वाग्युद्ध : गिलानी (आणि मं.) सरकार विरुद्ध सिंग (आणि मं.) सरकार

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

पाकिस्तानी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी पाक शासनावतीने केलेल्या वक्तव्यांसंदर्भात :

gilani_singh_duel.jpg

प्रकार: 

स्लार्टी खास आपकी फर्माईश मे. http://www.maayboli.com/node/5000 . मी थोडक्यात विचार मांडला आहे. डिटेलात हवा असेल तर मांडतो. तूझ मत दे.

सही रे केदार..... मी आत्ता पाहिले ते घोड्यांचे पाय.... घोडेस्वारांच्या पुतळ्यांमध्ये म्हणूनच घोड्याचा एक पाय नेहमी वर असतो वाटतं...

मस्त रे फ, खूप मस्त आहे चित्र...

उदय : आपल्या नव्या संरक्षणमंत्र्यांनीदेखील विधानं केलीत की. परवाच त्यांनी 'पुरावे दिलेत, कारवाई करावी' एतदर्थाचं काहीतरी विधान वदलंच की. अपेक्षित होतं म्हणा.
----- तुम्ही श्री. चिदंबरम (नवे गृहमंत्री) यांच्या बद्दल बोलत असावे, मी श्री. अँटोनी (संरक्षणमंत्री) यांच्या मौना बद्दल चिंतीत आहे.

अरे काय हे... व्यंगचित्रणाचही रसग्रहण? (चित्रग्रहण शब्द योग्य होईल का..?) मा.बो. वर दुसरा कुठलाही ज्वलंत विषय सध्ध्या नाही याचच हे द्योतक आहे (?):)
फ,
तुझ्या चित्रकलेबद्दल काहीच वाद नाहीये. पण "व्यंगचित्र" (या कलेचा) याचा मूळ उद्देश याही व्यंगचित्रातून व्यवस्थित समोर येतो आहे मग कुणाला हातात पाल, पाकळी, माळ वा चेतक घोडा दिसला तरी त्या डीटेल ने काही फरक पडत नाही.. हा. आता मनमोहनांच्या जागी कुणाला राणा प्रताप दिसला तर चित्र फसल अस म्हणता येईल. पण तितक्या abstract दृष्टीचा प्राणि अजून इथे उगवला नाहीये..
(उगवलाच तर आपण त्याच्या दृष्टीदोषाला, B-vision असे नाव देवू );)
तेव्हा हे रसग्रहणाचे थर अनावश्यक आहेत.
आणि करायचेच असेल तर, गिलानीचा उधळलेला घोडा मान खाली घातल्याने फार "अहिंसक" वाटत आहे.. त्या अर्थी चित्र फसले आहे Happy का तो आधी उधळलेला होता तेव्हा लॉजिकली मान, कमान, वर होती पण मागून कुणीतरी एक पाय ओढल्याने असा लंगडी घातल्यागत तोन्डावर पडणार आहे की काय..? मला तर तो मनमोहनांचा डावा हात सूक्ष्म निरीक्षण करता प्लास्टर मधे घातल्यागत भासतोय... तेव्हा याचा खुलासा केला जावा.. Happy
~D

फ, अप्रतिम रे. सुंदर चित्र व स्पष्टीकरण पण. Happy

~~~~~~~~~~~~
ज्याचा त्याचा प्रश्न!!
~~~~~~~~~~~~

>>>> तेव्हा हे रसग्रहणाचे थर अनावश्यक आहेत.
अमान्य! Happy
>>>>गिलानीचा उधळलेला घोडा मान खाली घातल्याने फार "अहिंसक" वाटत आहे.. त्या अर्थी चित्र फसले आहे Lol
अरे नाहीरे भो! कोणताही चतु:ष्पाद प्राणी, जेव्हा उधळतो, येथे घोडा, तर त्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीनुसार तो सुरवातीस मागले पाय झाडूनच आपली ताकद दर्शवितो! याबाबत घोडा आणि गाढव, झेब्रा यान्च्यात साम्य हे! Happy काही प्राणी जसे की मेण्ढा, डुक्कर वगैरे पुढल्या खुराने व नाकाचा शेण्डा, असल्यास शिन्गाने जमिन उकरत आपली ताकद दाखवतात! (डिस्कव्हरी बघत जा नियमित Proud मी बघतो)
वरील चित्रात घोडा अर्थात पाक लष्कर उधळू पहातय, अन त्याच्यावर स्वार अर्थात गिलानीचा ताबा नाहीये ही वस्तुस्थिती स्पष्टपणे जाणवतेय! तुलनेत, पुढील एक पाय उचललेला (विजेत्याच्या भुमिकेतला) भारतीय घोडा अर्थात भारतीय लष्कर नी त्यावरचा स्वार यातिल परस्पर सामन्जस्य स्पष्टपणे दिगोच्चर होते आहे! Happy
पुतळा बनविताना घोड्याचे कोणते व किती पाय उचललेले दाखवायचे याचे शास्त्र हे, पुढील एक पाय उचलला असल्यास विजेता, व नैसर्गिक मृत्यु पावलेला राजा असा अर्थ, पुढील दोन्ही पाय वर उचललेले असल्यास यद्धात मृत्यु असा अर्थ असतो असे वाचल्याचे आठवते! चारी पाय टेकलेले असता काय अर्थ होतो आठवत नाही! जाणकारान्नी खुलासा करावा! Happy
....;
आपला, लिम्बुटिम्बु

घोड्याचे पुढचे दोन्ही पाय हवेत उचललेले याचा अर्थ योद्ध्याला युद्धभूमीवर वीरमरण आले.
घोड्याचा पुढचा एक पाय हवेत उचललेला याचा अर्थ युद्धात झालेल्या जखमांमुळे योद्ध्याला मरण आले.
घोड्याचे चारही पाय जमिनीवर याचा अर्थ नैसर्गिक मृत्यू.

***
अजनबी सा, दोस्त सा, दुश्मन सा ये बहरूपिया
मेरे अंदर कोई बतलाए खुदा-रा कौन है?

चिनुक्स, नक्को ! चिन्मयच बर Happy अरे पण घोड्यांना कसं कळतं योद्ध्याला नक्की कसं मरण आलंय ते? किंवा मुळात मरण आलंय ते? आणि समजा कळलं तर किती पाय वर करायचे ते? माझे खरोखरचे अज्ञान दूर व्हावे म्हणून हे प्रश्न विचारते आहे Happy

------------------------------
जिस जिस पथ पर भक्त साईका वहॉ खडा है साई

पण मग युद्धात विजय मिळविलेल्या विरासाठी काय संकेत आहे?

घोड्यांना कशाला कळायला हवंय? शिल्पकाराला कळलं म्हणजे झालं.. Happy
पुतळा कसा असावा, याचे हे संकेत आहेत.

***
अजनबी सा, दोस्त सा, दुश्मन सा ये बहरूपिया
मेरे अंदर कोई बतलाए खुदा-रा कौन है?

उदय, युद्धात विजय मिळवलेल्या वीरासाठी घोड्याचे सगळे पाय वर Proud

चिन्मय, अस्सं होय ! मला वाटलं ........
हसतोयस काय !!!

------------------------------
जिस जिस पथ पर भक्त साईका वहॉ खडा है साई

जबरदस्त चित्र संकल्प!
चर्चेमुळे मजा आली Proud
------------------------------------------
Times change. Do people??

चिनुक्स, धन्यवाद पण.....
>>>>घोड्याचे पुढचे दोन्ही पाय हवेत उचललेले याचा अर्थ योद्ध्याला युद्धभूमीवर वीरमरण आले.
>>>>घोड्याचा पुढचा एक पाय हवेत उचललेला याचा अर्थ युद्धात झालेल्या जखमांमुळे योद्ध्याला मरण आले.
>>>>घोड्याचे चारही पाय जमिनीवर याचा अर्थ नैसर्गिक मृत्यू.
यातिल दुसरा नी तिसर्‍या पर्यायाबाबत मला शन्का हे! पुण्यात शिवाजी प्रिपरेटरी स्कुल येथे श्री करमरकरान्नी बर्‍याच पूर्वी बनविलेला शिवाजी महाराजान्चा पुतळा हे, त्यावर एक लेख पन्चवीस तीस वर्षान्पुर्वी किर्लोस्कर मासिकात आला होता, त्यात त्या पुतळ्यातील घोड्याचा पुढील एक पाय वर का उचलला हे याचे व अन्य पर्यायान्चे विवेचन होते! बरीच वर्षे होऊन गेल्याने तो विषय विस्मृतीत गेला हे! पण जर तुझा पर्याय दोन खरा मानला तर करमरकरान्नी बनवलेल्या पुतळ्याशी नी शिवाजी महाराजान्च्या आयुष्यक्रमाशी तो जुळत नाही असे दिसते
तेव्हा २ व ३ पर्याय नेमके उलट हवेत जसे की
>>>घोड्याचा पुढचा एक पाय हवेत उचललेला याचा अर्थ नैसर्गिक मृत्यू व
>>>घोड्याचे चारही पाय जमिनीवर याचा अर्थ युद्धात झालेल्या जखमांमुळे योद्ध्याला मरण आले.
असे हवेत असे वाटते! विकीपिडिया किन्वा गुगल वर याचा शोध घेता येईल काय?

वरील अर्थाने, बालगन्धर्व येथिल झाशीच्या राणीचा पुतळा, घोड्याचा एक पाय उचललेला, चूकीचा हे
तसेच, हिन्जवडीहून चिन्चवडकडे येताना डान्गेचौकात असलेल्या शिवाजी महाराजान्च्या अश्वाचे दोन्ही पाय उचललेले दाखविलेत, तेही शिल्पशास्त्राच्या दृष्टीने चूक हे! Happy (एक शन्का, डान्गे चौकातील तो पुतळा जर सम्भाजी महाराजान्चा असेल तर मात्र दोन्ही पाय उचलणे बरोबर आहे चु.भु.दे.घे.)असो
...;
आपला, लिम्बुटिम्बु

वा! मस्त आहे व्यंगचित्र फ. Happy

लिम्बुटिंबु,
मी परत एकदा संदर्भ बघून सांगतो. कालनिर्णयाच्या कुठल्याशा दिवाळी अंकात मी हे वाचलं होतं.

***
अजनबी सा, दोस्त सा, दुश्मन सा ये बहरूपिया
मेरे अंदर कोई बतलाए खुदा-रा कौन है?

ओके चिनुक्स, नक्की बघ, नि बघितल्यावर याच बीबी वर लिही! Happy
...;
आपला, लिम्बुटिम्बु

अरे किती घोडी दामटवाल...? तुम्हाला मा.बो. वर येवून ही वाईट्ट सवय लागली आहे.. Happy

>डिस्कव्हरी बघत जा नियमित मी बघत>..
अरे लिम्ब्या,
घरी नऊ महिन्याच मूल असल की tv वर चोवीस तास फक्त discovery, animal planet च चालू आहे हे काही वेगळे सांगायला नको..आताशा हाईना, wild cat, मासे, तितर, असे अनेक पशू पक्षी माझ्या स्वप्नात येवू लागले आहेत... उद्यापासून घोडे येतील बहुदा Happy

>>वा! मस्त आहे व्यंगचित्र फ.
देसाई, इथल्या भाषा-व्याकरण रक्षकांन्नी हे वाचल तर तुम्हाला (घोड्यासारखे) उभे रहायची शिक्षा देतील.. पुन्हा वाचून पहा बर तुमच वाक्य!:)

अश्विनी,
तुम्हाला b-प्रश्णांची बाधा झाली आहे बहुतेक .. Wink
~D

योग, मला स्वतःला देखील पोस्ट टाकल्यावर जाणवलं होतं की आपण अगदी बी सारखंच लिहिलंय पण लिंबूची मोठ्ठी पोस्ट वाचताना पुतळ्याचा उल्लेख सटकला आणि चिन्मयने पुतळ्याचा उल्लेख केलाच नाही त्यामुळे माझ्या मनात असे प्रश्न आले Happy

------------------------------
जिस जिस पथ पर भक्त साईका वहॉ खडा है साई

इथल्या भाषा-व्याकरण रक्षकांन्नी हे वाचल तर तुम्हाला (घोड्यासारखे) उभे रहायची शिक्षा देतील..
<<< किती पायांवर उभे राहायचे ते सांगितले म्हणजे झाले! :d

लिंब्या मी पण चिनुक्सने दिलेले संदर्भ मेल मधे वाचले आहेत.
माझ्या मते तरी संदर्भ बरोबरच असावेत... कदाचीत शिल्पकाराला ते ज्ञान अवगत नसावे...

गजानना Proud

इन्द्रा, अशक्य! मी ज्या शिल्पकारान्चा (करमरकर) सन्दर्भ दिला हे ते त्यान्च्या क्षेत्रातील नम्बर एकचे होते! त्यान्नी बनविलेल्या पुतळ्यात चूक असणे कालत्रयीही अशक्य! Happy
(कालनिर्णय(की अजुन कशात?)मधे मी देखिल वाचल्याचे व त्यावेळेस, अरे हे चूक हे अस मनाशीच पुटपुटल्याचे आठवतेय! सापडल्यावर देतो सन्दर्भ)
असो, या बीबीचा हा विषय नाही! Happy
...;
आपला, लिम्बुटिम्बु

अरे घोड्यांबाबत किती हे अज्ञान. Happy

घोड्याच्या पाय शिल्पकार ठरवत नसतो.

तिन पायावर जो घोडा आयुष्यभर उभा असतो तो घोडा "तय्यार" असतो. हे तिन पाय तो नेहमी बदलत असतो. सैन्यात घोडे घेताना जर चार पायावर उभा असलेला घोडा पाहीला तर घेत नसतं, कारण तो लवकरत मरेल अशी भिती असते. व त्याची ताकद नाहीशी होत असते. नंतर शिल्पकारांनी ही वस्तुस्तिथी उचलली आहे, इतकच. त्याचा शिल्पावरुन घोड्याची जात ठरत नसते. दोन पायावर उभा घोडा वा एका पायावर उभा घोडा हे शिल्पकारांच्या रचना आहेत. चांगला घोडा फत्क तिन पायावरच उभा राहतो. चार पायांवर नाही.

छ्या, पुस्तकी ज्ञानाचा काही उपेग नाही बॉ. Happy

योग, विवेचनाच्या मुद्द्याबद्दल माझी मतं तू मांडलेल्या मतांपेक्षा वेगळी आहेत. व्यंगचित्रकार विशिष्ट भूमिकेतून/विचारातून एखाद्या प्रसंगातलं व्यंग/वैचित्र्य/विरोधाभास दाखवत असतो, त्यावर टिप्पणी करत असतो. त्या अर्थानं अशी चित्रं प्रचारकी पिंडाची असतात. मीदेखील हे चित्र विशिष्ट विचाराने चितारलं. याचा अर्थ माझा हेतू प्रचारकी होता आणि त्याकरता पहिल्यांदा माध्यम म्हणून मी व्यंगचित्र वापरलं. मागाहून मला शब्दमाध्यमातूनही माझा प्रचारकी हेतू दामटावासा वाटला, सविस्तर मांडावासा वाटला.. म्हणून मी तसा मांडला. त्यामुळं व्यंगचित्र कलाकृती म्हणून फसलं असं वाटलं तरीही माझी काही हरकत नाही. माझी प्राधान्यानं बांधिलकी प्रचारकी हेतूशी आहे. Proud

बाकी, वरचं अश्वोपनिषद् बरंच मनोरंजक आहे. Happy

-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

>>अश्वोपनिषद् बरंच मनोरंजक आहे.
Happy
फ,
अरे व्यंगचित्र फसल अस मि म्हणत नाहीये.. ते तुझ्या डिटेल विवेचनावरून सुचल इतकच.. असो.

अरे व्यंगचित्र फसल अस मि म्हणत नाहीये..
---- फक्त पुढच्या वेळेस व्यंगचित्र काढावेसे वाटले तर घोडे मात्र वापरु नका. हवे तर दुसरे काही वाहन वापरा.

व्यंगचित्र फसले असे मला तरी वाटत नाहीये. गिलानींचे आधीच नीट मांड न ठोकू शकलेले सरकार आणि त्यातच त्या घोड्याला पराण्या इ. टोचून आणखीच बिथरवलेले स्पष्ट कळतेय. त्या मानाने भारतीय सेना शांत आणि नीट, तयारीत दिसते. फक्त मा. मनमोहन सिंग आणि मागच्या जनतेच्या हावभावातून आक्रमकता न दिसता थोडासा केविलवाणा भाव दिसतोय.

Pages