निसर्ग चित्रे - ऑइल पेस्टल

Submitted by विनार्च on 1 July, 2014 - 07:47

माझ्या लेकीने शाळेत देण्यासाठी काढलेली ही चित्रे. Happy

20140628_162358-001_0.jpg

यातल पहिल चित्र मला इतक आवडल की, मी ते शाळेत न्यायला मिळणार नाही ...हव तर दुसर काढ म्हणाले म्ह्णून हे दुसर चित्र.... अर्थात ते काढण्या आधी कस ही असल तरी मी ते तिला नेऊ देणार हे प्रॉमीस घ्यायला विसरली नाही Wink

2014-06-031_0.jpg

ह्या चित्रांमधले रंग तिने बोटाने घासून ब्लेन्ड केले आहेत. तिला कापूस वा टिश्यूपेपरचा पर्याय सुचवला असता हवा तसा इफेक्ट मिळत नाही म्हणाली.....(इतक घासून बोट दुखायला लागली. ) कलर्स ब्लेन्ड करायला अजून काही पर्याय आहेत का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच छान.....कित्ति हुषार आहे तुमचि मुलगी....

थोड खोबरेल बोटांना लवून गरम पाण्यात ठेवून शेका....कमि होइल असे वाटते

काय सुंदर रंग वापरलेत !!
हि सर्व चित्रे वेगवेगळ्या (क्राय सारख्या ) चॅरीटेबल संस्थांकडे पाठवायला हवीत. त्यांच्या भेटकार्डावर छापण्यासाठी.

धन्यवाद Happy

गोपिका बोटांवर उपचार झाले हो....मला इथे रंग ब्लेन्ड करण्याच्या पद्धती बद्दल विचारायचे होते....चुक ध्यानात आणुन दिल्याबद्द्ल धन्यवाद ...मी आवश्यक तो बदल करते Happy

व्वा मस्त चित्र. दूसरं बघितल्यावर नक्कीच वाटलं असेल की प्रॉमीस करायला नको होते.

खूप सुंदर चित्रं आहेत!

अनन्याची बाकी चित्रंपण भन्नाट असतात! केवढी टॅलेंटेड आहे!

सुंदर
वर तुम्ही ऑईल पेस्टल ब्लेंड करण्याबद्दल विचारले आहे.
ऑईल पेस्टल बोटाने किंवा बोटाला पेपर टॉवेल / तलम कामड गुंडाळुन करावे लागते . याशिवाय पेपर स्टंप्स/Tortillon ( जे घरीही बनवु शकतो) वापरता येतात. इथे http://raw.rawmaterialsarts.netdna-cdn.com/catimg/aa17483_x.jpg याची इमेज बघता येईल.
इथे http://www.wikihow.com/Make-a-Tortillon हे स्टंप्स बनवायचा प्रोसेस आहे किंवा आर्ट स्टोअर मधे वेगवेगळ्या नंबरचे स्टंप्स मिळतात.
ब्लेंडींगचे वेगवेगळे टेक्निक्स आहेत त्याचे व्हीडीओ ट्युटोरिअल्स शोधा आणि मुलिला दाखवा. उदा. क्रॉस हॅच स्ट्रोक्स करुन ते सर्क्युलर ब्लेंड केले किंवा येकाच दिशेने बोट फिरऊन केलेले ब्लेंड यात वेगळे ईफेक्ट मिळतील.
तसेच पुर्ण चित्र ब्लेंड न करता काही ठिकाणी तसेच टेक्चर ठेवता येते.
ऑईल पेस्टलच्या वर दुसरा रंग देताना खालचा रंग मिक्स होतो. म्हणुन वर पांधरे ढग निळ्यावर न रंगवता वेगळे रंगवायला हवे होते. सॉफ्ट पेस्टल्मधे येक येक लेयर फिक्स करुन काम करता येते तेथे पुर्ण निळा रंग मारुन तो फिक्स करुन त्यावर पांढरा पेस्टल वापरता येतो.

शेवटी अगदिच फाईन ब्लेंड हवा असला तर टर्पेंटाईन सारखे सॉल्व्हंट वापरता येते ( अगदी थोडया प्रमाणात) मात्र त्याचा वापर अगदीच हवा असेल तरच करावा. लहान मुलांना हे सॉल्व्हंट्स देण्याचे टाळावे.
शुभेच्छा.