कृष्णमेघ

Submitted by anjali maideo on 1 July, 2014 - 10:08

कृष्णमेघ

एक खुळासा कृष्णमेघ तो पाहुनिया अंबरी
सखे गं झाले मी बावरी

दूरदेशी गं साजण गेला
चैन पडेना, जीव रमेना
कसा धरु गं धीर जमेना
अश्रुंच्या डोहात जणू ही भिजलेली चुनरी
सखे गं झाले मी बावरी

कसले नटणे सुटले कुंतल
श्रुंगाराला नसेच कारण
अष्टमास सोसले रितेपण
पावसाळी ते घरा परततील आस मनी अंतरी
सखे गं झाले मी बावरी

दूर पाहिला कृष्णमेघ तो
वाटे दूत सख्याचा ना तर
येईल साजण माझा सत्वर
दारी पपीहा पाहून हृदयी तार झंकारली
सखे गं झाले मी बावरी

अंजली मायदेव
१/७/२०१५

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त Happy