गझल असू द्या भले कितीही गोजिरवाणी!

Submitted by profspd on 28 June, 2014 - 09:07

गझल असू द्या भले कितीही गोजिरवाणी!
शेरेबाजी त्यावर करती केविलवाणी!!

कीवच येते त्यांचे बघुनी मर्कटचाळे.....
धडपड त्यांची टिकावयाची लाजिरवाणी!

झूल, मुखोटे ढाल करोनी करती कावे....
क्रीडा त्यांची दुरून बघतो ओंगळवाणी!

भुसा भरोनी शेर कुठे का शेर वाटतो?
मृतशब्दांची गझल वाटते भिकारवाणी!

प्रसन्नता मी ढळू देत नाहीच मनाची......
भले कितीही हवा असू द्या उदासवाणी!

मंद मंद झुळकीसम येती अलगद मिसरे....
अधरांवरती गझल प्रकटते मंजुळवाणी!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users