गझल अंगी बाणवावी कामना होती!

Submitted by profspd on 4 July, 2014 - 02:54

गझल अंगी बाणवावी कामना होती!
कैक वर्षांची अघोरी साधना होती!!

वाटल्या रंजक जरी गझला तुम्हा माझ्या....
प्रेरणा माझी खरे तर वेदना होती!

ओठ माझे, दात माझे, काय मी बोलू?
सांगण्याजोगी न माझी वंचना होती!

ना उगा पायात माझ्या जोम हा आला....
तूच तर मजला दिली ही चालना होती!

पोचलो साठीत अन् आली अनासक्ती.....
मूळ दु:खांचेच सा-या, वासना होती!

लागला येऊ मला अंदाज आताशा.....
की, विधीलेखात काही योजना होती!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गझल अंगी बाणवावी कामना होती!
कैक वर्षांची अघोरी साधना होती!!
>>>
भलतीच अघोरी साधना केलीये सर तुम्ही !