रिलॅक्स फॉर ४-५ डेज.....

Submitted by नीधप on 4 July, 2014 - 04:01

असा बाफ असेल तर प्रश्न तिकडे हलवणे.

केवळ पडे रहो गिरी करायचीये...
रिलॅक्स व्हायचेय...
विकेंड पेक्षा मोठी आणि आठवड्यापेक्षा छोटी ट्रिप....
एखाददुसरे साइटसिईंग ठिक पण जास्त बघा बघा नकोच्च..
बघा बघा पेक्षा अनुभव महत्वाचा...
स्पा फॅसिलिटी वगैरे असेल तर सोनेपे सुहागा....

अश्या प्रकारच्या ट्रिपांसाठी ठिकाणे, रिसॉर्टस आणि तुमचे अनुभव सुचवा.

सर्वांनी सुचवलेल्या ठिकाणांची यादी
१. जुलै ऑगस्ट दरम्यान जायचे असेल तर गगनबावडा! भारतातील दोन क्रमांकाचा पाऊस! अतिशय उंच डोंगर! तीन साधी पण डिसेंट हॉटेल्स! मवाल्यांची गर्दी नाही. भज्यांपासून मटनपर्यंत सर्व चोचले. कोल्हापूरपासून ५० किमी.
जिव्हाळा रिसॉर्ट

२. www.sagarsawli.com

३. एकांत,लवासा .
बिव्हर गोल्डन रिसॉर्ट.http://www.beavergoldenfields.in/aboutus.asp

४. सुलाचे बियॉण्ड
http://sulawines.com/stay.aspx

५. महाबळेश्वर ला MTDC रिसॉर्ट
तिकडेच चिरायु स्पा पण आहे जो ऑस्सम आहे

६. भंडारदरा चे आनंदवन हा पण एक मस्त ऑप्शन आहे. मुंबई वरून लगेच पोहचता येत. स्टाफ एक्दम छान आहे. पावसाळ्यात बूकिन्ग मिळणे जरा अवघड आहे. कदाचीत वीक डेझ ला मिळेल.

७. नी हे चिखलदरा - अमरावती - जायला हरकत नाही
http://www.satpuraretreat.com/

८. पाचगणीला 'दला-रूस्टर' नावाचा बंगला बायकोच्या चुलत भावाचा आहे. नंबर हवा असल्यास विपू करेन. दला रूस्टरची लिंक देतो. तेथे उत्तम सोय आहे, तसेच दरीवर तरंगती एक अ‍ॅरेंजमेंटही आहे जेवायची. भजन नावाचा एक गृहस्थ व त्याची पत्नी तेथेच राहतात व आपण सांगू तसा स्वयंपाक करतात. (शाकाहारी व मांसाहारी). तेथे फक्त फॅमिलीला परवानगी आहे, फक्त बॅचलर्सना जागा दिली जात नाही. साधारण माणशी रुपये २००० ते २१०० (महिना एप्रिलचा रेट) खर्च व त्यात चहा, नाश्ता वगैरे!
http://www.flipkey.com/panchgani-villa-rentals/p284464/

९. ब्राइट्लॅन्ड महाबळेश्वर स्पा मस्तय.

१०. नारायण्गाव वायनरी चा रिसॉर्ट पण छान आहे. साइट, नंबर काहीही सापडत नाही.

११. मानस रिसॉर्ट, इगतपुरी..
http://www.manasresort.in/index.aspx

१२. ग्रीन व्हॅली स्पा रिसॉर्ट
http://www.eandgresorts.in/tariff/

१३. पुण्याजवळ हिल्ट्न शिळिम स्पा रेसोर्ट बघा. छान आहे ते.
http://www3.hilton.com/en/hotels/india/hilton-shillim-estate-retreat-and...

१४. गिरीविहार म्हणून अजून एक आहे महाबळेश्वर मधे. खूप जुना. घरगुती चवीच जेवण दोन्हीवेळच ,चहा , ब्रेफा . सगळ इन्क्लुसिव्ह ४-४.५ हजार. मधे रामाच देउळ आणि बाजून रांगेत रुम्स अस साधारण स्वरूप आहे.

१५. महाबळेश्वरचे आनंदवनभुवन, छोटे स्वस्त आणि चांगले आहे. लोकेशन खुपच छान आहे.
http://hotelanandvanbhuvan.co.in/default.html

१६. http://nivantresort.com/resorts_deck.html
सातारा ते कास पठार ह्या रस्त्यावर डोंगरात मधेच आहे. लोकेशन सॉलिड आहे. स्पा वगैरे नाही, पण पावसाळ्यात जावुन २ दिवस नुस्ते रहायला आणि खायला मस्त आहे.
ज्यांना कास पठारावर जायचे आहे त्यांना पण उपयोगी आहे.

१७. पुण्याजवळ मंत्रा रिसॉर्ट

१८. विल्डरनेस्ट - चोरला घाट
http://www.wildernest-goa.com/
अप्रतिम आहे. गोव्याचे दाबोळी एअरपोर्ट किंवा मडगाव किंवा थिविम रेल्वे स्टेशन किंवा कुठलाही बसस्टॅण्ड यापैकी कुठूनही पिकप आणि ड्रॉप ऑफ आहे. एअरपोर्टपासून साधारण दीड तास लागतो तिथे पोचायला.
रेटस थोडे हायर वाटले तरी वर्थ आहेत. पॅकेजमधे पिकप, ड्रॉप ऑफ, ब्रेफा, लंच, इव्हिनिंग चहा, डिनर, गायडेड फॉरेस्ट वॉक, सनसेट वॉक, नेचर वॉक्स/ ट्रेल्स, स्विमिंग पूल चा वापर हे सगळे इन्क्लुडेड आहे. तुम्ही जाल तेव्हा निर्मल कुलकर्णी स्वतः तिथे असतील तर त्यांच्याशी जंगल, पर्यावरण आणि त्या अनुषंगाने इतिहास याबद्दल गप्पा मारणे हा अनुभव आहे. ३-४ दिवसांसाठी करेक्ट आहे. रूममधे एसी आणि टिव्ही असल्या सुविधा मस्ट असतील तुमच्यासाठी तर मात्र जाऊ नका. इतक्या सुंदर ठिकाणी गेल्यावर टिव्ही बघावासा वाटणे या इतकं दुर्दैव नाही आणि रूम एसीची तिथे गरजच नाही.

१९. कमलिनी कुटीर
http://www.kamalinikutir.com/aboutus.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जुलै - ऑगस्ट दरम्यान ट्रिपला जायचेय. ४-५ दिवसांपेक्षा जास्त वेळ काढता येणार नाहीये. त्यामुळे जाण्यायेण्याचा वेळ जितका कमी तेवढे बरे.
मेन अजेंडा खूप धावपळीनंतर रिलॅक्स होणे हा आहे.
स्पा रिसॉर्ट तर अगदीच चालेल.
कोकण, गोवा सध्या अज्जिबात नकोय.
जिथे उकडते, घामाच्या धारा वाहतात अशी ठिकाणे अज्जिबात नको.
जाणारे मी आणि नवरा आम्ही दोघंच आहोत.

सुचवा

जुलै ऑगस्ट दरम्यान जायचे असेल तर गगनबावडा! भारतातील दोन क्रमांकाचा पाऊस! अतिशय उंच डोंगर! तीन साधी पण डिसेंट हॉटेल्स! मवाल्यांची गर्दी नाही. भज्यांपासून मटनपर्यंत सर्व चोचले. कोल्हापूरपासून ५० किमी.

आम्ही दरवर्षी ऑगस्टमध्ये दोन दिवस जातो.

जास्त बघा बघा नाही. फक्त दोन घाट, गगनबावडा आणि भुईबावडा!

बाकी रूममध्ये ढग वगैरे येतात.

फोनची रेंज आहे.

नेचर ट्रेल्सचे
साजन नेचर ट्रेल्स - इथे करायला फारसे काहीच नाही , नुसता आराम करायचा, भरपूर खायचे ;), इथली ट्री हाउसेस मस्त आहेत.
दाभोसा नेचर ट्रेल्स ( इथे धबधबा असल्याने पावसाळ्यात गर्दी असु शकेल. आधी फोनवरुन चौकशी कर. )
बुकींग करुनच जावे . http://www.naturetrails.in/

गोवा आणि कोकण हे सध्या माझ्यासाठी ओव्हरडोस कॅटेगरीमधे आहेत. त्यामुळे तिथले सगळे ऑप्शन्स बाद.

रूममधे टिव्ही, एसी नसले तरी चालतील.

गगनबावडा... विचार करायला हरकत नाही.

गोवा आणि कोकण हे सध्या माझ्यासाठी ओव्हरडोस कॅटेगरीमधे आहेत. त्यामुळे तिथले सगळे ऑप्शन्स बाद.
.

Happy

माझ्याही डोक्यात हाच विचार आलेला. कोकणात तू अजिबत जाणार नाहीस याची खात्री आहे. बजेट असेल तर केरळ/पाँडी चा ऑप्शन पाहता येईल. स्पा सकट असलेली तिथली हॉटेल्स अगदी ऑस्सम आहेत असे ऐकुन आहे.

भ्रमा... कोकण नकोय. गोवा नकोय रे.
एकतर जिथे जाऊ तिथे ओळखी झालेल्या आहेत. गेले वर्षभर सावंतवाडीतच वास्तव्य होतं. त्याआधीही कामानिमित्ताने आणि गेलं वर्षभर शूटनिमित्ताने कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी, दोडामार्ग हे तालुके तर गोव्यात म्हादेईचा परिसर हे अक्षरशः पिंजून झालंय.... तेव्हा लगेच तिकडेच नकोय.

कोकणात तू अजिबत जाणार नाहीस याची खात्री आहे. <<
हो सध्या तरी नाही. आणि गेलेच तर मग खाडीकाठाला डोंगरावरच्या भातगावच्या घरीच जाऊन राहिन. पण कानांचं गाव असल्याने रिलॅक्सेशनची शक्यता शून्य! Happy

आऊट ऑफ इंडिया.. जाऊन या.. मालदीव मॉरिशस वगैरे... एकदम रिलॅक्स.. जायचं आणि पडून रहायचं...

भारतातच रहायचं असेल तर पाँडिचेरीचा ऑप्शन पण चांगला आहे.

पांचगणी छान आहे. बंगला बुक करता येईल. पॉश बंगले आहेत तिथे. बाकी मुन्नार किंवा कुर्ग बेस्ट आहे. पॉन्डिचेरीही छान आहे. लक्झरी रिसॉर्ट आहेत इथे.

मालदीवची रीसॉर्ट्स खुप महाग आहेत. तिथे जास्त काही पिकत नसल्याने ( आणि भारतातून काहीच निर्यात होत नसल्याने ) असे आहे. भूतान चांगले आहे. सध्या पाऊस असल्याने फिरायचा ऑप्शन नाहीच. तिकिट २४/२५
हजारच असेल.
दुबईत रमदान आहे आणि कडक उन्हाळा.. व्हीसा ४८ तासात ऑनलाईन. तिकिट २०/२२ हजार. हॉटेलचे डील मिळू शकेल.

रिलॅक्स व्हायचे असेल आणि लक्झरी स्टे हवा असेल तर ताज चे कोणतेही रेस्टॉरंट. जोधपूर ला हरिमहल किंवा उमेद भवन ३/४ दिवस जाऊन रहाण्यास मस्त.

त्यांच्या मन्सून ऑफर्स चांगल्या असतात. http://www.tajhotels.com/Taj-Holidays/offers.aspx

मी बंगालमधील ठिकाणं सुचवू शकते. माश्यांसकट (तुझ्यासाठी घासफूसपण मिळेल). लक्झरी नाही. फक्त यायचंजायचं तुम्ही बघा, नी Wink

वरदे, एकदा कोलकात्याला जाऊन काहीही न बघता परत आलीये(नांदिकारसाठी गेलो होतो). आता परत ते करणार नाही. व्यवस्थित वेळ काढून येणार तिकडे. Happy

सामी, चेक करते. धन्स गं.

अगं लायब्ररीमधून पोस्ट करतेय ते स्पीड नसल्याने नीट उमटतय का दिसतच नाहीये. आणि रिसॉर्टची लिंकही ओपन होईना. मग डिलिट केली Proud

अगदी अशी ट्रीप करावी अशी माझीही फार दिवसांपासून इच्छा आहे.
काही बघायचंच नसेल तर अगदी पुण्यातल्या ४-५ तारांकित हॉटेलात जाऊन रहायचं .
तिथे स्पा पासून खादाडीपर्यंत सर्व काही असतं.

तीन वर्षांपूर्वी आम्ही असेच मुंबईतल्या तारांकित हॉटेलात त्यांचे पॅकेज घेऊन राहिलो होतो.
नेटवरून डील घेऊन.
दिवसभर लोळायचं,त्यांचा फ्री हेवी ब्रेकफास्ट खायचा आणि जेवायला मस्तं माटूंगा नाहीतर दादरच्या ओळखिच्या जून्या छोट्याश्या खानावळीत/ हाटिलात मासे खायचे.
संध्याकाळी मुलाला घेऊन आपल्याच ओळखीच्या जून्या जागा पहात भट्कायचे.
मध्ये मूड आला तर त्यांच्या जीममध्ये नाहीतर खेळाच्या रूमनध्ये खेळायचे किंवा स्पात जाऊन हवे ते चोचले करून घायचे.

रिज्युवेशन पॅकेज का असंच काहीतरी नाव होतं.
मज्जा आलेली.

नको पुण्यात नको.. सत्रांदा जात असते. आता युनिव्हर्सिटीतली लेक्चर्सही सुरू होतील तिथली. पुण्यात ट्रिपला म्हणजे कायतरी विनोदच वाटेल मला.. Happy

सुला रिसॉर्टला कुणी जाऊन आलंय का?
ट्रिप अ‍ॅडव्हायजर वर प्रॉमिसिंग वाटतंय आणि शेजीबाई जाऊन आलीये तिने पण रेकमेंड केलंय.

पॉण्डीचेरी किंवा ऑरोव्हीलला ये!!!! Proud फक्त इकडं पाऊस वगैर नाही. आणि अरबी समुद्राऐवजी बंगालचा उपसागर आहे. Proud

नाशिक, सापुतारा. लोणावळा खंडाळा, पांच्गनी.

पाचगणीला एखादा ओल्ड स्टाईल बंगला विथ जेवण किती महाग असू शकेल ?
साधारण २ फॅमिलीज करता ? मुक्काम फारतर २ रात्री.
आणि तिकडचे बंगले हे नेटवर सर्च करता येऊन बुक करता येऊ शकतात का ? की अनेक चांगले ऑप्शन्स नेटवर उपलब्ध नाहीयेत. ?
हा अस्साच प्रश्न सिंहगडाचा पायथा, माथेरान, लवासा, भोर/भाटघर, इ. ठिकाणांसाठी पण आहे.

महाबळेश्वर ला MTDC रिसॉर्ट
तिकडेच चिरायु स्पा पण आहे जो ऑस्सम आहे Happy Happy

भंडारदरा चे आनंदवन हा पण एक मस्त ऑप्शन आहे. मुंबई वरून लगेच पोहचता येत. स्टाफ एक्दम छान आहे. पावसाळ्यात बूकिन्ग मिळणे जरा अवघड आहे. कदाचीत वीक डेझ ला मिळेल.

विकेंड, वीक डे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. नोकरीवाले नसल्याने आम्ही गरजेनुसार वीक डे लाही सुट्टी घेऊ शकतो.

Palladium hotel has a week end break for a couple. f0r 19500 pick up from home. beautiful sea view room at Worli and
dinner for two at Mekong, and tickets to canvas factory. it includes a spa package and a beautiful breakfast, and drop back to home.
fabulous room and a mall attached. I am taking this break. seems worth it. It has all the things I love. great arrangements, food, shopping spa and entertainment. If there is no ac cable wifi i dont step out of the house.

Palladium Hotel, Phoenix mall, worli.

freak out.

ओके. धन्यवाद. पुढच्या वर्षीच्या संभाव्य यादीत नाव घालून ठेवलं. वेबसाईटवरून बरं दिसतंय Happy

नी, किती लांब जायचय म्हणजे प्रवासाचा वेळ वगैरे?

मी गेल्यावर्षी जुलै महिन्यात ४ दिवसांकरिता क्लब महिंद्राच्या 'विराजपेठ' रिसॉर्टला (कुर्ग जवळ) गेलो होतो. लिटिल साईट सीईंग ओन्ली रीलॅक्स! अमेझींग एक्स्पिरियन्स.. Happy

दुसरे म्हणजे 'चार पाच दिवसांच्या' सुट्टीसाठी पाँडी किंवा परदेशातील स्थळे का सुचवली गेली समजले नाही. अर्थात विमानप्रवासामुळे शक्य होईलच, पण नुसती पडी टाकायला तिकडे कशाला जावे?

बाकी पाचगणीला 'दला-रूस्टर' नावाचा बंगला बायकोच्या चुलत भावाचा आहे. नंबर हवा असल्यास विपू करेन. दला रूस्टरची लिंक देतो. तेथे उत्तम सोय आहे, तसेच दरीवर तरंगती एक अ‍ॅरेंजमेंटही आहे जेवायची. भजन नावाचा एक गृहस्थ व त्याची पत्नी तेथेच राहतात व आपण सांगू तसा स्वयंपाक करतात. (शाकाहारी व मांसाहारी). तेथे फक्त फॅमिलीला परवानगी आहे, फक्त बॅचलर्सना जागा दिली जात नाही. साधारण माणशी रुपये २००० ते २१०० (महिना एप्रिलचा रेट) खर्च व त्यात चहा, नाश्ता वगैरे!

रिज्युवेशन पॅकेज का असंच काहीतरी नाव होतं.>> ह्म्म आम्हीपण असंच आयटिसी ग्रँड सेंट्र्ल मध्ये राहिलो होतो... पण वॅटच २५% द्यावा लागला होता.. पण मस्त अनुभ्व.. रुफटॉप डिनर/ बार, स्पॉ, स्विमिंग पूल..

बँकॉक / पटायाला जा , मस्त आराम ,स्पा , पाहीजे तर साईट सिईंग करतात येईल, मुंबईवरुन ४~५ तास फक्त. भारतात कुठेही जाण्यात जेवढा वेळ लागेल जवळपास तेवढाच लागेल.

Pages