हा बहर माझा तुझ्यासाठीच राणी!

Submitted by profspd on 27 June, 2014 - 11:21

हा बहर माझा तुझ्यासाठीच राणी!
माळ मजला वा सजव तू फूलदाणी!!

श्वास तू झालीस, झालो बासरी मी....
जिंदगी गाते अता मंजूळ गाणी!

झोपते ती आणि मजही झोप म्हणते....
तू दिलेली वेदना झाली शहाणी!

फूल सुकले, पाकळ्या सा-या गळाल्या....
फक्त काट्यांचीच ही उरली निशाणी!

सांग तू म्हणतोस म्हणुनी सांगतो मी.....
सांगण्याजोगी न ही माझी कहाणी!

पैलतीराला कसे ना येत ऐकू?
मी कधीचा गात बसलेलो विराणी!

क्षण निरोपाचा किती भावूक करतो.....
स्वर बने कातर, उभे डोळ्यात पाणी!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमची गझल एकदाच वाचणे म्हणजे काय त्रास होतो तुम्हाला काय सांगू
त्यात तुम्ही एकच गझल दोनदा पाडता इथे तेव्हातर विचारूच नका