देवळांच्या देशा - "मल्हारी मार्तंड (जेजुरी)"

Submitted by जिप्सी on 1 July, 2014 - 01:21

१. देवळांच्या देशा – "अंबरनाथचे शिवमंदिर"
२. देवळांच्या देशा - "मानस मंदिर"
३. देवळांच्या देशा - "शहाडचे बिर्ला मंदिर"
४. देवळांच्या देशा - "गोंदेश्वर मंदिर (सिन्नर)"
५. देवळांच्या देशा - "संगमेश्वर आणि चांग वटेश्वर मंदिर (सासवड)"
==============================================================================
==============================================================================

मल्हारी देवा मल्हारी स्वार घोड्यावरती झाला
देवाचं ठाणं जेजुरी नांदे दक्खन मुलुखाला
दक्खन मुलुखाला देव आलाया वस्तीला
भीती नाही कळीकाळाची देव आधार भक्ताला

प्रचि ०१

जेजुरीचे मंदिर हा महाराष्ट्राच्या मंदिरवास्तुकला परंपरेच्या प्रगतीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. पुण्याजवळच्या जेजुरी ह्या सुमारे तीस मैलावरील गावी खंडोबाचे हे जागृत समजले जाणारे देवस्थान आहे. धनगर, कोळी व इतर अनेक लोकांचे हे आरध्यदैवत असून इ.स. १६०८ मध्ये या देवळाचे बांधकाम झाले. सभामंडप व इतर काम इ.स. १६३७ साली राघो मंबाजी या मराठा सरदाराने केले, तर सभोवारच्या ओवऱ्या व इतर वास्तू होळकरांनी बांधल्या. इ.स. १७४२ मध्ये होळकरांनी दगडी खांब बांधले आणि सभोवारच्या तटबंदीचे व तलावाचे काम इ.स. १७७० मध्ये पूर्ण झाले.

निसर्गाच्या सन्निध्यात नैसर्गिक रित्या वाढणाऱ्या वास्तूकलेचे जेजुरीचा खंडोबाचे देवालय हे उत्तम उदाहरण आहे. खंडोबा हे शिव, भैरव व सूर्य या तीन देवतांचे एकत्रित स्वरूप आहे व म्हणूनच खंडोबाचा उपास रविवार या सूर्याचे वारी करण्याचा प्रघात असावा. कडेपठारावर सुमारे तीनशे मीटर उंच डोंगरावर व पाच किलोमीटर अंतरावर मुख्य देऊळ आहे. किल्लाकोटा हे महत्त्वाचे स्थान खाली आहे.

गेल्या अनेक शतकात धनगर व इतर जमातींच्या भक्तांनी दगडी पायऱ्या, दीपमाळा, व कमानी उभारल्या आहेत. या सर्व बांधकामात मराठी वास्तुकला व निसर्गाशी समरसता दिसून येते. दीपमाळांचे अनेक प्रकार, कमानीवरील उत्तम भित्तिचित्रे व नक्षी हे पाहिल्यावर जेजुरीच्या गतवैभवाची थोडी कल्पना येते.
(विकिपिडियाहुन साभार - अधिक माहिती येथे वाचा.)

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६
फेट्यात तुरा मोत्याचा डुल बाशिंग सोन्याचं
रिकीबीत पाय तोड्याचा हाती पात तलवारीचं
मार्तंड दुष्ट संहारी.... दुष्ट संहारी
मल्हारी.....मल्हारी.......मल्हारी

प्रचि ०७

प्रचि ०८
देव भंडारी रंगला, देव यळकोटी दंगला
देवाचं ठाणं जेजुरी नांदे दक्खन मुलुखाला

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११
गड उंच उंच मंदीर नवलाख त्याला पायरी
हिथ मंडप चांदण्याचा साजिरी त्यात हि नगरी
तिर्थाची किर्ती नवखंड नवखंड नवखंड
मल्हारी.....मल्हारी.......मल्हारी

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

सदानंदाचा जय जय बोला, माझ्या देवाचं जय जय बोला
देवाचं ठाणं जेजुरी नांदे दक्खन मुलुखाला

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७
बाणुबाई म्हाळसा दोघी देवाच्या दोनी अंगाला
देवा खंडोबाकारणी होतीया गर्दी जत्रंला
नाचती वाघ्या अन् मुरळी...वाघ्या अन् मुरळी
मल्हारी.....मल्हारी.......मल्हारी

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१
घाटीची साथ दिमडीला देवरायाच्या दिमतीला
देवाचं ठाणं जेजुरी नांदे दक्खन मुलुखाला

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४
छत्रपती शिवाजी महाराज आणि शहाजीराजे यांची भेट

प्रचि २५

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त फोटो.. काही चित्रांमध्ये स्त्रिया दाखवल्या आहेत त्यांच्या साड्या बघायला हव्या होत्या .. जय मल्हार मराठी सिरियल वाल्यांनी..

मस्त फोटो. मला जायच आहे जेजुरीला. बघु या कधी योग येतो ते. फोटो पाहून जायची इछा प्रबळ झाली.

कडेपठारला गेला नाहीस?
खरतर तिकडे कमी लोकं जातात.
तिथे दर्शन विना त्रासाचं होतं. Happy

फोटो मस्त.
पहिल्याच फोटोत माहौल जमलाय. Happy

मस्तच. परत जाशील तेव्हा तिथल्या देवळाच्या दरवाज्याच्या कडीचा फोटो नक्की काढ. इथे जिकडेतिकडे हळद दिसते तर पन्हाळ्याजवळचे ज्योतीबाचे देऊळ त्यात वेगळ्याच रंगाचे कुंकु दिसते.

व्वा! जबरी... १ नं.

सदानंदाचा येळकोट!
मल्हारी मार्तंडाचे चांगले बोल!
येळकोट येळकोट! जय मल्हार...

माझ्या माहेरी मार्तंडाचे ५ दिवसाचे नवरात्र असते, तळी वगैरे करतात, हळद उधळतात...
खुप प्रसन्न वाटते...

येळकोट येळकोट जय मल्हार ---/\---
मस्त प्रचि Happy
मी गडाच्या मागच्या बाजुने दिसनारा कडेपठार चा फोटो शोधत होते.

मस्त फोटो... पायर्‍यांचा एखादा तरी दे.. अत्यंत सुबक आहेत त्या पायर्‍या. पण त्यामूळेच चढायला त्रास होतो.
( नऊ लाख वगैरे नाहीत ३७६ आहेत. मी मोजल्या होत्या Happy )

९ लक्ष दगड वापरून, जवळपास ४५० पाय-या बांधल्या आहेत. गडावर माहीती दिली आहे.
गेल्या महिन्यातच दर्शनाचा योग आला. Happy

दिनेशदा, बन्डू, आपापसात काय ते फिक्स ठरवा बरं Proud

मी फार्पुर्वी लहान पणी गेलेले जेजुरीला.

जिप्स्या, तुसी महान हो!

रच्याकने मला आठवलं, बायकोला उचलून घेऊन चढायच्या असतात ना या पायर्‍या? Proud

एवढंच विचारायचंय मला.
तसा आणखी एक प्रश्न माझ्या मनात येतोय खरा पण वाचक आणि जिप्सी सुज्ञ आहेत Proud

मस्त मस्त मस्त प्रचि

१२वा फोटो वर माउस स्क्रोल वर खाली केल्यावर ३डी इफेक्ट मिळतो ..
>>> अगदी हेच लिहिणार होतो.

१३व्या ला अंशत: पाहायला मिळतोय

रच्याकने मला आठवलं, बायकोला उचलून घेऊन चढायच्या असतात ना या पायर्‍या?>>>> हो अशी पदधत आहे मला घेतल होत उचलून Proud आमचा कुलदेवता आहे जेजुरी चा खंडोबा, त्यामुळे लग्ना नंतर जेजुरीला जाणे compulsory आहे,

फोटो तर खुप छान आहेत

प्रतिसादाबद्दल मनापासुन धन्यवाद!!!!

कडेपठारला गेला नाहीस?>>>>नाही रे, कडेपठारला नाही गेलो.

मी गडाच्या मागच्या बाजुने दिसनारा कडेपठार चा फोटो शोधत होते.>>>>अरे हो, हा फोटो काढायचा राहिलाच.

नऊ लाख वगैरे नाहीत
९ लक्ष दगड वापरून, जवळपास ४५० पाय-या बांधल्या आहेत
दिनेशदा, बन्डू, आपापसात काय ते फिक्स ठरवा बरं>>>>>>रीया, बन्डू म्हणतायत ते खरं आहे. मी ही हेच ऐकलंय.
एका गाण्यातही तसा उल्लेख आहे.
"नव लाख पायरी गडाला हो, चिरा जोडील्या खडकाला"

झकासा नेहेमीच्या गुलालापेक्षा वेगळा रंग असतो रे. थोडा निळसर असतो.>>>>केपी, झकास हा बघ हा रंग. आमच्या कुलदैवताला हाच गुलाल उधळतात. Happy

रच्याकने मला आठवलं, बायकोला उचलून घेऊन चढायच्या असतात ना या पायर्‍या? >>>>रीया, सगळ्या पायर्‍या नाही काय. पहिल्या पाच पायर्‍या बायकोला उचलून घेऊन चढायच्या असतात. Wink

रीया, ब... माणसं आपल्यालाच कसं ९८ % डिसकाऊंट घेतात ते, बघितलं का !

आता माझं गणित कच्चं आहे, जौ द्या.. हे मी पायर्‍यांच्या एकंदर संख्येबाबत बोलतोय !

शारुख पण ( या वयात ) त्या ( नाजूक ) पडूकोण बाईला उचलून घेऊन कुठल्यातरी पायर्‍या चढलावता म्हणे.. पडु पडु म्हणतही पडला नै कै !

Pages