रिलॅक्स फॉर ४-५ डेज.....

Submitted by नीधप on 4 July, 2014 - 04:01

असा बाफ असेल तर प्रश्न तिकडे हलवणे.

केवळ पडे रहो गिरी करायचीये...
रिलॅक्स व्हायचेय...
विकेंड पेक्षा मोठी आणि आठवड्यापेक्षा छोटी ट्रिप....
एखाददुसरे साइटसिईंग ठिक पण जास्त बघा बघा नकोच्च..
बघा बघा पेक्षा अनुभव महत्वाचा...
स्पा फॅसिलिटी वगैरे असेल तर सोनेपे सुहागा....

अश्या प्रकारच्या ट्रिपांसाठी ठिकाणे, रिसॉर्टस आणि तुमचे अनुभव सुचवा.

सर्वांनी सुचवलेल्या ठिकाणांची यादी
१. जुलै ऑगस्ट दरम्यान जायचे असेल तर गगनबावडा! भारतातील दोन क्रमांकाचा पाऊस! अतिशय उंच डोंगर! तीन साधी पण डिसेंट हॉटेल्स! मवाल्यांची गर्दी नाही. भज्यांपासून मटनपर्यंत सर्व चोचले. कोल्हापूरपासून ५० किमी.
जिव्हाळा रिसॉर्ट

२. www.sagarsawli.com

३. एकांत,लवासा .
बिव्हर गोल्डन रिसॉर्ट.http://www.beavergoldenfields.in/aboutus.asp

४. सुलाचे बियॉण्ड
http://sulawines.com/stay.aspx

५. महाबळेश्वर ला MTDC रिसॉर्ट
तिकडेच चिरायु स्पा पण आहे जो ऑस्सम आहे

६. भंडारदरा चे आनंदवन हा पण एक मस्त ऑप्शन आहे. मुंबई वरून लगेच पोहचता येत. स्टाफ एक्दम छान आहे. पावसाळ्यात बूकिन्ग मिळणे जरा अवघड आहे. कदाचीत वीक डेझ ला मिळेल.

७. नी हे चिखलदरा - अमरावती - जायला हरकत नाही
http://www.satpuraretreat.com/

८. पाचगणीला 'दला-रूस्टर' नावाचा बंगला बायकोच्या चुलत भावाचा आहे. नंबर हवा असल्यास विपू करेन. दला रूस्टरची लिंक देतो. तेथे उत्तम सोय आहे, तसेच दरीवर तरंगती एक अ‍ॅरेंजमेंटही आहे जेवायची. भजन नावाचा एक गृहस्थ व त्याची पत्नी तेथेच राहतात व आपण सांगू तसा स्वयंपाक करतात. (शाकाहारी व मांसाहारी). तेथे फक्त फॅमिलीला परवानगी आहे, फक्त बॅचलर्सना जागा दिली जात नाही. साधारण माणशी रुपये २००० ते २१०० (महिना एप्रिलचा रेट) खर्च व त्यात चहा, नाश्ता वगैरे!
http://www.flipkey.com/panchgani-villa-rentals/p284464/

९. ब्राइट्लॅन्ड महाबळेश्वर स्पा मस्तय.

१०. नारायण्गाव वायनरी चा रिसॉर्ट पण छान आहे. साइट, नंबर काहीही सापडत नाही.

११. मानस रिसॉर्ट, इगतपुरी..
http://www.manasresort.in/index.aspx

१२. ग्रीन व्हॅली स्पा रिसॉर्ट
http://www.eandgresorts.in/tariff/

१३. पुण्याजवळ हिल्ट्न शिळिम स्पा रेसोर्ट बघा. छान आहे ते.
http://www3.hilton.com/en/hotels/india/hilton-shillim-estate-retreat-and...

१४. गिरीविहार म्हणून अजून एक आहे महाबळेश्वर मधे. खूप जुना. घरगुती चवीच जेवण दोन्हीवेळच ,चहा , ब्रेफा . सगळ इन्क्लुसिव्ह ४-४.५ हजार. मधे रामाच देउळ आणि बाजून रांगेत रुम्स अस साधारण स्वरूप आहे.

१५. महाबळेश्वरचे आनंदवनभुवन, छोटे स्वस्त आणि चांगले आहे. लोकेशन खुपच छान आहे.
http://hotelanandvanbhuvan.co.in/default.html

१६. http://nivantresort.com/resorts_deck.html
सातारा ते कास पठार ह्या रस्त्यावर डोंगरात मधेच आहे. लोकेशन सॉलिड आहे. स्पा वगैरे नाही, पण पावसाळ्यात जावुन २ दिवस नुस्ते रहायला आणि खायला मस्त आहे.
ज्यांना कास पठारावर जायचे आहे त्यांना पण उपयोगी आहे.

१७. पुण्याजवळ मंत्रा रिसॉर्ट

१८. विल्डरनेस्ट - चोरला घाट
http://www.wildernest-goa.com/
अप्रतिम आहे. गोव्याचे दाबोळी एअरपोर्ट किंवा मडगाव किंवा थिविम रेल्वे स्टेशन किंवा कुठलाही बसस्टॅण्ड यापैकी कुठूनही पिकप आणि ड्रॉप ऑफ आहे. एअरपोर्टपासून साधारण दीड तास लागतो तिथे पोचायला.
रेटस थोडे हायर वाटले तरी वर्थ आहेत. पॅकेजमधे पिकप, ड्रॉप ऑफ, ब्रेफा, लंच, इव्हिनिंग चहा, डिनर, गायडेड फॉरेस्ट वॉक, सनसेट वॉक, नेचर वॉक्स/ ट्रेल्स, स्विमिंग पूल चा वापर हे सगळे इन्क्लुडेड आहे. तुम्ही जाल तेव्हा निर्मल कुलकर्णी स्वतः तिथे असतील तर त्यांच्याशी जंगल, पर्यावरण आणि त्या अनुषंगाने इतिहास याबद्दल गप्पा मारणे हा अनुभव आहे. ३-४ दिवसांसाठी करेक्ट आहे. रूममधे एसी आणि टिव्ही असल्या सुविधा मस्ट असतील तुमच्यासाठी तर मात्र जाऊ नका. इतक्या सुंदर ठिकाणी गेल्यावर टिव्ही बघावासा वाटणे या इतकं दुर्दैव नाही आणि रूम एसीची तिथे गरजच नाही.

१९. कमलिनी कुटीर
http://www.kamalinikutir.com/aboutus.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

http://nivantresort.com/resorts_deck.html

सातारा ते कास पठार ह्या रस्त्यावर डोंगरात मधेच आहे. लोकेशन सॉलिड आहे. स्पा वगैरे नाही, पण पावसाळ्यात जावुन २ दिवस नुस्ते रहायला आणि खायला मस्त आहे.

ज्यांना कास पठारावर जायचे आहे त्यांना पण उपयोगी आहे.

पुण्याजवळ मंत्रा नावाचे एक रिसॉर्ट आहे. आम्ही २-२.५ वर्षांपूर्वीच्या भारतवारीत गेलो होतो तिथे. चार्जेस नक्की आठवत नाहीत पण जेवण वगैरे धरून ३-३.५ हजार पर डे होते. रूम्स स्वच्छ हवेशीर होत्या. आणि खिडकीतून नदी, डोंगर, सूर्योदय, इ. इ. सिनेमासारखा व्ह्यु होता. Happy
तिथे रात्री राहून सकाळी आम्ही गुंजवणेमार्गे राजगडाला जाऊन आलो होतो. मस्त झाली होती ती ट्रिप.

आजच एकाच्या फेसबुक पेजवर फोर्ट जाधवगढचे फोटो पाहिले. फोटोवरून तरी छान वाटतयं. कन्सेप्ट ही नविन वाटला. कोणी जाऊन आलय का? असाल तर तुमचे अनुभव शेअर करा प्लीज

सोहा, जाधवगढचे ऐकीव अनुभव खूप निगेटिव्ह आहेत.
अव्वाच्यासव्वा पैसे आणि व्हॅल्यू फॉर मनी काही नाही असेच ऐकलेय बहुतेकांकडून.
इडलीवाल्यांचे आहे ते जाधवगढ.

आजच एकाच्या फेसबुक पेजवर फोर्ट जाधवगढचे फोटो पाहिले. फोटोवरून तरी छान वाटतयं. कन्सेप्ट ही नविन वाटला. कोणी जाऊन आलय का? असाल तर तुमचे अनुभव शेअर करा प्लीज<<<

सहज बघायला म्हणून एकदा गेलो. गाडी पार्क करून आठ दहा पायर्‍या चढून वर गेल्यावर आणखी काही पायर्‍या दिसल्या. त्या पायर्‍यांच्या वर एक तरुण उभा होता. त्याच्या अंगावर मावळ्याचा पोषाख होता. हातात एक तुतारी होती. माझ्याकडे पाहून त्याने ती तुतारी तोंडाला लावली आणि त्यातून भयानक आर्त आवाज काढले. मला वाटले की हा माझा निषेध असावा. पण ती एक वर्दी होती, एक संभाव्य बकरा जाधवगडात घुसल्याची! पूर्णपणे बावरून मी रिसेप्शनवर पोचलो. तेथे नाकात नथ वगैरे घालून दोन नऊवारी नेसलेल्या तरुणी आणि एक वेगळा मावळा उभा होता. त्यांनी अस्खलित इंग्लिशमध्ये मला तेथील भयावह टेरिफ्स समजावून सांगितली. आठ हजार रुपये दिवसाला वगैरे! मला मी आठ हजारी मनसबदार की काय असतात तसा वाटू लागलो. त्या आठ हजारात काँप्लिमेंटरी (?) ब्रेकफास्ट, आतमध्ये एक म्युझियम आहे त्याची फेरी आणि एक दिवसाचा स्टे असे मिळत होते. हॉटेलमधील सेवासुविधा नोंदवलेले एक भरजरी लीफलेट मला देण्यात आले. ते फुकट आहे हे माहीत असूनही मी ते स्वीकारले नाही व परतू लागलो. मला वाटले मला परतताना पाहून मगाचचा तुतारीवाला मावळा 'हर हर महादेव' म्हणेल. पण आता त्याच्या चेहर्‍यावर 'तहानंतर सोडलेला राजकैदी' पाहून येतात तसे उग्र आणि शुष्क भाव होते.

-'बेफिकीर'!

हे असे उगाच संस्कृतीचा आव आणत गॅदरींगच्या फोकडान्सचे कपडे घालून उभे केलेले लोक असले की एकुणातच कंटाळा येतो.
मामी जाऊन आलीये जाधवगढीत. तिचा ट्रिपअ‍ॅडव्हायझर वर रिव्ह्यूही आहे. टोटल फ्रॉड म्हणून. इथेही कुठेतरी टाकले होते तिने.

रामसुख रिसॉर्ट महाबळेश्वर
विसलिंग पाम्स गोवा
ऑरेंज काऊन्टी कूर्ग

सगळे अनुभव ५ वर्षापूर्वीचे आहेत

येथे शांतिवन (पानशेत), गिरीवन (मुळशी) आणि कमलिनी कुटीर (वेल्हे) येथील माहिती देत नाही आहे कारण ती सर्व ठिकाणे पुण्यापासून कमी अंतरावर असण्याने चार पाच दिवस वगैरे राहण्यासाठी योग्य वाटणार नाहीत. म्हणजे मनात असे वाटत राहील की एक दिड तासावर तर घर आहे वगैरे!

कमलिनी कुटीरला नाश्ता, जेवण अतिशय सुंदर असते. धूम्रपान, मद्यपानास सक्त मनाई! कुटुंबासाठी उत्तम! दर खूपच आकर्षक!

(त्याला खरीव म्हणतात हे माहीत नव्हते)

कमलिनी कुटीरला 4-5 दिवस?! बघा ब्वॉ.
नी, मी ती लिंक हा बाफ वाचणाऱ्या इतरांकरताही दिली आहे. उपयोगी पडू शकते. यू मे इग्नोर.

चिनूक्सांनी दिलेली लिंक कृपया हेडरमध्ये घ्यावी, ते महत्वाचे वाटत आहे कारण एक दिड दिवसाच्या सहली होण्याचे दिवस लवकरच येतील, अर्थात पाऊस धड पडला तर!

मी ती लिंक पाहिली नाही म्हणून म्हंटले.

तुम्ही हे घ्याकी पण हेडरमध्ये?

उद्या येथे काही वाद झाले आणि अ‍ॅडमिनांनी स्वतःसकट सगळे प्रतिसाद उडवले तर लिंक कशी मिळणार?

तुम्ही हे घ्याकी पण हेडरमध्ये? << पण दम धरा की थोडा...

उद्या येथे काही वाद झाले आणि अ‍ॅडमिनांनी स्वतःसकट सगळे प्रतिसाद उडवले तर लिंक कशी मिळणार? << हॉ? इथे कशाला वाद होतील?

हॉ? इथे कशाला वाद होतील?<<<

होता होता वाचले की वर दोनवेळा! इब्लिस आणि धिरज काटकर प्रायोजीत!

Why dont we all go to Kamalini cottage. seems like a lovely place. just us? Thanks to maayboli not able to write on this BB in Marathi from Office. so sorry about that.

फोटो बघून मोठ्या ग्रुपने ओव्हरनाइट ट्रिपला जायला ठिके.
कपलने किंवा छोट्या फॅमिलीने ४-५ दिवसांसाठी जायला काही उपयोगाचे नाही कमलिनी कुटीर असे माझे मत झाले.

हा बाफ मस्त काढलायस गं, नी.

सुला : मस्त आहे. रिलॅक्सिंग. (मी गेले नाहीये. लिस्टमध्ये आहे.)
मल्हारमाची चांगलं आहे.
आनंदवन मस्त आहे. विशेषतः पावसाळ्यात.

आम्ही ७-९ जुलैला मचाणला गेल्तो. ( आताच जरावेळापुर्वी परतलो.) उत्तम जागा, सुरेख कॉटेजेस. गृपनं जाणार असाल तर हेरीटेज मचाण बुक करा. ऑस्सम व्हु. त्यानंतर कॅनपी मचाण बेस्ट. मग फॉरेस्ट मचाण छान. मग नेस्टेड मचाण. आम्ही अगदी आयत्यावेळी ठरवलं असल्याने तुका म्हणे त्यातल्या त्यात म्हणून नेस्टेड मचाण अव्हेलेबल होते ते घेतलं.

जंगलात राहण्याचा छान फील येतो; गर्द झाडीमुळे रातकीडे, बेडुक, पक्षी, काजवे अनुभवता येतात. म्हातारी माणसे, लहान मुले शक्यतो टाळा. जेवण ओके. जास्त व्हरायटी नाही. रुमसर्व्हेस करता फारसा चॉईस नाही. गाडी काढून आजूबाजूच्या गावातल्या रस्त्यांवरून फिरायला मजा आली. ढगातून फिरत होतो.

मात्र काही विक्षिप्त गोष्टी आहेत रुममध्ये चहा-कॉफीची किटली देखिल नाही. इतर उत्तम गोष्टींनी सजवलेल्या रुममधले पेपर नॅपकिन्स मात्र स्वस्त्यातले वापरले होते. ब्रेकफास्टची वेळ सकाळी ९.३० ते १०.३० फक्त. एकतर उशीरा सुरू करतात आणि एका तासात संपवतात पण! रात्रीचं जेवण ७.३० आहे पण आठच्या आधी मिळत नाही.

रिनोव्हेशन सुरू आहे पण ते हेरिटेज जवळ सुरू आहे. आमच्या कॉटेजपर्यंत तो आवाज येत नव्हता.

मचाणाच्या रस्त्याला लागण्याआधी एक क्लाउड ९ नावाचं रिझॉर्ट लागतं. त्यांच्याकडे दाल-खिचडी खाली ती म हा न होती.

रुममध्ये चहा-कॉफीची किटली देखिल नाही. <<
बहुतेक सगळ्या जंगल लॉजेसमधे नसते. आपल्यालाच चहा, कॉफी, साखर, क्रीमर, स्नॅक्स यांच्या मोहाने येणार्‍या किटकांचा त्रास होऊ नये म्हणून ही व्यवस्था असते. कारण ते आले तर स्ट्राँग आणि इनऑर्गॅनिक इन्सेक्टिसाइडस वापरावी लागतील. जे या लॉजेसच्या 'मिनिमम इम्पॅक्ट ऑन इकोसिस्टीम' तत्वांच्या विरूद्ध जाते.

.

बेफ़िकीर | 8 July, 2014 - 10:45 नवीन

हॉ? इथे कशाला वाद होतील?<<<

होता होता वाचले की वर दोनवेळा! इब्लिस आणि धिरज काटकर प्रायोजीत!

*

बेफिकीर,
बोटं घालून चिवडायची सवय सोडा की आता तरी. विनाकारण का नडत असता मला प्रत्येकदा?

girivan.com

मोठा ग्रूप असला तर रेट निगोशिएट होतात

shantivanpicnic.net

मी फोन केला होता तेव्हा सांगितलं तुम्हाला individual rooms हव्या असतील तर गिरिवनला जा. इथे नको.,

हे एक कृपया हेडरमध्ये अ‍ॅड केले जावे. मी येथे गेलेलो नाही, पण ठीकठाक असावे असे वाटत आहे.

प्लॅटिनम ५२ - कृषी पर्यटन केंद्र - रिसॉर्ट

पुण्याहून फक्त एक तासाच्या अंतरावर - भोर येथे (राहणे व जेवण)

मोबाईल नंबर्स - ९४२२००२२०६ / ९८२२०७९७३१ / ९६५७०४५७६३

कौलारू घरे! आपण कुठे लांब जाणार असलो तर ज्येष्ठ नागरिकांना चांगला आधार मिळावा म्हणूनही येथे ठेवता येते असे त्यांनी एका कॉलममध्ये म्हंटलेले दिसत आहे.

पॅराडाईझ कॅफे - ताम्हिणी घाटाच्या आधी!

९५२७३७९९०९

स्पॉट चांगला आहे, स्वच्छता ठीकठाक आहे. राहण्यासाठी खोल्या आहेत पण त्या मी पाहिल्या नाहीत.

प्लॅटिनम ५२ - कृषी पर्यटन केंद्र >>>वेबसाईट नाही का यांची?

पॅराडाईझ कॅफे>>मागच्या वर्षी गेले होते डोळे मिटून घेतले तरच खोल्या चांगल्या म्हणता येतील.

Koorg la jayche aahe, koni margdarshan karu shakel ka. Mumbai hun jayche aahe. 4 divasachi trip karaychi aahe.

ओजस, मुंबईहून ट्रेनने मंगलोर मग टँक्सीने मडिकेरीला (कुर्ग) गेलो होतो. तुम्हाला काय माहिती हवी आहे ते सांगा प्लीज. इथे सर्च केले तर आधी काहीजणांनी लेख लिहिले आहेत तेही वाचायला मिळतील. ट्रिप अँडव्हायसरवरही माहिती आहे.

Pages