वैभव आले, निघून गेले......

Submitted by profspd on 30 June, 2014 - 02:29

वैभव आले, निघून गेले!
अत्तरापरी उडून गेले!!

काळाच्या त्या ओघामध्ये....
कळपखोरही सरून गेले!

काडीचा आधार मिळाला....
बुडणारेही तरून गेले!

पानगळीला समजू शकतो.....
वसंत सुद्धा छळून गेले!

आयुष्याच्या दशा लोंबती....
कोण कोण कुरतडून गेले!

प्रकाशण्याचे मोल चुकवले....
चरित्र हे काजळून गेले!

गरज संपली माझी तेव्हा.....
मला पाहुनी वळून गेले!

शब्द न शिरला डोक्यामध्ये....
सगळे डोक्यावरून गेले!

एक झुळुक हलकीशी आली...
पान बिचारे गळून गेले!

जितेपणी जाळले जगाने....
कलेवराला पुरून गेले!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शब्द न शिरला डोक्यामध्ये....
सगळे डोक्यावरून गेले! >> Biggrin

प्रत्येक प्रतिसादाच्या खाली तो ढन्यवाद चा शिक्का मारलाच पायजे का?

प्रोफेसर, किती साली रिटायर झालात हो तुम्ही?

पानगळीला समजू शकतो.....
वसंत सुद्धा छळून गेले!
>>
गरज संपली माझी तेव्हा.....
मला पाहुनी वळून गेले!
>>>>>
एक झुळुक हलकीशी आली...
पान बिचारे गळून गेले!

>>>

हे शेर आवडले........

जितेपणी जाळले जगाने....
कलेवराला पुरून गेले!
>>> हा सगळ्यात जास्त आवडला