च्यायला कविता आहे कि भंकस?

Submitted by लाल्या on 1 July, 2014 - 03:24

प्रेम तू एक सर्दी आहेस..

केव्हाही येते, केव्हाही जाते,
येते तेव्हा डोकं खाते.
कोणताही उपाय नाही चालत,
पेशंटची होते बेकार हालत.

प्रेम तू एक झोप आहेस....

येते कधी ते कळत नाही,
हवी तेव्हा पण मिळत नाही.
डोळ्यांवरती येई अंधारी,
म्हणे "आंधळा" दुनिया सारी.

प्रेम तू एक झूरळ आहेस...

अंगावरती येई अचानक,
थुईथुई नाचवी नाच भयानक.
थोडीही फट जर दिसली हृदयात,
त्यातही मावतं अगदी आरामात.

- माधव आजगांवकर.

नोंद - काही करायला नसलं कि माणूस असल्या कविता लिहायचे उपद्व्याप करतो! आवडली तर अभिप्राय द्या. हसू आलं तरीही अभिप्राय द्या. फाल्तू वाटली तर माझ्या नावाने बोंब मारा....पण प्रेमाने!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही करायला नसलं कि माणूस असल्या कविता लिहायचे उपद्व्याप करतो! Rofl

तसेच गझल पण बरका .......... सुळसुळाट झालाय नुसता कविता आणि गझलांचा
बाकी कविता भंकसच आहे असे मनापासून वाटते.

प्रेम , असं संबोधन अजूनतरी मराठीत रूढ झालेलं नाही.

देवाला जसं देवा म्हणतात, घोवाला जसे घोवा म्हणतात तसे प्रेमाला प्रेमा म्हणतात संबोधन विभक्तीत.

मस्त ए प्रेमकविता... गझलपेक्षा तरी नक्कीच +१
एकदा वाचायला मला तरी आवडली. हसु आलं हीच पावती. तीनही उपमा पर्फेक्ट Lol

>>प्रेम , असं संबोधन अजूनतरी मराठीत रूढ झालेलं नाही.
>>देवाला जसं देवा म्हणतात, घोवाला जसे घोवा म्हणतात तसे प्रेमाला प्रेमा म्हणतात संबोधन विभक्तीत.

हिंदीतुन विचार केला असावा ? किंवा सलमानखानच्या पोस्टरकडे पाहून सुचली असावी कविता.