वेडचाळे चाललेले पाहवेना!

Submitted by profspd on 29 June, 2014 - 03:50

वेडचाळे चाललेले पाहवेना!
झुंडशाही येथली काही सरेना!!

दंडवतही घातला साक्षात असता....
एकही सच्ची गझल मज आढळेना!

केवढा गोंगाट चालू तोतयांचा....
घातले कानात बोळे, ऐकवेना!

प्रेम गझलेचे कुठे गेले कळेना....
एकही निव्वळ रसिक का सापडेना?

येत नाही तू, तुझी ना गंधवार्ता.....
प्रहरही खोळांबलेले हे टळेना!

न्यूनगंडाचीच ही आहे निशाणी....
आढ्यतेची झूल त्यांना सोडवेना!

भट बिचारे खिन्नतेने फक्त बघती.....
काय येथे चालले काही कळेना!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१०४ दिवसांमध्ये १२५ गझला, १ गझल दोनवेळा प्रकाशित झाली ती धरून १२६! एक गीत प्रकाशित केले ते धरून एकुण धागे १२७!

त्यात मायबोलीकरांच्या त्यांना न विचारता मुद्दाम वापरलेल्या जमीनी नऊ!

गेल्या बहात्तर तासात सुमारे नऊ गझला!

यंदाच्या मोसमात गंगाधर मुटेंवर भीषण आक्रमण!

अबब! काय हा आवाका! काय हा झपाटा!

धन्यवाद!

>>अबब! काय हा आवाका! काय हा झपाटा!
बेफि, आवाका आणि झपाटा तर तुमचाही खुप जबरदस्त होता की आधी, विशेषतः कादंबर्‍या लिहिल्यात तेव्हा Happy
(तिरकसपणे नाही सद्भावनेने लिहिले आहे)

>> १०४ दिवसांमध्ये १२५ गझला, १ गझल दोनवेळा प्रकाशित झाली ती धरून १२६! एक गीत प्रकाशित केले ते धरून एकुण धागे १२७! <<

ह्याने तर धरणं भरतील !

ढगाला कळ लागंना आणि ह्यांना सोसंना..

द्येवा म्हाराजा.... ह्या गझलांचं पानी कर आन आमची धरनं भर.

लिहीलेले कितीही छान असले. अती लिहीणे फारच वाईट. हे सगळे आपण पुर्वी लिहीले असणार आणि आता वेळ देऊन ते सगळे भराभर प्रकाशीत करत आहात असेच असावे बहुधा. परंतू सबुरीने घेतल्यास अधीक चांगले होईल.
एक फॉर्म्युला आहे :
एका वेळी तीनचार कादंबर्‍या लिहायला घ्या. एकेक भाग रोज प्रकाशीत करा. मग मधेच एखाद्या दिवशी गझल टाका. एखाद्या दिवशी भांडण काढा. असे सर्वअवगुणसंपन्न व्हा. स्वतःचे तेरा चौदा डुआयडी काढून आपल्याच गझलेवर कादंबरीवर स्तुतीचे प्रतिसाद द्या. मग काही लोकांना जमवुन दारू पाजा आणि त्याना तुमचा फॅन क्लब काढायला सांगा. अशा पध्दतीने तुम्ही मायबोलीवर यशस्वी लेखक व्हाल. अर्थात ते यश मायबोलीवरून मायभुमीपर्यंत पोहोचविन्यात तुम्हाला फॅनक्लबचा काहीच फायदा होणार नाही. तिथे प्रतिभेचे लखलखीत सोनेच चमकते हे विसरू नका. तुम्ही चमकालच. माझ्या सदिच्छा सर्वांसोबत नेहमीच असतात. तुमच्यासोबतही आहेतच!!! (आपण सुज्ञ आहात, सुज्ञासारखेच वाचून समजून घेतले असेल अशी अपेक्षा)

>>>>>>>>>>>>>एका वेळी तीनचार कादंबर्‍या लिहायला घ्या. एकेक भाग रोज प्रकाशीत करा. मग मधेच एखाद्या दिवशी गझल टाका. एखाद्या दिवशी भांडण काढा. असे सर्वअवगुणसंपन्न व्हा. स्वतःचे तेरा चौदा डुआयडी काढून आपल्याच गझलेवर कादंबरीवर स्तुतीचे प्रतिसाद द्या. मग काही लोकांना जमवुन दारू पाजा आणि त्याना तुमचा फॅन क्लब काढायला सांगा. अशा पध्दतीने तुम्ही मायबोलीवर यशस्वी लेखक व्हाल. अर्थात ते यश मायबोलीवरून मायभुमीपर्यंत पोहोचविन्यात तुम्हाला फॅनक्लबचा काहीच फायदा होणार नाही<<<<<<<<<<<<<<<<

हाहाहाहाहा
हबा
कहींपे निगाहे कहींपे निशाना !!! Wink