काय ते बघतात दिवसाचेच तारे?

Submitted by profspd on 1 July, 2014 - 12:38

काय ते बघतात दिवसाचेच तारे?
का पिऊ ते लागले आहेत वारे?

विस्तवाचा दाह हा त्याला विचारा.....
जन्मला घेऊन जो हाती निखारे!

काय ही झाली घराची या अवस्था.....
एकही ना भिंत, छप्पर, फक्त दारे!

सारख्या लाटा जरी भिजवीत होत्या....
कोरडेच्या कोरडे सारे किनारे!

ओढणी खांद्यावरी, डोळ्यांस चष्मा....
ती जरी निजली तरी भवती पहारे!

टेकतो ना टेकतो मी पाठ तोवर....
धावुनी येती छळाया प्रश्न सारे!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सारख्या लाटा जरी भिजवीत होत्या....
कोरडेच्या कोरडे सारे किनारे!

टेकतो ना टेकतो मी पाठ तोवर....
धावुनी येती छळाया प्रश्न सारे!<<<

छान

सट्ऽऽ सट् सट् सट् फॉक्कऽऽऽऽपॉक्क ऽऽऽसटाक्ऽऽऽ..... आहाहा! आत्ताशी कसं शांत शांत वाटतयं...

विस्तवाचा दाह हा त्याला विचारा.....
जन्मला घेऊन जो हाती निखारे!
>>>
हा शेर मला वेगला वाचायला आवडला असता- जसा की वास्तवाच्या दाहाची त्याला काय भिती जो हातात निखारे घेऊनच जन्मलात टाईप्स......

सारख्या लाटा जरी भिजवीत होत्या....
कोरडेच्या कोरडे सारे किनारे!
>>>
आवडला

ओढणी खांद्यावरी, डोळ्यांस चष्मा....
ती जरी निजली तरी भवती पहारे!
>>> कळाला नाही

hmmm!

कोरडेच्या कोरडे सारे किनारे!<<ओळ आवडली

पसारेही आवडला.... हा खयालही तुम्ही अनेकदा वापरला असला तरी
ओढणी आणि चष्मा ह्या शेराचा अर्थ मीही असाच काढला होता जसा तुम्ही दिलाय

असो
धन्स