातोय "Contact immediatly itस urgent" इतक्या वर्षांनी आता काय Urgent आलय? Contact immediatly!!! ...... WHY?

का तो माझ्या अस मागे लागलाय?? ह्या सार्‍यात काही अर्थ आहे का? त्याचा वर विश्वास ठेवुन मी बर्‍याच चुका केल्यात आता नाही... हा समजतो काय?? की पुन्हा तो फेक profile ने मला फसवु शकतो??? ... मला त्याच्या जाळ्यात अडकवु शकतो?? त्याच्या "Contact me immediatly" ह्या ला एकच उत्तर आहे ... "No Never" ; आणी त्याची friend request नाकारुन ...माझ्या Yahoo चे settings change करुन ज्याने तो मला yahoo वर पुन्हा शोधु शकणार नाही ,मी त्याला reply दिलाय ,मागच्या सारखाच न बोलता हळुहळु.

(माझ्या एका मैत्रिणि सोबत घडलेली ही घटना कथेच्या रुपात मांडण्याचा मी केलेला प्रयत्न मायबोली करांना आवडेल ही आशा ...आभार)

गुलमोहर: 

गोष्ट संपली एवढ्यात? क्रमशः लिहायला विसरलेली दिसतेस म्हणून मनात शंका.

सास,

छान मांडले आहेस... Internet n Chatting असे बरेच दुष्परीणाम बरयांच जणांना भोगावे लागतात....

================================================
Write your Sad times in Sand, Write your Good times in Stone.
--GEORGE BERNARD SHAW

सास,
कथा म्हणुन छान, असे किंवा यासारखे काही खरच कोणाच्या बाबतीत घडले असेल तर ते छान कसे म्हणता येईल. कथेचा शेवट मात्र गुंडाळल्यासारखा म्हणजे अर्धवट कथा सोडली असा मला वाटल.

अवांतरः तू कथा प्रतिसाद मध्ये का टाकलीयेस, ते सगळे भाग तेथुन कॉपी करुन वरच्या पहिल्या भागाखाली पेस्ट कर. तिथे पेस्ट करण्यासाठी तुला कथा लेखनाच्या तिथे असलेला संपादन हा दुवा वापरावा लागेल. संपादन वापरुन तू ते भाग पेस्ट केलेस की परत एकदा कथा प्रकाशित कर.
आणि मग नंतर ते प्रतिसाद मधले भाग पण काढुन टाक, त्यासाठीपण तुला प्रत्येक प्रतिसादाखाली असणारी संपादन ही लिंक वापरावी लागेल.

dipali_galatagi आभार Happy

रुनी,
Thaks for suggestions

मी प्रतिसादात लिहिलेले भाग मुळ कथेत टाकले पण प्रतिसादातले भाग कसे Delete करु? 'संपादन' click केल्यावर Post Delete करण्यास काय सुविधा आहे.

Please Help... आभार. Admin, Please माझ्या Post ला edit करण्यास मला help करा Pls.

सास,
तुला फक्त प्रतिसाद मधला सगळा मजकुर काढता येईल संपादन हा धागा वापरुन, संपूर्ण प्रतिसादच नाही डीलीट करता येणार, तिथे मजकुराशिवाय रिकामे पोस्ट तसेच राहील.

Mod, प्लिज माझे प्रतिसाद delete करा स्माईलि वाले... आभार.

Thanks नि. Happy

बाप रे! मला वाचून खूप भीती वाटली...
कथा म्हणून वाचायला सुरवात केली पण तळटिप वाचल्यावर धस्स झालं. Sad

माझ्या मैत्रिणिचा प्रेमाचा अनुभव खरच धक्का दायक आहे. मला बर्‍याच गोष्टी लिहायच्या होत्या पण मी टाळल.
पण सारख मनात येतय:

प्रेमातले अनुभव गोड असतात अस नसत
प्रेमाच्या आठवणी मधुर असतात अस हि नसत
आणी प्रमातले क्षण धुंद लुब्ध असतात अस ही नसत
काही वेळा प्रेम क्षण भंगुर असत
काही वेळा आपल्याला वाटत की हे प्रेम आहे पण ते प्रेम नसत Sad

सास, तुझ्या मैत्रीणीची कथा खरचं जरा भितिदायक आहे. कारण तो मुलगा जर एकटाच असेल तर नक्कीच त्याला त्याच्या मैत्रीणीची अजून ओढ असेल. पण इतकं शिकून सवरून आपण कितपत कुणावर आस ठेवायची ठेवू नये हे सर्व कळत असूनही तारुण्यात बरेच जण प्रेमाशी निगडीत या अशा चुका करतात. मुलींना तर फारच धोकादायक असतात अशा गोष्टी.. खर करुन लग्न झाल्यानंतर.

असो.. तुझ्या मैत्रीणीला तू तिचा याहू आयडी नविन घ्यायलाच का नाही सांगत.

Hello Lalu, मैत्रिणिने नवा याहु आयडि व इतरहि साइट वर नवे आयडि सुरु केलेत पण अस कुणाला घाबरुन आपलि लपवण किति चिड आणणार आहे ना! असो... आभार!

माझ्या ह्या मैत्रिणिला प्रेमात आणखि काय भोगाव लागल ते मि 'ति रात्र' ह्या कथेत लिहल आहे.

माफ करा पण दोन्ही गोष्टी वाचल्यावर मला तुमची मैत्रिण बिचारी न वाटता मूर्ख वाटली. मूर्ख शब्द ऐकायला कर्कश्श वाटत असेल पण पर्याय नाही.
विश्वासार्हता दिसलेली नसतानाही त्या मुलावर नको इतका आंधळा विश्वास टाकणे (बॅन्क खाते, एटीएम आणि इमेलचे पासवर्डस देणे इत्यादी..) किंवा सरळ सरळ तोंडावर त्याने अपमान करूनही त्याचे काहीच न वाटणे/ न वाटवून घेणे (तुझ्याशी अफेअर गावात कळले तर आमची बदनामी होईल ह्याहून मोठा अपमान अजून काय असणार?) आणि आता हे sort of Live In. शरीराचे सोहळे कुठपर्यंत करायचे आणि कुठे थांबायचे यात दुमत असू शकते. एका ठिकाणपर्यंत पोचल्यावर पुढे जावेसे वाटणे, पुढे जाण्याची मागणी करणे यात चूक नाही. दुसर्‍या बाजूने स्टॉप साइन दिल्यावर बळजबरी करणे हा आणि केवळ हाच गुन्हा. सगळेच निर्णय तिचे आणि शारीरीक जवळीक सोडता बहुतांशी मूर्खपणा या खात्यात दाखल होणारे.
त्या मुलाचे समर्थन करण्याचा उद्देश नाही पण या मुलीलाही माझी फारशी सहानूभूती नाही.
नशीब तिचं की त्या मुलाने तिच्या पत्रांचा, असलेल्या माहितीचा (पासवर्डस!) दुरूपयोग केला नाही. पासवर्डस चा दुरूपयोग केला असता तरी संबंधित लोकांनी या मुलीला हेच सांगितले असते की तुम्ही तुमचे महत्वाचे पासवर्डस असे सांगितलेच कसे दुसर्‍याला.
तिने निर्णय घेतले, ती पुढे गेली. सगळ्या धोक्याच्या घंटा वाजत असतानाही तिकडे दुर्लक्ष करून पुढे जात राह्यली. आणि पुढे जाणे त्रासदायक होऊ लागल्यावर रस्ता बदलून निघून गेली. यातला एकही निर्णय तिच्यावर लादलेला जाणवत नाही. तेव्हा आपल्या निर्णयाच्या परिणामांची जबाबदारी आपलीच असते हे या कन्येला समजावून सांगा.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

ajjuka,
बरोबर आहे आधी तिला नाही समजल आणि अजुन त्रास होतोय तिला स्वःताच्या चुकांचा. खरच कोणाचा ईतका नाद बरा नव्हे. आम्ही Friends च काय पण इतर काही Classmates ने ही सांगितल तिला ते ही या शब्दात "तो उत्तरे कडचा तिथले लोक कधीच सिरियस नसतात अश्या बाबतित" पण काही उपयोग नाही झाला.

(तो उत्तरे कडचा... ह्या शब्दावरुन प्रादेशिक वाद सुरु करु नये Please)

>>Hello Lalu>>..
सास, अगं मी हे आत्ता वाचले, मी कुठे दिसले तुला वर?
तू बीच्या पोस्टला माझे पोस्ट समजते आहेस का? Happy

अरे हो ...मि चुकुन bee च्या एवजि लालु लिहल Happy sorry हं बि आणि लालु Happy