बोलतो काही उगा, बोलायचे नाही कळत!

Submitted by profspd on 27 June, 2014 - 04:13

बोलतो काही उगा, बोलायचे नाही कळत!
चारचौघांच्यात तुज वागायचे नाही कळत!!

एवढा साधेपणाही काय कामाचा तुझा?
स्वार्थ सुद्धा आपला साधायचे नाही कळत!

उसळती भाली बटा अन् ओढणी झाके वदन.....
जा, तुला वा-या अरे, बिलगायचे नाही कळत!

पाहुनी त्या कामिनीचे लाजणे अन् मुरडणे.....
फूलही म्हणते मला लाजायचे नाही कळत!

बोलकी असते नजर अन् स्पर्श सुद्धा बोलतो.....
प्रेम देते सर्व, तुज मागायचे नाही कळत!

ही जमिन माझी-तुझी करतात का शायर असे?
ती जमिन कोणास का पेलायचे नाही कळत?

पोचते हृदयातली कविता अरे, हृदयामधे....
भाव हृदयातील तुज मांडायचे नाही कळत!

मोग-याचा तो पहा गजरा तिच्या केसातला.....
चित्त त्याच्यासारखे चोरायचे नाही कळत!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोग-याचा तो पहा गजरा तिच्या केसातला.....
चित्त त्याच्यासारखे चोरायला नाही कळत!

चोरायला...टायपो बहुधा !

आवडली
अनेक ओळी छान आहेत जमीनही मला खूप आवडली (रदीफ विशेषतः)

बिलगायचे हा शेर जास्त आवडला . एका शायराचा एक शेर आठवला ..पण असो